Friday, December 13, 2024
Home ताज्या कोल्हापुरात प्रथमच मलिक अँम्युझमेंट रोबोट ॲनिमल नगरी आयर्विन ख्रिश्चन ग्राउंडवर उभी,कोल्हापूरकरांनी भेट...

कोल्हापुरात प्रथमच मलिक अँम्युझमेंट रोबोट ॲनिमल नगरी आयर्विन ख्रिश्चन ग्राउंडवर उभी,कोल्हापूरकरांनी भेट दयावी संयोजकांचे आवाहन  

कोल्हापुरात प्रथमच मलिक अँम्युझमेंट रोबोट ॲनिमल नगरी आयर्विन ख्रिश्चन ग्राउंडवर उभी

आता ३१ मे पर्यंतच कोल्हापूरकरांनी भेट दयावी संयोजकांचे आवाहन

कोल्हापूर/प्रतिनिधी : पूर्वीच्या काळी लोकवस्ती दाठ नव्हती त्यामुळे माणूस आणि पशु पक्षी व अन्य प्राणी एकत्र वावरत होती.अलीकडे यामध्ये खूपच बदल झालेला आहे.आता माणसांनाच प्राण्यांची भीती वाटत आहे.शिवाय जंगल तोडीमुळे प्राणी मानवी वस्तीत येत आहेत तर मोठमोठ्या इमारती,मोबाईल टॉवर यामुळे पक्षांच्या वावरण्यावर गदा येत आहेत.काही तर बघायलाही मिळत नाहीत अशा या प्राण्यांना व पक्षांना एकत्र पाहण्याची व त्यांचा आवाज एकण्याची संधी आता कोल्हापूरकरांना मिळत आहे.येथील आयर्विन ख्रिश्चन हायस्कुल मैदान येथे महाराष्ट्रातील प्रथमच डीजे अँम्युझमेंट पार्क,रोबोटीक बर्डस शो असणारी अँनिमल नगरी उभी करण्यात आली आहे.ज्याद्वारे प्राणांसोबत,पक्षांसोबत व खेळाच्या विविध साधनांमधून धमाल मस्ती करायला मिळत आहे. अशी माहिती व्यवस्थापक जयराज व कपिल मलिक यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सांगली जिह्यातील कपिल मलिक यांच्याद्वारे ही नगरी उभी करण्यात आली आहे.या नगरीमध्ये कोल्हापूरकरांना निर्जीव प्राण्यांमध्ये व पक्षांमध्ये जिवंतपणा असल्याचे पहावयास मिळणार आहे.”सेल्फी आर्ट गॅलरी” शिवाय स्टॉलच्या माध्यमातून खाद्यपदार्थ खाण्याची संधी याठिकाणी उपलब्ध झाली आहे. खेळाच्या माध्यमातून धमाल मस्ती करता येणार आहे. याठिकाणी उभ्या करण्यात आलेल्या जंगलात वेगवेगळे प्राणी जसे हत्ती, हरण आदिवासी लोक पहावयास मिळत आहेत. तर पक्षांमध्ये पोपट,घुबड, कोकिळा,शहामृग,राजा गिधाड,सुतार पक्षी,क्रेन, ब्ल्यू विनिद कुकबुरा,डायनसोर पक्षी,चमच्या सारखा तोंडाचा पक्षी,कबुतर,उत्तरेकडील उडू न शकणारा पक्षी,हत्तीसारखा पक्षी,ऑस्ट्रेलियन पोपट,तितर पक्षींण, पेंग्विन आदी पहावयास मिळत आहेत. शिवाय प्राण्यांमधील व पक्षांमधील जिवंतपणा ही पहावयास मिळणार आहे. सेल्फी आर्ट गॅलरी मधून प्रत्यक्ष स्वतःचा फोटो काढता येणार आहे यामध्ये याठिकाणी मदर तेरेसा,मोनालीसा,वाघ,छत्री,चार्ली चॅपलीन अशा बऱ्याच चित्रांचा समावेश आहे याचबरोबर याठिकाणी खेळणी महिलाना लागणारे साहित्य किचन साहित्य आदी विक्रीसाठी २५ स्टॉल मांडण्यात आले आहेत. त्याची खरेदी करता येणार आहे तरी या ठिकाणी उभ्या करण्यात आलेल्या या मनोरंजन नगरीत खेळण्यांमध्ये मोठ्यासाठी जॉईंट व्हील,ब्रेक डान्स,कोलंबस,ड्रॅगन ट्रेन,टोरा टोरा,आकाश पाळणा व लहान मुलांसाठी मोटरसायकल, ड्रॅगन ट्रेन, क्लास वेल पाळणे पाण्यातील कोलंबस,मिकी माउस असे विविध प्रकारचे खेळाचे साहित्य उपलब्ध करण्यात आले आहे. या सर्व नगरीमध्ये शंभर जणांची टीम कार्यरत असून कोल्हापूरमध्ये या नगरीच्या माध्यमातून आता केवळ एक महिने मनसोक्त धमाल-मस्ती कोल्हापूरकरांना करता येणार आहे.ही नगरी सायंकाळी ५ ते रात्री १० वाजेपर्यंत सुरू राहणार  असलेल्या या नगरीचा आनंद आता केवळ ३१ मे पर्यंत घेता येणार आहे.तरी कोल्हापूरकरांनी याठिकाणी भेट द्यावी असे आवाहन संयोजकानी केले आहे.यावेळी पत्रकार परिषदेला राजू अनिगिरी,लोकेश सीए,सादिक नाईक,गणेश इंगवले आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

