खोटया सावकारकीच्या तकारी देणा – या चंद्रकांत व वंदना देशमुख यांना चाप नऊ वर्षांनी मिळाला जाधव परिवारास न्याय – अभिजीत जाधव
कोल्हापूर/प्रतिनिधी : आर्थिक लाभ मिळविण्यासाठी पुर्णपणे खोटया तकारी नोंदवुन नाहकपणे अनेकांना त्रास देणाऱ्या चंद्रकांत रामचंद्र देशमुख व त्यांची पत्नी वंदना चंद्रकांत देशमुख यांना न्यायालयीन प्रक्रियेतुन चाप मिळाला असुन माझे आजोबा नारायणराव गणपतराव जाधव आणि त्यांच्या तिन्ही पिढयातील सर्वांना न्याय मिळाला आहे अशी माहिती त्यांचे नातु अभिजीत जाधव यांनी दिली आहे . या जाधव परिवारास मानसिक त्रास देवुन त्यांची सामाजिक प्रतिमा हि मलीन करणेचा प्रयत्न करणाऱ्या देशमुख पती पत्नी विरोधात जाधव परिवारांच्याकडून सलग नऊ वर्षे अँड. विनय भाऊसाहेब कदम यांनी न्यायालयात भक्कमपणे मांडलेली बाजु ग्राहय मानुण हा महत्वपुर्ण निकाल दिला आहे . यामुळे कोल्हापूर सह सांगली , सातारा जिल्हयात अशा प्रकारे अनेकांना त्रास देणाऱ्या कुटुंबियांना मोठा लाभला आहे . नारायणराव गणपतराव जाधव हे समाजातील एक नामवंत , प्रतिष्ठीत आणि आदर्श व्यक्तीमत्व आहे . परंतु चंद्रकांत रामचंद्र देशमुख , सौ. वंदना चंद्रकांत देशमुख यांनी जाणुन बुजुन आणि दुष्ट हेतुने नारायणराव गणपतराव जाधव यांची समाजातील प्रतिमा मलीन करण्याचा आणि त्यांना फसविण्याचा पुरेपुर प्रयत्न करुन देखील चंद्रकांत रामचंद्र देशमुख , सौ . वंदना चंद्रकांत देशमुख यांना पुर्णपणे अपयश आलेले आहे आणि त्यांच्या खोटया तकारीमुळे त्रासलेल्या अनेकांना या निकाला आधारे लवकर न्याय मिळण्याची अशा ही पल्लवीत झालेली आहे . या संदर्भातील सविस्तर माहिती अशी श्री चंद्रकांत रामचंद्र देशमुख , सौ . वंदना चंद्रकांत देशमुख यांनी त्यांचे शैक्षणीक कामकाजाकरीता व प्रस्तावित नविन सिनिअर कॉलेजच्या मान्यतेच्या कामासाठी श्री . नारायणराव गणपतराव जाधव यांचेकडून रक्कम रुपये २ ९ , ००,००० / – ( अक्षरी रक्कम रुपये एकोणतीस लाख फक्त ) तसेच अभिजीत तुलसीदास जाधव यांचेकडून रक्कम रुपये १०,००,००० / – ( अक्षरी रक्कम रुपये दहा लाख फक्त ) इतक्या रक्कमा स्विकारल्या होत्या . सदरच्या रक्कमा स्विकारतेवेळी चंद्रकांत रामचंद्र देशमुख , सौ . वंदना चंद्रकांत देशमुख यांनी श्री . स्वामी विवेकानंद आदर्श विकास शिक्षण संस्था , चंद्रकांत रामचंद्र देशमुख , सौ . वंदना चंद्रकांत देशमुख यांनी त्यांचे खाते असलेले बॅकेतील खातेवरील धनादेश दिले होते . सदरचे धनादेश नारायणराव गणपतराव जाधव व अभिजीत तुलसीदास जाधव यांना देतेवेळी सदरचे धनादेश वटुन त्यापोटी देय असलेल्या रक्कमा नारायणराव गणपतराव जाधव व अभिजीत तुलसीदास जाधव यांना मिळेल अशी हमी व ग्वाही दिली होती .