Monday, July 15, 2024
Home ताज्या आंबा जत्रेत तब्बल तीन दिवसापर्यंत २२ मेट्रिक टन आंब्यांची विक्री २२ लाखांपेक्षा...

आंबा जत्रेत तब्बल तीन दिवसापर्यंत २२ मेट्रिक टन आंब्यांची विक्री २२ लाखांपेक्षा अधिक रक्कमेची उलाढाल,उद्या शेवटचा दिवस

विविध प्रजातींच्या आंब्यांची रेलचेल असणाऱ्या आंबा जत्रेला कोल्हापूरकरांचा उदंड प्रतिसाद

तब्बल तीन दिवसापर्यंत २२ मेट्रिक टन आंब्यांची विक्री २२ लाखांपेक्षा अधिक रक्कमेची उलाढाल-*,*उद्या शेवटचा दिवस

आंबा खरेदीसाठी तीन दिवस शाहू मिल आवारात जत्रेचे स्वरूप

उत्पादकांनी मानले जिल्हा प्रशासन व पणन विभागाचे आभार

कोल्हापूर/ प्रतिनिधी : आब्यांच्या अनेक प्रजातींची चव पहायची असेल तर चला शाहू मिल येथे कोल्हापूर येथील शाहू मिल येथे आयोजित आंब्याची जत्रा यास गेली तीन दिवसांपासून कोल्हापूरकरांनी उदंड प्रतिसाद हा दिला आहे. लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्व अंतर्गत शाहू मिल येथे आयोजित आंब्याच्या जत्रेचा उद्या रविवारी २२ मे शेवटचा दिवस आहे तरी कोल्हापूरकरांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे.
लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या स्मृतीशताब्दी निमित्त जिल्हा प्रशासनाच्या वतीने कोल्हापुरात कृतज्ञता पर्वाचे आयोजन करण्यात आले आहे. या पर्वात श्री शाहू छत्रपती मिलमध्ये शाहू महाराजांच्या विचारावर आधारित विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. दरम्यान आजपासून उत्पादक ते ग्राहक थेट विक्री अंतर्गत ‘जत्रा आंब्याची’ या उपक्रमाला गेल्या तीन दिवसांपासून सुरुवात करण्यात आली आहे उद्या रविवार या आंबा जत्रेचा शेवटचा दिवस आहे.       राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे कार्य नव्या पिढी पुढे नेण्यासाठी हे कृतज्ञता पर्व आयोजित केले आहे. विविध उपक्रमांबरोबरच विकेल ते पिकेल व या संकल्पनेवर आधारित ‘जत्रा आंब्याची’ घेण्यात येत आहे. बांधावरुन थेट ग्राहकांपर्यंत या संकल्पनेतून जत्रा आंब्याची अंतर्गत उत्पादकांच्या आंब्याला शाहू मिल येथे थेट बाजारपेठ उपलब्ध करून दिली आहे याला तीन दिवसात प्रचंड प्रतिसाद हा मिळाला असून माफक दरात उपलब्ध केलेल्या या आंबा जत्रेला कोल्हापूरकर भेट देऊन प्रचंड आंबा खरेदी करत आहेत.
या आंब्याच्या जत्रेत विविध प्रजातीचा आंबा म्हणजेच देवगड हापूस, रत्नागिरी हापूस, पायरी, बिटक्या यांसह केंट, कोकण सम्राट, रत्ना, बारमासी, दशेहरी, फरणांडीन, दुधपेढा, गोवा मानखुर, तोतापुरी, ऑस्टिन, लिली, नीलम आदी सह वनराज व किट हे शुगर फ्री प्रजातीचे आंबे या जत्रेत उपलब्ध आहेत.यातील सर्वच आंब्याची मोठ्या प्रमाणात विक्री ही झाली असून पहिल्या दिवशी तब्बल ६ मेट्रिक टन आंबा विक्री व उलाढाल ही सव्वासहा लाख रुपये इतकी झाली आहे.तर दुसऱ्या दिवशी साडेचार मेट्रिक टन विक्री तर ४ लाख ८० हजार उलाढाल ही झाली होती तर आज तिसऱ्या दिवशी साडेअकरा टन मेट्रिक टन आंबा विक्री ११ लाख ४० हजार आंब्याची उलाढाल ही झाली आहे.