आमदार राजेश क्षीरसागर फौंडेशनच्या वतीने सौंदत्ती डोंगरावर मोफत आरोग्य शिबीरासह अल्पोपहार वाटपाचे आयोजन

आमदार राजेश क्षीरसागर फौंडेशनच्या वतीने सौंदत्ती डोंगरावर मोफत आरोग्य शिबीरासह अल्पोपहार वाटपाचे आयोजन कोल्हापूर/प्रतिनिधी : कर्नाटकात होणाऱ्या सौंदत्ती यात्रेसाठी दरवर्षी कोल्हापुरातून हजारो भाविक जातात. सौंदत्ती...

कोल्हापूरचे ग्रामदैवत श्री कपिलेश्वर मंदिरा भोवतीचे अतिक्रमण तातडीने काढण्यात यावे – भाजपाच्या वतीने उपायुक्त श्रीमती साधना पाटील यांना निवेदन सादर

कोल्हापूरचे ग्रामदैवत श्री कपिलेश्वर मंदिरा भोवतीचे अतिक्रमण तातडीने काढण्यात यावे – भाजपाच्या वतीने उपायुक्त श्रीमती साधना पाटील यांना निवेदन सादर कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूरचे ग्रामदैवत श्री...

इंटरनॅशनल सायन्स फेस्टिव्हलमध्ये घोडावत स्कूलच्या विद्यार्थ्यांचे यश

इंटरनॅशनल सायन्स फेस्टिव्हलमध्ये घोडावत स्कूलच्या विद्यार्थ्यांचे यश   अतिग्रे/प्रतिनिधी : संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या सीबीएसई बोर्डिंगच्या विद्यार्थ्यांनी आय आय टी गुवाहाटी येथे आयोजित 'इंडिया इंटरनॅशनल सायन्स...

प्रभु श्रीरामाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी इल्तिजा मुफ्तींवर कायदेशीर कारवाई करा – हिंदु जनजागृती समिती

प्रभु श्रीरामाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी इल्तिजा मुफ्तींवर कायदेशीर कारवाई करा - हिंदु जनजागृती समिती   कोल्हापूर/प्रतिनिधी : मेहबुबा मुफ्ती यांच्या सरकारच्या कार्यकाळात काश्मीरमध्ये हिंदूंवर जो अत्याचार...

Recent Comments