Tuesday, December 10, 2024
Home ताज्या श्याम ग्लोबल टेक्नोव्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेडद्वारे पुण्यात नवीन उत्पादन सुविधेचे उद्घाटन

श्याम ग्लोबल टेक्नोव्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेडद्वारे पुण्यात नवीन उत्पादन सुविधेचे उद्घाटन

श्याम ग्लोबल टेक्नोव्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेडद्वारे
पुण्यात नवीन उत्पादन सुविधेचे उद्घाटन

कोल्हापूर/प्रतिनिधी : श्याम ग्लोबल टेक्नो व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड (एसजीटीपीएल) ही महिंद्रा अॅण्ड महिंद्रा लिमिटेडची मूळ उपकरण उत्पादक (ओईएम) आहे. कंपनीने अलीकडेच पुण्यात नवीन उत्पादन सुविधा सुरू करून आपल्या कार्याचा विस्तार केला आहे. श्याम ग्लोबल टेक्नो व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेडचा प्लांट आणि मुख्यालय पुणे येथे आणि ब्रँच ऑफिस मुंबई येथे आहे. एसजीटीपीएलने जागतिक दर्जाच्या जेन सेट्सचे उत्पादन करणारा अत्याधुनिक प्लांट तयार केला आहे. जेथे उच्च उत्पादकतेसाठी उत्तम इंधन व्यवस्था, एक्झॉस्ट एमिशन्स आवश्यक असते, एसजीटीपीएलकडे ग्राहकांच्या गरजा पूर्ण करणारे आणि स्पेक्ट्रम उद्योगातील मोठ्या गरजा पूर्ण करणारे जेन सेट आहेत. ही कंपनी दीर्घकाळ चालणारे आणि कमी देखभालीसह उच्च दर्जाचे, लो मेंटेनन्स जनरेटर तयार करते. महिंद्रा पॉवरॉलचा वापर बांधकाम क्षेत्रात, हॉस्पिटल, इंडस्ट्री, स्कूल, पेट्रोल पंप, टेलिकॉम, क्रशिंग उद्योगात केला जातो. या नवीन उत्पादन सुविधेचे उद्घाटन हेमंत सिक्का (अध्यक्ष, एफईएस, पॉवरॉल बिझनेस महिंद्रा अँड महिंद्रा) यांनी केले. संजय जैन (बिझनेस हेड, पॉवरोल), नरेंद्र गोयल (संचालक, श्याम ग्लोबल टेक्नोव्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड) आणि महिंद्राचे इतर प्रतिनिधीदेखील यावेळी उपस्थित होते.
नरेंद्र गोयल म्हणाले, श्याम ग्लोबल गेल्या चार वर्षांपासून ग्राहकांच्या हितासाठी काम करत आहे. पुण्यातील आमच्या विस्तारानंतर आम्ही पुढेदेखील आणखी विस्तार करू. मला विश्वास आहे की भविष्यात जेनसेटची मागणी वाढेल जी नागरिक आणि व्यवसाय दोघांसाठीही फायद्याची ठरेल. श्याम ग्लोबलच्या सर्व सदस्यांचे त्यांच्या मेहनतीसाठी आणि समर्पणासाठी कौतुक केले. महिंद्रा पॉवरॉलच्या सर्वात मोठ्या ओईएमपैकी एक म्हणून, श्याम ग्लोबल सतत प्रगती करत आहे आणि वेगाने विस्तारत आहे आणि पुढेही ते वेगवेगळ्या सेगमेंटमध्ये ग्राहकांना सेवा देत राहतील. कंपनीची स्थापना एप्रिल २०१८ मध्ये झाली असून नरेंद्र गोयल आणि रुची गोयल हे श्याम ग्लोबल टेक्नोवेटर्स प्रायव्हेट लिमिटेडचे संस्थापक आणि संचालक आहेत. त्यांना मार्केटिंग-स्ट्रॅटेजी आणि कंपनीसाठी दीर्घकालीन योजनांचा भरपूर अनुभव होता. ते अभियांत्रिकीचे पदवीधर असून त्यांनी व्यवस्थापनात पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. एसजीटीपीएल श्याम ग्लोबल टेक्नो व्हेंचर्स सुरू करण्यापूर्वी, त्यांनी महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडसारख्या प्रमुख कॉर्पोरेट क्षेत्रात २५ वर्षांहून अधिक काळ वरिष्ठ स्तरावर काम केले. मेहनतीच्या आणि दृढ इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांनी या कंपनीला आज यशाच्या शिखरावर नेले आहे. पुढे नरेंद्र गोयल म्हणतात, आम्हाला हे जाहीर करताना आनंद होत आहे की ईटी बिजनेस अवार्ड २०२१ मध्ये श्याम ग्लोबलला औद्योगिक क्षेत्रातील एक उदयोन्मुख उद्योजक म्हणून मान्यता मिळाली आहे. कंपनीबद्दल- एसजीटीपीएल ही एमएसएमई आहे, जी डिझेल जनरेटर निर्मिती, बॅकअप पॉवर सोल्युशन, रूफ टॉप सोलर सोल्यूशन व्यवसाय, गॅस पॉवर जनरेटरशी संलग्न आहे. जेनसेटसाठी टेलिकॉम, रिटेल, इन्फ्रास्ट्रक्चर आणि औद्योगिक ग्राहकांना लक्ष्यित करणे कंपनीचे उद्दिष्ट आहे. श्याम ग्लोबल सध्या पुण्यातील त्यांच्या अत्याधुनिक उत्पादन सुविधेमध्ये ५ केवीए ते ६२५ केवीएपर्यंतचे जेनसेट तयार करत आहे, एसजीटीपीएलचा पुण्याबाहेर तीन एकरहून मोठा कारखाना आहे, ज्यामध्ये १०० पेक्षा जास्त व्यवस्थापक आणि कर्मचारी कार्यरत आहेत. एसजीटीपीएल ही महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडची अधिकृत मूळ उपकरण उत्पादक कंपनी आहे. या प्रख्यात भारतीय ब्रँडने, महामारीच्या काळात काळाची गरज ओळखून आणि आपले सामाजिक कर्तव्य म्हणून कोविड रुग्णालयांसाठी ऑक्सिजन जनरेटर मॅन्युफक्चरिंगद्वारे पॉवर बॅकअप प्रदान केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