एकूण तीन दिवसात तब्बल २२ मेट्रिक टन आंबा विक्री व २२ लाख ५० हजारची उलाढाल ही झाली आहे

आंब्यांच्या जत्रेत १८ हून अधिक प्रजातींचे आंबे विक्रीसाठी ठेवण्यात आले असून तिसऱ्या दिवसाअखेर ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे आंबा उत्पादकांनी सांगितले. याठिकाणी १८ उत्पादकांचे १८ स्टॉल लावण्यात आले आहेत. यामध्ये तिसऱ्या दिवसाअखेर तब्बल २२ मेट्रिक टन आंब्यांची विक्री झाली असून यातून सुमारे २२.५० लाखांहून अधिक रक्कमेची उलाढाल झाली असल्याची माहिती पणन विभागाचे उप सरव्यवस्थापक डॉ.सुभाष घुले यांनी दिली.या तीन दिवसात हापूस,केशर व पायरी या आंब्याची मोठ्या प्रमाणात विक्री झाल्याचे डॉ. घुले यांनी सांगितले.

आंबा खरेदीसाठी कोल्हापूरकरांनी तिसऱ्या दिवसा अखेर उदंड प्रतिसाद देत आंबा उत्पादकांना कोल्हापूरकरांनी उत्साहित केले

मोठ्या प्रमाणावर आंबा विक्री झाल्यामुळे आंबा उत्पादक भारावून गेले

उत्पादकांनी मानले जिल्हाधिकारी व पणन विभागाचे आभार-

आंबा उत्पादकांना थेट ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची संधी उपलब्ध करुन दिल्यामुळे अपेक्षेपेक्षा जास्त उलाढाल झाल्यामुळे आंबा उत्पादकांनी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचे आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

कोल्हापूरमधील प्रसिद्ध व्यावसायिक हेमंत शहा,मदन भंडारी आणि प्रताप कोंडेकर यांनी चक्क ७० दिवसात कोल्हापूर ते लंडन केला २० देशांचा थरारक प्रवास

सेव्ह वॉटर सेव्ह नेचर.... या 'कोल्हापूर ते लंडन' या जनजागृती संदेश यात्रेच्या माध्यमातून कोल्हापूरच्या चार मित्रांनी कोल्हापूरचे नाव कोरले लंडनच्या हृदयावर कोल्हापूरमधील प्रसिद्ध व्यावसायिक हेमंत...

कोल्हापूरच्या उघोग विश्वाची होणार नवी रोजगार उपलब्धीसह विधायक ओळख – व्यवस्थापकीय संचालक तुषार शेळके

जगप्रसिद्ध ब्रीक्स्टन मोटरसायकल्स आणि व्ही एल एफ इलेक्ट्रिक टू-व्हीलर्स भारतात संयुक्त निर्मिती सह वितरीत करण्यासाठी केएस डब्ल्यू वेलोसे मोटर्स सज्ज कोल्हापूरच्या उघोग विश्वाची होणार नवी...

रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाऊनच्या अध्यक्षपदी सौ. अरूंधती महाडिक तर उपाध्यक्षपदी मिरा कुलकर्णी यांची निवड

रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाऊनच्या अध्यक्षपदी सौ. अरूंधती महाडिक तर उपाध्यक्षपदी मिरा कुलकर्णी यांची निवड कोल्हापूर/प्रतिनिधी : रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनच्या अध्यक्षपदी सौ....

नेहरूनगर येथील दत्त भक्त मंडळाने सामाजिक बांधिलकी जपत केली मिरजकर तिकटी येथील अंधशाळेस आर्थिक मदत

नेहरूनगर येथील दत्त भक्त मंडळाने सामाजिक बांधिलकी जपत केली मिरजकर तिकटी येथील अंधशाळेस आर्थिक मदत कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर येथील आयसोलेशन हॉस्पिटल परिसरातील श्री दत्त मंदीर...

Recent Comments