Thursday, October 24, 2024
Home देश सरसेनापती संताजी घोरपडे कारखान्याचे दसरा- दिपावली सणांसाठी प्रतिटन ५० रुपये अदा,एफ.आर.पी. झाली...

सरसेनापती संताजी घोरपडे कारखान्याचे दसरा- दिपावली सणांसाठी प्रतिटन ५० रुपये अदा,एफ.आर.पी. झाली प्रतिटन २९०० रुपये-अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांची माहिती

सरसेनापती संताजी घोरपडे कारखान्याचे दसरा- दिपावली सणांसाठी प्रतिटन ५० रुपये अदा,एफ.आर.पी. झाली प्रतिटन २९०० रुपये-अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांची माहिती

 

सेनापती कापशी/प्रतिनिधी : सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्यांने २०१९-२० या  हंगामांमध्ये गळीतास आलेल्या ऊसपिकास एफ.आर.पी. पोटी २८०० रुपये प्रतिटन अदा केले होते. ऊस उपलब्धतेसाठी व  तालुक्यातील इतर कारखान्यांच्या दराबाबत स्पर्धेसाठी २९००/- रु. प्रतिटन कारखाना ऊसउत्पादक शेतकऱ्यांना देईल, असे अभिवचन कारखाना व्यवस्थापनाने दिले होते. त्यापोटी ५०/- रुपये प्रतिटन गणपती उत्सव काळामध्ये व दसरा-दिपावली सणाच्या दरम्यान ५०/- रुपये प्रतिटन देण्याचे अभिवचन दिले होते. दरम्यान, गणेशोत्सव काळामध्ये ५०/- रुपये अदा केले असून दसरा- दिपावली सणाच्या निमित्ताने बुधवार दि.१४ ऑक्टोबर २०२० रोजी ऊस उत्पादकांच्या खात्यावर जमा केले असून शेतकऱ्यांनी आपल्या बँकेत जाऊन पैसे घेऊन जाण्याची विनंती आहे. कारखान्याचे अध्यक्ष नवीन मुश्रीफ यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.
या पत्रकात अध्यक्ष श्री मुश्रीफ यांनी पुढे म्हटले आहे, सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्यांने आतापर्यंत दिलेल्या सर्व वचनांची पूर्तता केलेली आहे. दरम्यान, साखर कारखान्याच्या चालू गळीत हंगामाचा बॉयलर अग्नी प्रदीपन समारंभ रविवार दि. १८ ऑक्टोबर २०२० रोजी सकाळी नऊ वाजता व गळीत हंगाम शुभारंभ शुक्रवार दि. ३० ऑक्टोबर २०२० रोजी होत आहे. तोडणी-वाहतूकदारांची कोरोना महामारीबाबत कारखाना व्यवस्थापन पूर्ण काळजी घेईल.  दवाखाना, औषधोपचार, दुर्दैवाने दुर्दैवी  घटना घडल्यास कारखाना व्यवस्थापनाने महाराष्ट्र राज्य साखर संघाच्या माध्यमातून सर्वांची जबाबदारी घेतली आहे.
सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला उत्पादित कारखान्यास घालून सहकार्य करावे, अशी विनंती आहे. या गळीत हंगामात नऊ लाख मेट्रिक टन गळीत करण्याचा संकल्प व्यवस्थापनाने केला आहे. सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे.

चौकट ……
१८ ऑक्टोबरला बॉयलर अग्नी प्रदीपन व ३०ऑक्टोबरला मोळीपूजन.
या गळीत हंगामाबाबत माहिती देताना अध्यक्ष नवीद मुश्रीफ म्हणाले, चालू हंगामासाठीचा बॉयलर अग्नीप्रदीपन समारंभ रविवार दि.१८ ऑक्टोबर २०२०  रोजी सकाळी नऊ वाजता होणार आहे. तसेच या हंगामासाठी मोळीपूजन शुभारंभ शुक्रवार दि. ३० ऑक्टोबर रोजी सकाळी दहा वाजता होणार आहे. या गळीत हंगामात कारखाना व्यवस्थापनाने नऊ लाख मेट्रिक टन ऊस गाळप करण्याचा संकल्प केलेला आहे. शेतकऱ्यांनी पिकवलेला सर्वच्या सर्व ऊस सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याकडे गाळपासाठी पाठवावा, असे आवाहनही अध्यक्ष श्री. मुश्रीफ यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

अफाट कर्तृत्वाच्या जोरावर तरुणांना शिक्षणाची दारे शिक्षण संस्थांच्या माध्यमातून खुली करून देणारे डॉ. डी.वाय. पाटील.

अफाट कर्तृत्वाच्या जोरावर तरुणांना शिक्षणाची दारे शिक्षण संस्थांच्या माध्यमातून खुली करून देणारे डॉ. डी.वाय. पाटील. कोल्हापूर/प्रतिनिधी : आपल्या अफाट कर्तृत्वाच्या जोरावर तरुणांना शिक्षणाची दारे आपल्या...

गोकुळ’ची गोबरसे समृद्धी कार्बन क्रेडीट बायोगॅस योजना

‘गोकुळ’ची गोबरसे समृद्धी कार्बन क्रेडीट बायोगॅस योजना बायोगॅसचा दुसरा टप्पा सुरु : नवीन ४००० बायोगॅस मंजूर या योजनेचा दूध उत्पादकांनी लाभ घेण्याचे चेअरमन अरुण डोंगळे यांचे...

“कर्मयोगी आबासाहेब” चित्रपटाचा ट्रेलर लाँच

"कर्मयोगी आबासाहेब" चित्रपटाचा ट्रेलर लाँच २५ ऑक्टोबर रोजी मराठीसह हिंदी भाषेत चित्रपट होणार प्रदर्शित कोल्हापूर/प्रतिनिधी :राजकारणापेक्षा समाजकारणाला महत्त्व देणारे दमदार आमदार, राज्याचे कॅबिनेट मंत्री राहिलेल्या स्वर्गीय...

रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर इव्हॉल्वकडून हेल्पर्स ऑफ द हॅंडीकॅपच्या १० शिक्षकांचा “बिल्डर्स ऑफ नेशन” ने सन्मान

रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर इव्हॉल्वकडून हेल्पर्स ऑफ द हॅंडीकॅपच्या १० शिक्षकांचा "बिल्डर्स ऑफ नेशन" ने सन्मान कोल्हापूर/प्रतिनिधी : दिव्यांग विद्यार्थ्यांच्या जीवनात स्वाभिमान पेरणाऱ्या 'हेल्पर्स ऑफ...

Recent Comments