साखरेच्या किमान आधारभूत किंमतीमध्ये ४२०० रुपये प्रतिक्विंटल इतकी वाढ करावी, खासदार महाडिक यांची राज्यसभेत मागणी

साखरेच्या किमान आधारभूत किंमतीमध्ये ४२०० रुपये प्रतिक्विंटल इतकी वाढ करावी, खासदार महाडिक यांची राज्यसभेत मागणी   दिल्ली/प्रतिनिधी : राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी संसदेच्या अधिवेशनात साखरेच्या...

निसर्ग आणि पक्षी अभ्यासक किरण पुरंदरे यांचा रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनच्यावतीनं मानपत्र देवून सत्कार पुरंदरे दांपत्याचा विलक्षण जीवन प्रवास ऐकून श्रोते...

निसर्ग आणि पक्षी अभ्यासक किरण पुरंदरे यांचा रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनच्यावतीनं मानपत्र देवून सत्कार पुरंदरे दांपत्याचा विलक्षण जीवन प्रवास ऐकून श्रोते भारावले कोल्हापूर/प्रतिनिधी : चिमणीचं...

आराध्य दैवत आणि शिवसेनाप्रमुखांना स्मरण करून राजेश क्षीरसागरांनी घेतली “आमदारकीची” शपथ

आराध्य दैवत आणि शिवसेनाप्रमुखांना स्मरण करून राजेश क्षीरसागरांनी घेतली "आमदारकीची" शपथ मुंबई/प्रतिनिधी : नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत उत्तर मधून राजेश क्षीरसागर यांनी तब्बल २९...

वालावलकर ट्रस्ट हॉस्पिटलच्या वतीने आरोग्य पंधरवडा शिबीराचे आयोजन

वालावलकर ट्रस्ट हॉस्पिटलच्या वतीने आरोग्य पंधरवडा शिबीराचे आयोजन   कोल्हापूर /प्रतिनिधी : वैद्यकीय क्षेत्रात सेवाभावी पणे सन १९८६ पासून कार्यरत असलेल्या शिवाजी उद्यमनगर येथील वालावलकर ट्रस्ट...

Recent Comments