शाहू मिल मधील कापड जत्रा १० रोजी सुरु राहणार – जिल्हाधिकारी राहुल रेखावार
कापड खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी
कोल्हापूर, दि. ९ (जिमाका): शाहू मिल येथील कापड जत्रेमध्ये अत्यंत चांगले आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे कापड फॅक्टरीच्या व घाऊक दरात उपलब्ध आहे. या प्रदर्शनाला प्रचंड गर्दी झाली असून ग्राहकांच्या आग्रहास्तव मंगळवार, दि.१० मे रोजीही कापड जत्रा सुरु राहील, अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिली आहे.
शाहू मिलमध्ये ७ ते ९ मे दरम्यान कापड जत्रेचे आयोजन करण्यात आले होते. कोल्हापूरकरांच्या भरघोस प्रतिसादामुळे मंगळवारी देखील प्रशासनाने ग्राहकांना कापड खरेदीची संधी उपलब्ध करुन दिली आहे. खादी, लीनन, कॉटन, डेनिम, सॅटिन, सॅटिन कॉटन, सीपॉन, सिंथेटिक अशा कापडाचे अनेक प्रकार याठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध आहेत.आयपीएमसी, ओशन फॅब, क्रिस्टल लीनन, गंगा अपिरल्स, सोना फॅब्रिक्स, इचलकरंजी टेक्सटाईल प्रायव्हेट लिमिटेड, विद्याज बटवा कलेक्शन, कर्णीज फॅब्रिक्स, बीएपीएस गारमेंट आणि ऍडॉरेबल व्हाईट कलेक्शन, रामकृष्ण ग्रुप आणि अनेक नामवंत उद्योजकांचे स्टॉल याठिकाणी आहेत.