Friday, July 19, 2024
Home ताज्या उद्या अल्ट्रा रन मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

उद्या अल्ट्रा रन मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

उद्या अल्ट्रा रन मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

 

कोल्हापुर/प्रतिनिधी  : रगेडियन स्पोर्ट्स क्लब व कोल्हापूर स्पोर्ट्स बा क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने अल्ट्रा रन मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे . कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील , ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ , राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रवकर आणि जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांच्या प्रमुख उपस्थितीत या स्पर्धेचे सकाळी ५ वाजता पोलीस ग्राउंड येथे उद्घाटन होईल. या स्पर्धेला महाराष्ट्रातील नामवंत खेळाडूंसह महाराष्ट्राच्या बाहेरील खेळाडू देखील सहभागी होणार आहेत.सध्या सुरू असलेल्या छ.शाहूंच्या स्मृती शताब्दी कृतज्ञता पर्वाच्या पार्श्भूमीवर या मॅरेथॉनला विशेष महत्त्व आहे. शाहूं महाराजांचे मल्लविद्या ,मल्लखांब या मर्दानी खेळाबद्दल असणारे प्रेम तसेच सुदृढ आरोग्यासाठी खेळाचे महत्व , महाराष्टातील खेळाडूंसह बाहेरील राज्यातून येणाऱ्या खेळाडूंना या निमित्ताने अनुभवता येईल .शारीरिक तंदुरुस्तीला महत्त्व देणाऱ्या शाहूंच्या विचारांचा संदेश या निमित्ताने संपूर्ण भारतात पोहोचेल. स्पर्धा पूर्ण करणाऱ्या खेळाडूंना मेडल देवून आणि विजेत्या खेळाडूंना ट्रॉफी देवून गौरविण्यात येणार आहे.
पोलिस ग्राउंड येथून सुरू आलेली मॅरेथॉन उजळाई वाडी येथे समाप्त होईल , दरम्यान पुढारी ,टोमॅटो एफ एम , एस जे आर टायर्स ,आणि वायू डाईन टेक अप यांचे सहकार्य या स्पर्धेला लाभले आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

घोडावत विद्यापीठतील फार्मसी विभागाच्या विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीमध्ये निवड

घोडावत विद्यापीठतील फार्मसी विभागाच्या विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीमध्ये निवड किमया शिंदे व अरिहंत परमाज यांना साडेपाच लाखाचे पॅकेज अतिग्रे/प्रतिनिधी :संजय घोडावत विद्यापीठाने शिक्षण क्ष्रेत्रात अल्पावधीतच आपले नाव...

संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये डॉ. सुहास देशमुख यांचे विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन

संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये डॉ. सुहास देशमुख यांचे विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन कोल्हापूर/प्रतिनिधी : जागतिक युवा कौशल्य दिनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांतर्गत डॉ. सुहास देशमुख, संचालक, राष्ट्रीय...

हेल्थ इन्श्युरन्स संकल्पनांचे स्पष्टीकरण

हेल्थ इन्श्युरन्स संकल्पनांचे स्पष्टीकरण श्री. भास्कर नेरुरकर हेड - हेल्थ ॲडमिनिस्ट्रेशन टीम, बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स. तांत्रिक डोमेन आणि कायदेशीर करार असल्यामुळे बहुतांश इन्श्युरन्स संकल्पना या...

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सीपीआर भूमिपूजन व जिल्हा बँक नूतन इमारतीच्या उद्घाटनासाठी कोल्हापुरात येणार

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सीपीआर भूमिपूजन व जिल्हा बँक नूतन इमारतीच्या उद्घाटनासाठी कोल्हापुरात येणार जुलै अखेरीस किंवा ऑगस्ट पहिल्या आठवड्यात होणार कार्यक्रम,दहा हजार वृक्ष लावण्याची...

Recent Comments