देव-देवतांची मंदिरे ही जनतेची श्रद्धास्थाने – ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे प्रतिपादन
कडगावमध्ये संत शिरोमणी श्री. नामदेव महाराज मंदिराचे लोकार्पण उत्साहात
कडगाव/प्रतिनिधी : विविध समाजांच्या देव-देवतांची मंदिरे ही जनतेची श्रद्धास्थाने आहेत, असे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. कडगाव ता. गडहिंग्लज येथे संत शिरोमणी श्री. नामदेव महाराज मंदिराच्या लोकार्पण समारंभात मंत्री श्री. मुश्रीफ प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. मंत्री श्री मुश्रीफ यांच्या निधीतून या मंदिराची उभारणी झाली आहे.भाषणात मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, देव-देवतांवरील श्रद्धा आणि भक्तीमुळेच समाजात नीतिमत्ता टिकून आहे. ही नितीमता नसती तर मानव आणि दानव यातील फरकच कळला नसता, असेही ते म्हणाले.
“पाणी आंबेेओहळचे…….”
मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, सव्वा टीएमसी साठवण क्षमतेचा आंबेओहोळ प्रकल्प तुडुंब भरलेला आहे. या प्रकल्पाच्या पाण्यावर वैयक्तिक, शेतकरी मंडळाच्या आणि सामुदायिक अशा प्रकारच्या पाणी योजना तयार करून हरितक्रांती करूया. या योजनांसाठी लागणारे आर्थिक सहकार्य सर्वतोपरी करू. वैयक्तिक, शेतकऱ्यांनी मिळून शेतकरी मंडळाच्या पाणीयोजना उभारण्यासाठी केडीसीसी बँकेच्या माध्यमातून आर्थिक सहकार्य करू. सामुदायिक मोठ्या पाणी योजना उभारण्यासाठी सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याच्या हमीवर अर्थपुरवठा करू.यावेळी जिल्हा परिषद सदस्य सतीश पाटील -गिजवणेकर, सरपंच संजय बटकडली, नेताजी पाटील, बंटी पाटील, सदानंद पाटील आनंदा पाटील, यांच्यासह नागरिक व माता भगिनी आदी प्रमुख उपस्थित होते. स्वागत नेताजी पाटील यांनी केले.
कडगाव ता. गडहिंग्लज येथे संत शिरोमणी श्री. नामदेव महाराज मंदिराचे लोकार्पण मोठ्या उत्साहात झाले. यावेळी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या समवेत उपस्थित माता- भगिनी व ग्रामस्थ.