Tuesday, July 23, 2024
Home ताज्या विक्रमवीर गुरुप्रसाद मोरेच्या "ऑलिम्पिक पदकाच्या" ध्येयास सर्वतोपरी मदत करू : राज्य नियोजन...

विक्रमवीर गुरुप्रसाद मोरेच्या “ऑलिम्पिक पदकाच्या” ध्येयास सर्वतोपरी मदत करू : राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर

विक्रमवीर गुरुप्रसाद मोरेच्या “ऑलिम्पिक पदकाच्या” ध्येयास सर्वतोपरी मदत करू : राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर

विक्रमवीर गुरुप्रसाद मोरेचा शिवसेनेच्यावतीने जाहीर सत्कार

कोल्हापूर /प्रतिनिधी : कोल्हापूरच्या गुरूप्रसाद मोरे या शाळकरी मुलाने सिंधुदुर्ग समुद्रात बुधवारी रात्री आणि गुरूवारी पहाटेपासून दुपारपर्यंत पोहण्याचा थरार केला. सलग १९ तास २३ मिनिटात न थांबता पोहून त्याने सिंधुदुर्ग किल्ला ते विजयदुर्ग किल्ला हे ९७ कि.मी.चे अंतर पार केले. त्याच्या या विक्रमाची नोंद परफेक्ट बुक ऑफ वर्ल्डमध्ये करण्यात आली आहे. अवघ्या १३ व्या वर्षी विश्वविक्रमी कामगिरी करणाऱ्या गुरुप्रसाद मोरेच्या “ऑलम्पिक पदकाच्या” ध्येयास सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी दिली. महाराष्ट्राच्या इतिहासाची साक्ष देणारे हे दोन्ही किल्ले पोहून सर करणाऱ्या गुरुप्रसाद मोरेचा आज शिवसेना शहर कार्यालय, शनिवार पेठ येथे राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांच्यावतीने जाहीर सत्कार करण्यात आला. या कामगिरीबद्दल श्री.राजेश क्षीरसागर यांनी रु.११ हजारांचे बक्षीसही गुरुप्रसाद मोरे याला दिले.
या विक्रमाची माहिती देताना गुरुप्रसादचे प्रशिक्षक निळकंठ आखाडे आणि वडील विनोद मोरे यांनी, बुधवारी रात्री ९ वा. सिंधुदुर्ग किल्ल्यावरून त्याने समुद्रात उडी घेतली आणि तो विजयदुर्ग किल्ल्यावरील विजयदुर्ग जेटी येथे दुपारी १ वा. पोहोचला. प्रत्यक्षात सिंधुदुर्ग किल्ला ते विजयदुर्ग किल्ला हे समुद्रमार्गे अंतर ८० कि.मी. आहे. मात्र जीपीएस प्रणालीचा वापर केल्यामुळे व काही ठिकाणी अडथळे आल्यामुळे मार्ग काहीवेळा बदलावे लागले. त्यामुळे हा प्रवास ९७ कि.मी. लांबीचा झाला. कोल्हापूरमधील जलतरण संघटनेचे विजयदुर्ग येथे यापूर्वी 5 कि.मी. जलतरण स्पर्धा आयोजित केली होती. त्यानंतर ३० कि.मी. लांबीची जलतरण स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत गुरूप्रसाद मोरे याने तिसरा क्रमांक पटकावून मोठे यश मिळवले होते. याचवेळी त्याने सिंधुदुर्ग किल्ला ते विजयदुर्ग किल्ला हे अंतर समुद्रातून पोहून कापण्याचा केलेला मानस पूर्ण केला. या मोहिमेत विषारी असलेल्या जेलफिशचा त्रास या दरम्यान गुरूप्रसादला होत होता. त्यापासून बचाव करण्यासाठी लाल ग्रीस अंगाला लावण्यात आले होते, अशा कठीण परिस्थितीतून त्याने कामगिरी फत्ते केल्याची माहिती दिली.
यावेळी श्री.राजेश क्षीरसागर यांनी, गुरुप्रसाद मोरे याने केलेल्या कामगिरीचे कौतुक करताना, कोल्हापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवल्याबद्दल अभिमान असल्याचे म्हंटले. यासह पुढील काळात गुरुप्रसादने जिद्दीने, एकाग्रतेने ऑलिम्पिक पदक मिळवण्यासाठी तयारी सुरु करावी. त्यादृष्टीने आयोजित करण्यात येणाऱ्या विविध स्पर्धांमध्ये सहभागी व्हावे, याकरिता सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाहीही यावेळी दिली.यावेळी शिवसेना शहरप्रमुख जयवंत हारुगले, युवा नेते ऋतुराज क्षीरसागर, पुष्कराज क्षीरसागर, शिवसेना उपशहरप्रमुख सुनील जाधव, विभागप्रमुख निलेश गायकवाड, बबनराव गवळी, उदय पाटील, कपिल केसरकर, बंडा माने, गुरुप्रसादचे प्रशिक्षक निळकंठ आखाडे, वडील विनोद मोरे, आई सौ.छाया मोरे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक दिलीप पाटील यांचे निधन

मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक दिलीप पाटील यांचे निधन कोल्हापूर/प्रतिनिधी : मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आणि न्यायालयाचे याचिका कर्ते दिलीप पाटील यांचे काल शनिवारी कराड नजीक...

सततच्या पर्जन्यवृष्टीमुळे पंचगंगा नदीची पाणी पातळी ३६ फुटावर

सततच्या पर्जन्यवृष्टीमुळे पंचगंगा नदीची पाणी पातळी ३६ फुटावर कोल्हापूर/२० जुलै (वार्ता.) - कोल्हापूर जिल्ह्याच्या धरणक्षेत्रात सातत्याने होणार्‍या पावसाने कृष्णा, वारणा, पंचगंगा, दूधगंगा या नद्यांच्या पाणी...

घोडावत विद्यापीठतील फार्मसी विभागाच्या विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीमध्ये निवड

घोडावत विद्यापीठतील फार्मसी विभागाच्या विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीमध्ये निवड किमया शिंदे व अरिहंत परमाज यांना साडेपाच लाखाचे पॅकेज अतिग्रे/प्रतिनिधी :संजय घोडावत विद्यापीठाने शिक्षण क्ष्रेत्रात अल्पावधीतच आपले नाव...

संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये डॉ. सुहास देशमुख यांचे विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन

संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये डॉ. सुहास देशमुख यांचे विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन कोल्हापूर/प्रतिनिधी : जागतिक युवा कौशल्य दिनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांतर्गत डॉ. सुहास देशमुख, संचालक, राष्ट्रीय...

Recent Comments