लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी कृतज्ञता पर्व निमित्त आयोजित प्रश्नमंजुषा स्पर्धा संपन्न
कोल्हापूर/ (भाग्यश्री सुगंधी) : लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी कृतज्ञता पर्व निमित्त निमित्त प्रश्नमंजुषा स्पर्धा उषाराजे हायस्कूल येथे पार पडल्या. स्पर्धेमध्ये प्रत्येक गटात ८ वी ते १० वी चे ६ शाळांचे विद्यार्थी स्पर्धक सहभागी झाले होते.
प्रश्नमंजुषा स्पर्धेमध्ये उषाराजे हायस्कूल कोल्हापूर,चाटे स्कूल , कोल्हापूर,भाई माधवराव बागल हायस्कूल कोल्हापूर, वि.स.खांडेकर हायस्कूल व नानासाहेब गद्रे हायस्कूल कोल्हापूर करवीर प्रशाला कोल्हापूर हे सहा संघ सहभागी झाले होते. प्रश्न मंजूषा स्पर्धा अत्यंत अटीतटीच्या होत्या.
सदर स्पर्धेमध्ये
प्रथम क्रमांक: –
उषाराजे हायस्कूल कोल्हापूर येथील नीरजा निळकंठ वाळवी प्राजक्ता सचिन यादव ,सुहानी सिद्धाप्पा लोखंडे
द्वितीय क्रमांक –
चाटे स्कूल ,कोल्हापूर येथील अनुष्का वसंत जाधवर ,तृप्ती सुभाष कुंभार,वेदांत सचिन महाजन
यांनी प्राप्त केला.यामध्ये उषाराजे हायस्कूलच्या संघाची शहर स्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
स्पर्धा निरीक्षक म्हणून श्री.राहुल टिपुगडे, वेळ नियंत्रक
श्री.ए.जी.पाटी, गुण नोंदक, सौ.एस.एस.पाटील,
प्रश्न कर्ता ,श्री आर.एम.कवठे सर व सौ.एस.डी.चव्हाण
यांनी काम पाहिले स्पर्धा सुरळीत पार पडण्यास मोलाचे सहकार्य केले.या प्रश्नमंजुषा स्पर्धेचे संयोजन पर्यवेक्षक श्री .एस.के.मिठारी यांनी केले तर शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.ए.यू.साठे यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले