डॉ. आंबेडकरांना अन्याय आणि अत्याचाराविरुद्ध चीड होती – ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे प्रतिपादन
शिपुर तर्फ आजरा ता. गडहिंग्लज येथे डॉ. आंबेडकर जयंती निमित्त अभिवादन
गडहिंग्लज/प्रतिनिधी : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अस्पृश्य समाजावर होणाऱ्या अन्याय आणि अत्याचाराविरुद्ध प्रचंड चीड होती, असे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. त्या जाणिवेतूनच त्यांनी शिका, संघर्ष करा आणि संघटित व्हा अशी प्रेरणा दिली, असेही ते म्हणाले.
शिपुर तर्फ आजरा ता. गडहिंग्लज येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती व विकासकामांचा लोकार्पण सोहळा अशा संयुक्त कार्यक्रमात मंत्री श्री. मुश्रीफ प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सौ. गीतांजली राशिवडे होत्या.
सुरुवातीला मंत्री श्री. मुश्रीफ व प्रमुख मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. तसेच ग्रामपंचायत इमारतीसह साडेसात कोटी रुपये निधीच्या विकास कामांचे लोकार्पणही झाले. मंत्री श्री. मुश्रीफ यांनी गावासाठी नवीन एक कोटींची कामे मंजूर केल्याची घोषणाही यावेळी केली.
“पहिले बॅरिस्टर……..”
मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म अत्यंत गरीब कुटुंबात झाला. त्याकाळी अस्पृश्यता एवढी टोकाला गेली होती की, मागास समाजाच्या मुलांनी शिक्षण घेणे कठीण होऊन बसले होते. परंतु; डॉ. बाबासाहेबांनी परदेशात जाऊन कायद्याचे शिक्षण घेतले. त्याकाळी मागास समाजातून बॅरिस्टर होणारे ते देशातील पहिले होते.यावेळी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सतीश पाटील -गिजवणेकर, भाई पताडे, सरपंच सौ. गीतांजली राशिवडे, उपसरपंच जितेंद्र कांबळे, पांडुरंग राशिवडे, राजश्री कोकितकर, सविता कांबळे, पांडुरंग शेवाळे, मारुती हारळे, भीमराव कानडे, विनोद पाटील, गणपती पाटील, बाबुराव भोसले, विजय परीट, भगवान कांबळे, संजय कांबळे, बाबा जाधव आदी प्रमुख उपस्थित होते.स्वागत व प्रास्ताविक उपसरपंच जितेंद्र कांबळे यांनी केले.