देवस्थान समितीकडे चांदीचा कमरपट्टा सुपूर्द
कोल्हापूर/प्रतिनिधी : येथील सराफ व्यावसायिकांनी आज देवस्थान समितीकडे दिलेल्या करवीर निवासिनी अंबाबाईच्या मूर्तीसाठी चांदीचा कमरपट्टा सुपूर्द केला.
कोल्हापूर सराफ व्यापारी संघाच्या वतीने देवस्थान समितीकडे ५१ किलो चांदीची मूर्ती दिली आहे. त्या मूर्तीसाठी १९८.१३० वजनाचा कमरपट्टा पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडे सुपूर्द केला. समितीच्या वतीने सचिव शिवराज नाईकवाडे यांनी त्याचा स्वीकार केला. यावेळी कोल्हापूर सराफ व्यापारी संघाचे माजी अध्यक्ष कुलदीप गायकवाड, दिनकर लाळगे, अमर पाटील, जयसिंग हिलगे, ऋषीकेश पाटील, सौ. दीपा लाळगे व कारागीर अभिजित देवरूखकर आदी उपस्थित होते.