Monday, November 11, 2024
Home ताज्या वन्य प्राण्यांचा बंदोबस्त तातडीने करावा  - खासदार संजय मंडलिक

वन्य प्राण्यांचा बंदोबस्त तातडीने करावा  – खासदार संजय मंडलिक

वन्य प्राण्यांचा बंदोबस्त तातडीने करावा  – खासदार संजय मंडलिक

कोल्हापूर/प्रतिनिधी : वन्य प्राण्यांचा अधिवास हा मानव वसाहतीकडे वाढत असून वन्यप्राण्यांच्या हल्यामध्ये जीवीत व पिक हानी मोठ्या प्रमाणावर होत असल्याने त्यांच्या बदोबस्त व झालेल्या नुकसानीची भरपाई यासंदर्भात खासदार संजय मंडलिक यांचे अध्यक्षतेखाली वन विभागाच्या मुख्य कार्यालयात आज रोजी आढावा बैठक झाली असून या बैठकीस चंदगडचे आमदार राजेश पाटील व राधानगरीचे आमदार प्रकाश आबिटकर, मुख्य वनसंरक्षक क्लेमेंट बेन, विजय देवणे, सुनिल शिंत्रे, नगरसेवक संभाजी पाटील हे उपस्थित होते.
चंदगड, आजरा, भुदरगड तालुक्यात नागरी वसाहतीमध्ये हत्ती फिरत असलेकारणाने यांच्यावर तातडीने उपाययोजना व्हाव्यात याकरीता आजरा आजरा तालुक्यातील हत्ती कर्नाटक पॅटर्न वापरून परत पाठवणे व कर्नाटकातून चंदगड मध्ये येणारे हत्ती यांचा वायर फ्लेमिंग उभे करून प्रतिबंध करणे.  मुंबई येथे मा.वनमंत्र्यांसोबत बैठक घेणे व नोव्हेंबरमधील पहिल्या आठवड्यात आढावा बैठक घेणे व हत्ती, गवे व इतर जनावरांमुळे होणारे शेतीचे नुकसान बाजारभावाप्रमाणे देणे असे महत्वाचे निर्णय या बैठकीदरम्यान घेण्यात आले.  यासाठी प्रधान मुख्य वनसंरक्षक – महाराष्ट्र राज्य व प्रधान मुख्य वनसंरक्षक – कर्नाटक राज्य यांचेशी समन्वय करणयाची जबाबदारी मुख्य वनसंरक्षक क्लेमेंट बेन यांचेवर सोपविण्यात आली.
या बैठकीदरम्यान महत्वाचे निर्णय घेण्यात आले ते असे आहेत.प्रधान मुख्य वनसंरक्षक कर्नाटक व महाराष्ट्र यांचे समन्वयाने कर्नाटकातील पाळीव हत्ती आणून आजऱ्यातील हत्तीला कर्नाटकात पाठवणे,कर्नाटकातून येणाऱ्या हत्ती व टस्करांचा प्रतिबंध करणेसाठी खिंडीतील मार्ग वाघोत्रे – गुडवळे चंदगड येथे     वायर फ्लेमिंग करणे.तामिळनाडू राज्याने हत्तींच्यासंदर्भात राबवलेल्या उपाययोजनांचा अभ्यास करुन अशाच पध्दतीच्या   योजना कोल्हापूर जिल्ह्यात राबवाव्यात.शेतीमालाचे होणारे नुकसान बाजारभावाप्रमाणे देण्यासाठी केंद्र व महाराष्ट्र शासनाकडे पाठपुरावा करणे.
मुंबई येथे माननीय वनमंत्र्यांसोबत बैठक येत्या सात दिवसात व नोव्हेंबर 2020 च्या पहिल्या आठवड्यात   आढावा बैठक घेणे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

राजेश क्षीरसागर यांच्या प्रचारार्थ कदमवाडी परिसरात प्रचारफेरी

पूरस्थिती, कोरोना काळात लाटकर कुठं होते ? : सत्यजित उर्फ नाना कदम यांची लाटकर यांच्यावर टीका राजेश क्षीरसागर यांच्या प्रचारार्थ कदमवाडी परिसरात प्रचारफेरी कोल्हापूर/प्रतिनिधी : फिल्मी...

निवडणूक जनतेनेच हातात घेतल्यामुळे विजय निश्चित – पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा विश्वास

निवडणूक जनतेनेच हातात घेतल्यामुळे विजय निश्चित - पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा विश्वास जनता जनार्दनासह अबाल वृद्ध व माता-भगिनींचा उठाव मोठा नानीबाई चिखलीत प्रचार सभेला उत्स्फूर्त...

महाविकास आघाडी पुरस्कृत कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार राजेश लाटकर यांचा प्रचार शुभारंभ

महाविकास आघाडी पुरस्कृत कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार राजेश लाटकर यांचा प्रचार शुभारंभ कोल्हापूर/प्रतिनिधी : महाविकास आघाडी पुरस्कृत कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार राजेश लाटकर...

घोडावत विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी बनविले इलेक्ट्रिक वाहन

घोडावत विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी बनविले इलेक्ट्रिक वाहन इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजीनियरिंग विभागाची कामगिरी अतिग्रे/प्रतिनिधी : संजय घोडावत विद्यापीठातील इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागाने इलाईट टेक्नो ग्रुप, पुणे...

Recent Comments