Wednesday, September 11, 2024
Home ताज्या कोल्हापुरातले ‘जयहिंद' आता अवतरणार नव्या रूपात २७ मे रोजी शोरूमचा शुभारंभ सोहळा...

कोल्हापुरातले ‘जयहिंद’ आता अवतरणार नव्या रूपात २७ मे रोजी शोरूमचा शुभारंभ सोहळा होणार

कोल्हापुरातले ‘जयहिंद’ आता अवतरणार नव्या रूपात २७ मे रोजी शोरूमचा शुभारंभ सोहळा होणार

आता कोल्हापुरकरांना पाहायला मिळणार जयहिंदचा नवा ‘फॅमिली लूक

कोल्हापूर/प्रतिनिधी : ब्रँडेड जेण्ट्स शॉपिंगसाठी कोल्हापुरात गेल्या १० वर्षांपासून नावाजलेल्या जयहिंदचा नवा अवतार आता पाहायला मिळणार आहे. पूर्वी फक्त पुरूषांच्या वस्त्रखरेदीसाठी पंचक्रोशीत सुप्रसिध्द असणारं हे नाव आता फॅमिली शॉपिंगसाठी देखील वाखाणलं जाणार आहे. कारण कोल्हापूरकरांच्या शाही पसंतीची दाद मिळवणारे जयहिंद कलेक्शन आता नव्या रूपात आणि नव्या दिमाखात सर्वांसमोर येत आहे.येत्या शुक्रवारी २७ मे रोजी दु. १२.३० वा राजारामपुरी चौकात असणाऱ्या जयहिंदच्या १५,००० स्क्वे. फुटांच्या आकर्षक शोरूमचा शुभारंभ सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या नव्या रूपातल्या प्रशस्त शोरूममध्ये शॉपिंगसाठी तब्बल ५ मजले सुसज्ज ठेवण्यात आले आहेत. या नव्या दालनचे प्रमुख आकर्षण म्हणजे जयहिंदमध्ये आता जेण्ट्स वेअर सोबतच वूमन्स वेअर व चिल्ड्रन्स वेअरही उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यामुळे जयहिंदचे हे नवं रूप आता संपूर्ण फॅमिलीला आकर्षित करणारं ठरेल यात शंकाच नाही.
या शोरूममध्ये  पुरूषांसाठी फॉर्मल्स, कॅज्युअल्स, फॅब्रिक्स, बीस्पोक टेलरिंग व ॲक्सेसरीज्‌च्या नावीन्यपूर्ण व्हरायटी असणार आहेतच. पण त्यासोबतच कोल्हापुरातल्या महिलांना आवडतील अशा वैविध्यपूर्ण वस्त्रांची श्रेणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. ज्यामध्ये महाराष्ट्राच्या पारंपारिक साड्यांपासून ते भारतीय शैलीतील विविध वस्त्रप्रकार असणार आहेत. रोजच्या वापरापासून ते सणसमारंभासाठीच्या पेहरावापर्यंत मोठी श्रेणी येथे पाहायला मिळणार आहे.
त्याचबरोबर वेस्टर्न प्रकारांमध्येही फॅशन व ट्रेंड सर्वासाठी इथे उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यासोबतच मुलांसाठी कॅज्युअल्स, वेस्टर्न व एथनिक प्रकारातील मोठी रेंज इथे असणार आहे. कोल्हापुरातील शाही समारंभासाठी जयहिंदचा ‘मेवार’ हा एथनिक वेअर ब्रँडही सर्वांसाठी नव्या दिमाखात सज्ज झालेला आहे. मेन्स व वूमेन्स एथनिक वेअरसाठी याठिकाणी २ स्वतंत्र स्टुडिओज्‌ देखील असणार आहेत.
त्यामुळे आता कोल्हापुरातल्या संपूर्ण कुटुंबाची वस्त्रखरेदी ही जयहिंदमध्ये करता येणार आहे. शुभारंभानिमित्त दि. २७ ते २९ मे या काळात खास ऑफर देण्यात आलेली असून यामध्ये रू. ५००० व पुढील खरेदीवर २५% किंमतीचे फ्री शॉपिंग व्हाऊचर्सही देण्यात येणार आहे.
या फॅमिली शॉपिंग बदलाबद्दल सांगताना जयहिंदचे संचालक श्री. दिनेश जैन यांनी काळाप्रमाणे, वस्त्रखरेदीचाही ट्रेंड बदलताना दिसत आहे. ग्राहक संपूर्ण कुटुंबासोबत शॉपिंगला अधिक प्राधान्य देतात व त्यामध्येही एकाच ठिकाणी ही सगळी खरेदी व्हावी अशी ग्राहकांची मानसिकता आहे, असे आमच्या संशोधनातून पुढे आले. त्यामुळेच कोल्हापुरातल्या पुरूष ग्राहकांना शॉपिंगचा आनंद देत असतानाच त्यांच्या कुटुंबासाठीही आमचे दालन सज्ज करून द्यावे आणि कोल्हापुरातल्या कुटुंबांचे शॉपिंग जयहिंदमध्ये व्हावे याच विचारातून हे जयहिंदचे नवे रूप आम्ही कोल्हापुरकरांसमोर आणले आहे असे सांगितले. मॉडर्न, फॅशनेबल व ट्रेडिशनल कपड्यांसाठी जयहिंद कोल्हापुरमध्ये सुप्रसिध्द आहेच. आता आगामी काळात फॅमिलीचे शॉपिंग डेस्टिनेशन म्हणून आमची नवी प्रतिमा लवकरच कोल्हापुरमध्ये उदयास येईल याची आम्हांला खात्री आहे. हे नवीन शोरूम जितके प्रशस्त आहे, तितकाच इथला शॉपिंगचा अनुभव आणि जयहिंदची सेवा सुखद असणार आहे. यासाठीच कोल्हापुरकरांनी या शोरूमच्या शुभारंभास येत्या शुक्रवारी २७ मे २०२२ रोजी यावे आणि या शोरूमचा अनुभव तसेच शुभारंभ ऑफरचाही लाभ घ्यावा, असे आवाहन जयहिंदचे संचालक श्री. दिनेश जैन यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

श्रीमती कल्पना घाटगे या पर्यावरणचा संदेश देत आपल्या घरी ३५ वर्षापासून करत आहेत सुपारीची गणेश पूजा

श्रीमती कल्पना घाटगे या पर्यावरणचा संदेश देत आपल्या घरी ३५ वर्षापासून करत आहेत सुपारीची गणेश पूजा कोल्हापूर/प्रतिनिधी : आज महिला विविध क्षेत्रात आपला नावलौकिक दाखवून...

श्रीमती कल्पना घाटगे या पर्यावरणचा संदेश देत आपल्या घरी ३५ वर्षापासून करत आहेत सुपारीची गणेश पूजा

श्रीमती कल्पना घाटगे या पर्यावरणचा संदेश देत आपल्या घरी ३५ वर्षापासून करत आहेत सुपारीची गणेश पूजा कोल्हापूर/प्रतिनिधी : आज महिला विविध क्षेत्रात आपला नावलौकिक दाखवून...

वकिलीसाठी आत्मविश्वास महत्त्वाचा – ॲड.उज्वल निकम

वकिलीसाठी आत्मविश्वास महत्त्वाचा - ॲड.उज्वल निकम घोडावत विद्यापीठात 'लाॅ' विभागाचे उदघाटन अतिग्रे/प्रतिनिधी : कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना वकिली करताना आत्मविश्वास महत्त्वाचा असतो. वाचन आणि कष्टाने कायद्याची...

Recent Comments