आज उद्या होणाऱ्या शिवाजी विद्यापीठ परीक्षा रद्द
कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर सांगली आणि सातारा या जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूर परिस्थितीमुळे शिवाजी विद्यापीठाच्या दिनांक आज १० व उद्या ११ ऑगस्ट २०२२ रोजीच्या आयोजित करण्यात आलेल्या परीक्षा स्थगित करण्यात येत आहेत. या परीक्षांचे सुधारित वेळापत्रक स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार आहे.