केआयटी कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनीअरिंग विभागामधील विद्यार्थ्यांचे “Hackathon Solve for Future” या स्पर्धेत घवघवीत यश
कोल्हापूर/प्रतिनिधी : देशपांडे स्टार्टअप्स, हुबळी यांच्या तर्फे २६ व २७ सप्टेंबर २०२० रोजी एक व्हर्च्युल ह्यक्याथोन चा आयोजन केला होता. ह्या व्हर्च्युल हॅक्याथॉन मध्ये विविध राज्यातून विद्यार्थी सहभागी झाले होते. ह्या स्पर्धेत विद्यार्थ्यांना एक दैनंदिन जीवनातील समस्यांच्या आधारावर एक प्रश्न दिला गेला होता.आणि त्या समस्येचे समाधान करण्यासाठी विद्यार्थ्यांना एक अँप अथवा वेबसाइट बनवून ती २४ तासात सादर करावयाची होती आणि या देशपांडे स्टार्टअप्स तर्फे आयोजित या “Hackathon Solve for Future” स्पर्धेत केआयटी महाविद्यालयातील कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनीअरिंग विभागामधील अंतिम वर्षातील आदित्य प्रभावळे, वागेश्वर यादव, अनमोल वाघमारे आणि पूजा कंगणे या विद्यार्थ्यांनी बाजी मारली. त्यांनी २४ तासात त्यांना मिळालेल्या समस्येचे समाधान करण्यासाठी अँड्रॉईड अँप बनवून सादर केले.
यासाठी कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनीअरिंग विभागाच्या प्रमुख सौ. ममता कलश व श्री.डी.डी. महाजन यांचे सहकार्यविद्यार्थ्यांना लाभले. सदरच्या स्पर्धेस संचालक डॉ.व्ही.व्ही.कार्जिन्नी, चेअरमन भरत पाटील, व्हा. चेअरमन सुनिल कुलकर्णी, सेक्रेटरी दिपक चौगुले यांचे मार्गदर्शन लाभले आहे.