विज्ञान प्रदर्शनात माध्यमिक सहविचार मंच स्तरावर विराज विभूते आणि मिश्का चौगुले यांची तालुका स्तरावर निवड
कोल्हापूर / (भाग्यश्री सुगंधी) : लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी कृतज्ञता पर्व निमित्त उषाराजे हायस्कूल येथे तारीख २९ एप्रिल २०२२ रोजी माध्यमिक सहविचार मंच स्तरावर विज्ञान प्रदर्शन आयोजित केले होते.या विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन उपमुख्याध्यापिका सौ. चौधरी एस.डी. यांच्या हस्ते करण्यात आले.
या सहविचार मंच स्पर्धेत चाटे हायस्कूल, श्री माधवराव बागल हायस्कूल, उषाराजे हायस्कूल, वि. स. खांडेकर हायस्कूल सहभागी झाले होते.
सहभागी झालेल्या स्पर्धकांना मध्ये दोन नंबर काढण्यात आले आहे. यामध्ये प्रथम क्रमांक वि. स. खांडेकर प्रशाला, कोल्हापूर येथील विराज राजाराम विभुते”. आणि द्वितीय क्रमांक उषाराजे हायस्कूल, कोल्हापूर येथील “मिश्का देवेंद्र चौगुले” असे दोन यशस्वी विद्यार्थी आहेत यांची निवड तालुका स्तरावर झाली आहे.या सर्व शाळांसाठी परीक्षक म्हणून कमला कॉलेज येथील श्री. जाधव सर, सौ. मोठे मॅडम आणि डी.एड. कॉलेज येथील ताराराणी विद्यापीठाचे श्री पोदार सर यांनी काम पाहिले.