Sunday, January 19, 2025
Home ताज्या स्वरांनी बहरली शाहू मिल; श्रोते मंत्रमुग्ध

स्वरांनी बहरली शाहू मिल; श्रोते मंत्रमुग्ध

स्वरांनी बहरली शाहू मिल; श्रोते मंत्रमुग्ध

कोल्हापूर/प्रतिनिधी : लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू स्मृती शताब्दी कृतज्ञता पर्वानिमित्त शाहू मिल येथे आयोजित संगीत दरबारात शास्त्रीय गायन, सुमन संगीत, नाट्य गायन व वाद्य संगीताच्या स्वरांनी शाहू मिल बहरली.. गायनाचा अस्वाद घेताना श्रोते मंत्रमंग्ध झाले.. शाहू मिल परिसरात या गायनाचा नाद घुमला.. निमित्त होते, संगीत स्वरांजली कार्यक्रमाचे..!
लोकराजाच्या स्मृती शताब्दी कृतज्ञता पर्वानिमित्त शिवाजी विद्यापीठाच्या संगीत व नाट्यशास्त्र विभाग, गुणीदास फाउंडेशन आणि गायन समाज देवल क्लब यांच्यावतीने शाहू मिल येथे ‘स्वरांजली लोकराजाला’ हा संगीत दरबार कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात मृणालिनी परुळेकर यांच्या व्हायोलिन वादनाने झाली. कार्यक्रमात गुरुनाथ ढोले, प्रदिप जिरगे, भूषण साठम, ऋतिक साठम यांनी वाद्यवृंद, गौतमी चिपळूणकर आणि पं.विनोद डिग्रजकर यांनी शास्त्रीय गायन, डॉ. भाग्यश्री मुळ्ये, महेश हिरेमठ, शुभांगी जोशी, करण कागले यांनी सुगम संगीत सादर केले. गिरीधर कुलकर्णी व अतुल ताडे यांनी तबला साथ, अभिषेक पुरोहित, स्वरुप दिवाण यांनी हार्मोनियमची साथ तर मंगेश सारंग यांनी कीबोर्ड साथ दिली. या मान्यवरांनी आपल्या कलेतून लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना आदरांजली वाहिली.लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी सर्व कलांना राजाश्रय दिल्यामुळेच कोल्हापूर हे ‘कलेचे माहेरघर’ बनले. त्यामुळेच कोल्हापूरची कलापूर म्हणून स्वतंत्र ओळख निर्माण झाल्याचे दिसून येते.संगीत दरबार कार्यक्रमाप्रसंगी ज्येष्ठ शास्त्रीय गायक विनोद डिग्रजकर, शिवाजी विद्यापीठाचे विनोद ठाकूर-देसाई, निखील भगत, गुणीदास फाउंडेशनचे राजप्रसाद धर्माधिकारी व शिरीष सप्रे, देवल क्लबचे दिलीप गुणे,श्रीकांत डिग्रजकर,सचिन पुरोहित यांच्या हस्ते लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

कंदमुळे आणि औषधी वनस्पतींचे भव्य प्रदर्शन १८ आणि १९ जानेवारी २०२५ रोजी

कंदमुळे आणि औषधी वनस्पतींचे भव्य प्रदर्शन १८ आणि १९ जानेवारी २०२५ रोजी १०० हून अधिक कंदमुळे आणि १५० हून अधिक औषधी वनस्पती होणार प्रदर्शित   कोल्हापूर/प्रतिनिधी :...

संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या वार्षिक क्रीडा स्पर्धा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न

संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या वार्षिक क्रीडा स्पर्धा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न कोल्हापूर/प्रतिनिधी : संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या डिप्लोमा अभियांत्रिकी, शॉर्ट-टर्म विभाग, आयटीआय सर्व शाखांच्या क्रीडा स्पर्धा २०२४-२५ इन्स्टिट्यूटचे...

ट्रेनिंग फॉर ट्रेनर्स” या CBSE प्रशिक्षण कार्यक्रमाचे संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलमध्ये आयोजन

ट्रेनिंग फॉर ट्रेनर्स" या CBSE प्रशिक्षण कार्यक्रमाचे संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलमध्ये आयोजन   कोल्हापूर/प्रतिनिधी : संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल, कोल्हापूर येथे "ट्रेनिंग फॉर ट्रेनर्स" या सीबीएसई...

सीमा लढ्याच्या खटल्यात महाराष्ट्र सरकारने अनास्था दूर करून मराठी भाषिकांना न्याय द्यावा ! – मनोहर किणेकर, महाराष्ट्र एकीकरण समिती

सीमा लढ्याच्या खटल्यात महाराष्ट्र सरकारने अनास्था दूर करून मराठी भाषिकांना न्याय द्यावा ! - मनोहर किणेकर, महाराष्ट्र एकीकरण समिती कोल्हापूर, १७ जानेवारी (वार्ता.) - महाराष्ट्र...

Recent Comments