श्री क्षेत्र जोतिबा येथे ऑगस्ट मध्ये रंगणार भव्य मॅरेथॉन
कोल्हापूर/प्रतिनिधी : रननिती तर्फे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दिनांक २१ ऑगस्ट २०२२ रोजी जोतिबा देवस्थान या ठिकाणी ‘जोतिबा दख्खन हिल हाफ मॅरेथॉन २०२२’ चे आयोजन करीत आहेत. हे स्पर्धेचे तिसरे वर्ष असून या मॅरेथॉन साठी देशभरातून तसेच विदेशातून स्पर्धक सहभागी होतील अशी अपेक्षा आहे.
श्री.क्षेत्र जोतिबा येथे धार्मिक ठिकाणी होणारी हि भारतातील एकमेव मॅरेथॉन स्पर्धा आहे. अवघ्या काही वर्षातच हि स्पर्धा ‘इंडियाज ओन्ली टेम्पल रन’ म्हणून नावारूपाला आलेली आहे. २१.१ किमी, १५ किमी, १० किमी आणि ५ किमी या विभांगामध्ये हि स्पर्धा पार पडेल.या स्पर्धेचा मार्ग – सुरुवात जोतिबा डोंगरावरून होऊन यमाई मंदिर, गिरोली घाट नंतर कोडोली रोड कडून परत जोतिबा डोंगरावर येऊन संपेल. सहभागी स्पर्धकांना टीशर्ट, मेडल, बॉटल, टाईमिंग बिब, सर्टिफिकेट आदी देण्यात येणार आहे.
या स्पर्धेच्या नावनोंदणीसाठी अधिक माहिती www.runniti.in या संकेतस्थळावर उपलब्ध असेल किंवा आनंद एजंसीज, कसबा बावडा येथे फॉर्म मिळतील. यावेळी जास्तीत जास्त लोकांनी या स्पर्धेमध्ये भाग घेण्याचे आवाहन रननिती चे संस्थापक विशाल गुडूळकर यांनी केले.