Thursday, December 19, 2024
Home ताज्या आमदारांची जनमानसातील प्रतिमा मलीन करणाऱ्यांना मंत्रिमंडळातून डच्चू शहाजीबापू पाटीलांना त्यांचेच वक्तव्य भोवले-हेमंत पाटील

आमदारांची जनमानसातील प्रतिमा मलीन करणाऱ्यांना मंत्रिमंडळातून डच्चू शहाजीबापू पाटीलांना त्यांचेच वक्तव्य भोवले-हेमंत पाटील

आमदारांची जनमानसातील प्रतिमा मलीन करणाऱ्यांना मंत्रिमंडळातून डच्चू शहाजीबापू पाटीलांना त्यांचेच वक्तव्य भोवले-हेमंत पाटील

मुंबई/प्रतिनिधी : ‘काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल, सर्व कसे ओक्के मध्ये आहे,’ असे वक्तव्य करीत जनमानसात राज्यातील लोकप्रतिनिधितींची अप्रत्यक्षरित्या प्रतिमा मलीन करणाऱ्या सांगोला विधानसभा मतदार संघाचे आमदार शहाजी बापू पाटील यांना मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आला आहे. मतदार संघातील जनतेला वाऱ्यावर सोडून राज्यातील सत्तासंघर्षादरम्यान गुवाहाटीत सुट्टीचा आनंद घेत असतांना त्यांची ऑडियो क्लिप व्हायरल झाली होती. त्यांचेच  व्यक्तव्य त्यांना भोवले आहे, असे हेमंत पाटील म्हणाले.
शहाजी बापू यांची ऑडियो क्लिप तुफान व्हायरल झाली.अगदी कमी वेळेत राज्य तसेच देशभरातील लोकांच्या मोबाईल पर्यंत ते पोहचले. लोक त्यांना ओळखू लागले. ते या व्हायरल क्लिपमुळे प्रसिद्ध तर झाले मात्र त्यांची किंमत संपली.अशाच किंमत संपलेल्या व्यक्तीला मंत्रिमंडळात स्थान न देण्याचा निर्णयाचे स्वागत करतो,अशी भावना हेमंत पाटील यांनी व्यक्त केली.
सत्ताकारणात आमदार केवळ घोडेबाजार करीत सरकार उलथून टाकण्यासाठी कुठल्याही स्तरावर जावू शकतात. मोठ्या हॉटेलमध्ये राहतात, खुप पैसा खर्च करतात, निर्सगरम्य ठिकाणी फिरतात असे चित्र शहाजी बापू यांच्या व्हायरल क्लिपवरून सर्वसामान्यांच्या डोळ्यासमोर उभे राहते. सत्तासंघर्षादरम्यान आमदारांना निवडून देणाऱ्या मतदारांना त्यांचा विसर पडतो. मौजमज्जा करण्यासाठी लोकप्रतिनिधी कुठे ही, कुठल्याही स्तराला जावू शकतात, असा संभ्रम आणखी बळकट होण्यासाठी शहाजी बापूंच्या क्लिपमुळे भर पडली. त्यामुळे अशा आमदारांचा सर्वात अगोदर राजीनामा घेतला पाहिजे. किमान असे नेतृत्व नसल्याने जनमानसातील लोकप्रतिनिधींची प्रतिमा सुधारण्यात मदत होईल,असे हेमंत पाटील म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

डी. वाय. पाटील फार्मसी,नर्सिंगला विजेतेपद

डी. वाय. पाटील फार्मसी,नर्सिंगला विजेतेपद -डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ अंlतरमहाविद्यालय खो -खो स्पर्धा कोल्हापूर/प्रतिनिधी : डी.वाय.पाटील अभिमत विद्यापीठ अंतर्गत अंlतरमहाविद्यालय खो-खो स्पर्धेत मुलांच्या गटात डी.वाय...

मनोरंजनाची संगीतमय सफर घडवणारा ‘श्री गणेशा’ उद्या २० डिसेंबरला होणार प्रदर्शित

मनोरंजनाची संगीतमय सफर घडवणारा 'श्री गणेशा' उद्या २० डिसेंबरला होणार प्रदर्शित कोल्हापूर/प्रतिनिधी : कोणत्याही नवीन गोष्टीची सुरुवात 'श्री गणेशा' म्हणून केली जाते. सध्या रसिकांमध्येही अशाच...

विहिंप – बजरंग दलवतीने गीता जयंती निमित्त शौर्य सप्ताहनिमित्त संचलन

विहिंप - बजरंग दलवतीने गीता जयंती निमित्त शौर्य सप्ताहनिमित्त संचलन कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : विश्व हिंदू परिषद - बजरंग दल तर्फे संपुर्ण भारतात दरवर्षी...

जगप्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकिर हुसेन यांचे निधन

जगप्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकिर हुसेन यांचे निधन   कोल्हापूर/प्रतिनिधी : उस्ताद झाकीर हुसेन यांचा जन्म ९ मार्च, १९५१ रोजी झाला होता.तर वयाच्या ७३ व्या वर्षी त्याचे...

Recent Comments