शिवसेनेच्या वतीने ईडीच्या कारवाई विरोधात निदर्शने
कोल्हापूर/प्रतिनिधी : केंद्रीय तपास यंत्रणेने चा रडी चे राजकारण सूडबुद्धीतून महा विकास आघाडी नेत्यांवर करण्यात येणाऱ्या कारवाईविरोधात आज शिवसेना व युवा सेना कोल्हापूर शहर कार्यकारणी च्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे जाहीर निषेध करीत करण्यात आली. यावेळी शिवसैनिकांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या.
या आंदोलनात शिवसेना शहरप्रमुख जयवंत हारूगले, किशोर घाडगे, दीपक गौड, हर्षल सुर्वे, योगेश चौगुले, मनजीत माने, पियुष चव्हाण, विश्वादीप साळोखे, रणजित जाधव, संतोष रेवणकर, दादू शिंदे, सुनिल खोत, रियाज बागवान, अल्लाउद्दीन नाकाडे, रमेश पवार सुनिल खेडेकर विष्णुपंत पवार विक्रम पवार शिवतेज सावंत कपिल पवार शैलेश साळुंखे आदी शिवसेना व युवासेना पदाधिकारी उपस्थित होते.