राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांच्या प्रयत्नाने के.एम.टी.कर्मचाऱ्यांना १६ टक्के वेतनवाढ
उर्वरित प्रश्न मार्गी लावण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करणार : श्री.राजेश क्षीरसागर
के.एम.टी. कर्मचाऱ्यांची वेतनवाढ, व्यवस्थापक नियुक्तीस पाठपुरावा केल्याबद्दल कर्मचाऱ्यांच्या वतीने श्री.राजेश क्षीरसागर यांचा सत्कार
कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर महानगरपालिकेच्या परिवहन उपक्रम के.एम.टी. कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यासंदर्भात कर्मचाऱ्यांच्या वतीने कोल्हापूर महानगरपालिका येथे आमरण उपोषण करण्यात आले होते. यासंदर्भात श्री.राजेश क्षीरसागर यांनी पाठपुरावा करण्याची ग्वाही कर्मचाऱ्याना दिली होती. या पाठपुराव्यास यश आले असून, कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाकडून के.एम.टी.च्या सुमारे ८०० कर्मचाऱ्याना १६ % वेतनवाढ देण्यात आली आहे. यासह रिक्त असणाऱ्या के.एम.टी. व्यवस्थापक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. के.एम.टी.कर्मचाऱ्यांचे उर्वरित प्रश्न लवकरच मार्गी लावण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करू, अशी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी सांगितले. श्री.राजेश क्षीरसागर यांच्या पाठपुराव्यामुळे मान्य झालेल्या मागण्यांसाठी के.एम.टी,कर्मचाऱ्यांच्या वतीने श्री.राजेश क्षीरसागर यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.यावेळी बोलताना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी, के.एम.टी. चे उत्पन वाढून के.एम.टी.सेवेस उर्जितावस्था देण्याचा प्रयत्न केला जात असताना, कर्मचारी वर्गाच्या प्रश्ना संदर्भात जानेवारी महिन्यात महानगरपालिका प्रशासक यांच्यासोबत बैठक पार पडली. या बैठकीत मनपा स्तरावरील प्रश्न तात्काळ मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार के.एम.टी.च्या सुमारे ८०० कर्मचाऱ्यांना १६ टक्के वेतनवाढ देण्यात आली आहे. यासह व्यवस्थापकांच्या रिक्त जागेवर अधिकाऱ्यांची नियुक्ती केल्याने के.एम.टी.च्या व्यवस्थापनाच्या कामकाजात सुधारणा होणार आहे. यासह पुढील काळात
कर्मचाऱ्यांचा रोस्टर, सेवा निवृत्ती वेतन, के.एम.टी. कर्मचाऱ्याना इतर मनपा कर्मचाऱ्यांच्या प्रमाणे ७ वा वेतन आयोगाचा लाभ, कर्मचाऱ्यांची पदोन्नती आदी उर्वरित प्रश्न मार्गी लावण्यासाठी शासन स्तरावर लवकरच पाठपुरावा करू, असे आश्वासित केले. यानंतर के.एम.टी,कर्मचाऱ्यांच्या वतीने श्री.राजेश क्षीरसागर यांचा जाहीर सत्कार करण्यात आला व केलेल्या तातडीच्या पाठपुराव्याबद्दल आभार व्यक्त करण्यात आले. यावेळी सुरेश मुधोळकर, नंदू संकपाळ, सुरेश सोनीकर, एम.डी.कांबळे, संभाजी पाटील, सागर वैराट, संजय भास्कर आदी कर्मचारी उपस्थित होते.