Friday, December 13, 2024
Home ताज्या माझ्या नवर्‍याची एक भानगड दाखवा, मी राजकारण सोडेन असे चित्रा वाघ यांचे...

माझ्या नवर्‍याची एक भानगड दाखवा, मी राजकारण सोडेन असे चित्रा वाघ यांचे पालकमंत्र्यांना खुले आव्हान

माझ्या नवर्‍याची एक भानगड दाखवा, मी राजकारण सोडेन असे चित्रा वाघ यांचे पालकमंत्र्यांना खुले आव्हान

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणूक प्रचारात महाविकास आघाडी विरुद्ध भाजपत घमासान सुरू आहे. प्रचाराच्या रिंगणातून एकमेकांविरुद्ध आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असतानाच रविवारी रात्री झालेल्या दगडफेकीच्या घटनेनं भाजप नेत्यांनी महाविकास आघाडीवर हल्ला चढवला आहे. त्याला गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी उत्तर दिल्यानंतर चित्रा वाघ यांनी थेट सतेज पाटलांनाच खुले आव्हान पत्रकार परिषदेत दिले आहे.
माझ्या नवर्‍याची एक भानगड दाखवा, मी राजकारण सोडेन असे खुले आव्हान ही त्यांनी सतेज पाटील यांना दिले आहे.
कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीवर भाजपने लक्ष्य केंद्रीत केले असून, ही निवडणूक काँग्रेस आणि भाजपसाठी प्रतिष्ठेची झाली आहे. दरम्यान, सध्या भाजपच्या नेत्या चित्रा वाघ प्रचारानिमित्त कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. प्रचार सभा घेत असताना रविवारी मुक्त सैनिक वसाहतीमध्ये दगडफेक करण्यात आल्याची घटना घडली होती. त्यावरून चित्रा वाघांनी सतेज पाटील आणि आघाडी सरकारवर टीका केली.
घटनेसंबंधी माहिती दिल्यानंतर सतेज पाटील यांनी चित्रा वाघ यांच्यावर टीका केली होती. सतेज पाटील यांनी केलेल्या टीकेला चित्रा वाघ यांनी कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना उत्तर दिले. “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप सरकारने सुशासन राबवलं. सर्वसामान्य नागरिक, महिला यांच्या हिताचा नेहमी विचार केला. म्हणूनच उत्तर प्रदेशसह ४ राज्यातील जनतेनं भाजपला विजयी केलं. महाराष्ट्राची मानसिकताही वेगळी नाही, हे पंढरपूरच्या निकालावरून दिसून आलंय. त्यामुळं कोल्हापुरातही सत्यजित कदम निश्‍चितच विजयी होतील,” असा चित्रा वाघ यांनी व्यक्त केला.
“पालकमंत्री जिल्ह्यात दहशत माजवत आहेत. दबावाचं राजकारण खेळतायेत. मात्र तुम्ही पालक आहात, मालक नाही आहात. तुम्ही म्हणजे कोल्हापूर नव्हे,” अशा शब्दात चित्रा वाघ यांनी पालकमंत्र्यांवर पलटवार केला.
“मुक्त सैनिक वसाहतीमध्ये झालेल्या दगडफेकीच्या घटनेवरून पालकमंत्री दिशाभूल करत आहेत. असला थिल्लरपणा करण्याची गरज आम्हाला नाही. कोल्हापूर पोलीस आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांनीही मुक्त सैनिक वसाहतीच्या सभेत दगडफेक झाल्याचं मान्य केलं आहे,” असं चित्रा वाघ यांनी सांगितलं.
“गृह राज्यमंत्री सतेज पाटील कोल्हापूरचे असूनही, गेल्या दोन वर्षात जिल्ह्यात १६२ बलात्कार, ३१६ विनयभंग, ८४ पोक्सोचे गुन्हे, ४७ खून, ८० खूनांचे प्रयत्न, ११ दरोडे, ११७ फसवणुकीचे प्रकार, १,४१४ चोर्‍या झाल्या आहेत. मग गृह राज्यमंत्री म्हणून तुम्ही काय केलं? हे आकडे खोटं असल्याचं सिद्ध करा, असं आव्हान वाघ यांनी दिलं.
‘नाशिकच्या वाघांच्या अनेक भानगडी आहेत’, असं वक्तव्य गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांनी केलं होतं. त्या विधानावरही चित्रा वाघ यांनी उत्तर दिलं. “माझ्या नवर्‍याची एक भानगड दाखवा, मी राजकारण सोडेन. मी तुमच्या शंभर भानगडी काढून दाखवू शकते. तुमच्या कारनाम्यांचे अनेक खंड निघतील. त्यामुळे माझ्या परिवाराशी निवडणुकीचा संबंध जोडू नका”, असं चित्रा वाघ म्हणाल्या. “तुमची दहशत गुंड आणि बलात्कार्‍यांवर दाखवा,” असा टोलाही त्यांनी लगावला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

आमदार राजेश क्षीरसागर फौंडेशनच्या वतीने सौंदत्ती डोंगरावर मोफत आरोग्य शिबीरासह अल्पोपहार वाटपाचे आयोजन

आमदार राजेश क्षीरसागर फौंडेशनच्या वतीने सौंदत्ती डोंगरावर मोफत आरोग्य शिबीरासह अल्पोपहार वाटपाचे आयोजन कोल्हापूर/प्रतिनिधी : कर्नाटकात होणाऱ्या सौंदत्ती यात्रेसाठी दरवर्षी कोल्हापुरातून हजारो भाविक जातात. सौंदत्ती...

कोल्हापूरचे ग्रामदैवत श्री कपिलेश्वर मंदिरा भोवतीचे अतिक्रमण तातडीने काढण्यात यावे – भाजपाच्या वतीने उपायुक्त श्रीमती साधना पाटील यांना निवेदन सादर

कोल्हापूरचे ग्रामदैवत श्री कपिलेश्वर मंदिरा भोवतीचे अतिक्रमण तातडीने काढण्यात यावे – भाजपाच्या वतीने उपायुक्त श्रीमती साधना पाटील यांना निवेदन सादर कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूरचे ग्रामदैवत श्री...

इंटरनॅशनल सायन्स फेस्टिव्हलमध्ये घोडावत स्कूलच्या विद्यार्थ्यांचे यश

इंटरनॅशनल सायन्स फेस्टिव्हलमध्ये घोडावत स्कूलच्या विद्यार्थ्यांचे यश   अतिग्रे/प्रतिनिधी : संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या सीबीएसई बोर्डिंगच्या विद्यार्थ्यांनी आय आय टी गुवाहाटी येथे आयोजित 'इंडिया इंटरनॅशनल सायन्स...

प्रभु श्रीरामाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी इल्तिजा मुफ्तींवर कायदेशीर कारवाई करा – हिंदु जनजागृती समिती

प्रभु श्रीरामाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी इल्तिजा मुफ्तींवर कायदेशीर कारवाई करा - हिंदु जनजागृती समिती   कोल्हापूर/प्रतिनिधी : मेहबुबा मुफ्ती यांच्या सरकारच्या कार्यकाळात काश्मीरमध्ये हिंदूंवर जो अत्याचार...

Recent Comments