Sunday, December 22, 2024
Home ताज्या २५ फेब्रुवारीला होणार संपूर्ण महाराष्ट्र 'लकडाऊन बी पॉझिटिव्ह'

२५ फेब्रुवारीला होणार संपूर्ण महाराष्ट्र ‘लकडाऊन बी पॉझिटिव्ह’

२५ फेब्रुवारीला होणार संपूर्ण महाराष्ट्र ‘लकडाऊन बी पॉझिटिव्ह’

कोल्हापूर/प्रतिनिधी : ‘लकडाऊन बी पॉझिटिव्ह’ हे नेमकं प्रकरण काय आहे हे, असा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्राला पडला होता. आता या प्रश्नावर पडदा पडला असून हा अंकुश चौधरी आणि प्राजक्ता माळी यांचा हा आगामी चित्रपट असून येत्या २५ फेब्रुवारीला संपूर्ण महाराष्ट्रभरात हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. लकडाऊन बी पॉझिटिव्ह या चित्रपटाला संतोष मांजरेकर यांचे दिग्दर्शन आणि ईष्णव मीडिया यांची निर्मिती आहे. लॉकडाऊनच्या काळात अनेक गोष्टी घडल्या आणि त्याचे परिणाम ही आपण पाहिले आहेत. या लॉकडाऊनच्या काळात अनेकांची लग्न रखडली आणि अनेकांची झाली पण ते सगळेच जिथे होते तिथे अडकले तर अशाच एका लग्नाची गोष्ट ‘लकडाऊन’ सांगत आहे. लॉकडाऊनच्या मध्ये एका लग्न घरात नेमकं काय काय घडलं असेल याच चित्रण या चित्रपटात आहे. लॉकडाऊन नंतर हा पहिलाच चित्रपट प्रदर्शित होत ज्यात तब्ब्ल १५ नावाजलेले चेहरे एकत्र दिसणार आहेत. या चित्रपटात मराठी आणि हिंदी चित्रपटाचा सुवर्णकाळ जगलेल्या ‘शुभा खोटे’ यांची मुख्य भूमिका आहे. या चित्रपटाची गाणी ही सध्या ट्रेंड होत असून, बेधुंद मी हे व्हॅलेंटाईन वीकच्या निमित्ताने प्रदर्शित झालेलं गाणं हे तरुणाच्या ओठांवरती थिरकत आहे. अंकुश चौधरी आणि प्राजक्ता माळी यांची या चित्रपटात मुख्य भूमिका आहे. येत्या २५ फेब्रुवारीला प्रदर्शित होत असलेल्या या चित्रपटाची निर्मिती शरद सोनवणे, दर्शन फुलपगार,अजित सोनपाटकी आणि सागर फुलपगार यांची असून केतन महांबरे आणि रवी थोपट या चित्रपटाची सहनिर्मिती केली आहे. चित्रपटाचं दिग्दर्शन संतोष मांजरेकर यांनी केलं आहे. चित्रपटाचं छायाचित्र दिग्दर्शन ‘धनंजय कुलकर्णी’ याने केले आहे. चित्रपटाच्या कार्यकारी निर्मितीची धुरा स्मिता खरात यांनी सांभाळली आहे. चित्रपटाचे लेखक रविंद्र मठाधिकारी यांनी केलं आहे. या चित्रपटाला संगीत अविनाश – विश्वजितच आहे तर संकलन परेश मांजरेकर यांनी केले आहे. . चित्रपटातील नृत्य फुलवा खामकर यांनी दिग्दर्शित केली असून चित्रपटाचं साउंड रेकॉर्डिग अभिजित देव यांनी केलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

डी. वाय. पाटील फार्मसी,नर्सिंगला विजेतेपद

डी. वाय. पाटील फार्मसी,नर्सिंगला विजेतेपद -डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ अंlतरमहाविद्यालय खो -खो स्पर्धा कोल्हापूर/प्रतिनिधी : डी.वाय.पाटील अभिमत विद्यापीठ अंतर्गत अंlतरमहाविद्यालय खो-खो स्पर्धेत मुलांच्या गटात डी.वाय...

मनोरंजनाची संगीतमय सफर घडवणारा ‘श्री गणेशा’ उद्या २० डिसेंबरला होणार प्रदर्शित

मनोरंजनाची संगीतमय सफर घडवणारा 'श्री गणेशा' उद्या २० डिसेंबरला होणार प्रदर्शित कोल्हापूर/प्रतिनिधी : कोणत्याही नवीन गोष्टीची सुरुवात 'श्री गणेशा' म्हणून केली जाते. सध्या रसिकांमध्येही अशाच...

विहिंप – बजरंग दलवतीने गीता जयंती निमित्त शौर्य सप्ताहनिमित्त संचलन

विहिंप - बजरंग दलवतीने गीता जयंती निमित्त शौर्य सप्ताहनिमित्त संचलन कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : विश्व हिंदू परिषद - बजरंग दल तर्फे संपुर्ण भारतात दरवर्षी...

जगप्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकिर हुसेन यांचे निधन

जगप्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकिर हुसेन यांचे निधन   कोल्हापूर/प्रतिनिधी : उस्ताद झाकीर हुसेन यांचा जन्म ९ मार्च, १९५१ रोजी झाला होता.तर वयाच्या ७३ व्या वर्षी त्याचे...

Recent Comments