केआयआयटीमध्ये पायनियर २०२२ चे २४ आणि २५ एप्रिल रोजी आयोजन
दोन हजार विद्यार्थ्यांमध्ये रंगणार दोन दिवस राष्ट्रीय स्तरावरील तांत्रिक स्पर्धा
कोल्हापूर/प्रतिनिधी : केआयटीचे अभियांत्रिकी महाविद्यालय कोल्हापूर मध्ये इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशन स्टुडंट चॅप्टर अंतर्गत सालाबाद प्रमाणे याहीवर्षी पायोनियर २०२२ चे राष्ट्रीय स्तरावरील तंत्र स्पर्धेचे आयोजन येथे २४ आणि २५ एप्रिल रोजी करण्यात आलेले आहे. यावर्षीची हे स्पर्धेचे रौप्यमहोत्सवी आता २५ वे वर्ष असून यामध्ये अभिव्यक्ती -आंतरविद्याशाखीय शोधनिबंध स्पर्धा आणि प्रकल्प तांत्रिक विषयावरील प्रकल्पांचे सादरीकरण या दोन स्पर्धांबरोबर प्रत्येक विभागामार्फत विविध तांत्रिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती संचालक डॉ.एम. एम. मुजुमदार, डॉ. विलास कार्जीनी,प्रा. अभिजीत पाटील, पायोनियर समन्वयक डॉ. जितेंद्र भाट, विद्यार्थी उपक्रम अधिष्ठाता डॉ. अक्षय थोरवत,आयएसटीई फॅकल्टी स्टुडंट्स चॅप्टरचे विद्यार्थी अध्यक्ष सारस गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिली. २४ एप्रिल रोजी होणाऱ्या उद्घाटन समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरचे कुलगुरू प्राध्यापक डॉ.डी. टी.शिर्के हे उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर या कार्यक्रमास मर्सिडीज बेंझचे जनरल मॅनेजर डॉ. उन्मेष देशपांडे हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी ‘अभिव्यक्ती’ व ‘प्रकल्प’ या मुख्य स्पर्धा पार पडणार आहेत. अभिव्यक्ती या स्पर्धेत स्पर्धक विद्यार्थ्यां हे निरनिराळ्या आंतरविद्याशाखीय विषयांवरील त्यांचे शोधनिबंध आहे विविध क्षेत्रांशी संबंधित नवकल्पना, संशोधन, उपयुक्तता आणि आव्हाने यांच्या माध्यमातून सादर करतील. तसेच प्रकल्प या स्पर्धेत एकूण ५ गटांत विभागवार स्पर्धक विद्यार्थी हे त्यांनी केलेल्या तांत्रिक विषयावरील प्रकल्प वर्किंग मॉडेल्स, पोस्टर्स आणि प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून सादर करणार आहेत. दि. २५ एप्रिल रोजी बायोटेक्नॉलॉजी इंजिनिअरिंग विभागाकडून ‘शार्क टॅंक – स्टार्ट अँन्ड बिझनेस आयडिया, सिव्हिल अँन्ड एन्व्हायर्नमेंटल इंजीनियरिंग विभागाकडून क्विज अँन्ड टेक्निकल प्रेझेन्टेशन,सिव्हिल इंजिनिअरिंग विभागाकडून निर्मिती टेक्निकल डॉक्युमेंटरी, इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग विभागाकडून डाइव्ह इन सर्किट – बिल्ड द सर्किट, कॉम्प्युटर सायन्स अँन्ड इंजिनिअरिंग विभागाकडून मल्टिवर्स ऑफ कोडिंग – कोडिंग अँन्ड प्रोग्रॅमिंग, इलेक्ट्रिकल्स अँन्ड टेलिकम्युनिकेशन्स विभागाकडून बिग आयडिया – प्रेझेंटेशन अँन्ड आयडिया टिचिंग आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागाकडून कँडवेंजर्स – क्विज अँन्ड इंजीनियरिंग ड्रॉईंग अशा एकूण ७ प्रकारच्या विविध स्पर्धा आयोजित केल्या आहेत. या स्पर्धेच्या समारोप पारितोषिक वितरणाच्या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून इन्फोसाईट कन्सल्टींग बेंगळुरूचे उपाध्यक्ष क्वायंट सर्विसेस मनोज बी.एम हे उपस्थित राहणार आहेत. या स्पर्धेसाठी महाराष्ट्र,कर्नाटक, गुजरात, गोवा, तामिळनाडू व इतर राज्यातील सुमारे दोन हजार विद्यार्थी सहभागी होत आहेत एकूण १ लाख ५० हजार रुपयांचे रोख बक्षीस व प्रमाणपत्र सन्मानचिन्ह देण्यात येणार आहेत. या स्पर्धेच्या आयोजनामध्ये केआयटीचे अध्यक्ष सुनील कुलकर्णी, उपाध्यक्ष साजिद हुदली, सचिव दिपक चौगुले, कार्यकारी संचालक डॉक्टर विलास कार्जिनी व संचालक मनोज मुजुमदार या सर्वांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.