Tuesday, October 15, 2024
Home ताज्या 'झटका' ४ मार्चला सिनेमागृहात आता सुरुवात गोंधळाची

‘झटका’ ४ मार्चला सिनेमागृहात आता सुरुवात गोंधळाची

‘झटका’ ४ मार्चला सिनेमागृहात आता सुरुवात गोंधळाची

कोल्हापूर/प्रतिनिधी : सध्या कॉमेडी सिनेमांचा ट्रेण्ड सुरू असताना प्रेक्षकही नव्या धाटणीच्या सिनेमांना चांगलीच पसंती देत आहे. तुम्हाला कॉमेडी थ्रिलर सिनेमाचा तडका पाहायचा असेल तर ४ मार्चपर्यंत प्रतीक्षा करावी लागेल. एका प्रेमी युगलाच्या लिव्ह इन रिलेशनशिपला मर्डर मिस्ट्रीमुळे लागलेले ग्रहण पाहायचे असेल तर तुम्हाला ‘झटका, आता सुरुवात गोंधळाची’ हा चित्रपट नक्कीच पाहावा लागेल.उत्तेजना स्टुडिओजची निर्मिती असलेला ‘झटका’ या चित्रपटात झी मराठी वाहिनीवरील प्रसिद्ध मालिका ‘तुला पाहते रे’ फेम पूर्णिमा डे आणि नवोदित अभिनेता गौरव उपासानी तुम्हाला पोट धरून हसवून घाबरवणार आहेत. पहिल्यावहिल्या रोमान्सची स्वप्न रंगवत नवा फ्लॅट भाड्याने घेत ही जोडी आपल्या प्रेमाला बहर देणार तेवढ्यातच एका बंद कपाटात त्यांना एक मृतदेह सापडतो आणि सुरू होतो पोलिसांचा ससेमिरा. यातून दोघे कशी सुटतात, खुनाची चौकशी अंगावर आल्यावर एकमेकांवर ढकलपंची करताना दोघांमध्ये होणारा विनोद, ‘तो’ मृतदेह कोणाचा असतो, मृतदेहाचा आणि नायक-नायिकेचा काय संबंध असतो, या सर्व गोष्टींचा उलगडा होत असताना अनेक विनोदी दृश्येही आपल्याला हसवतात.
चित्रपटाची निर्मिती डॉ पार्थसारथी, प्रेरणा उपासानी यांनी केली आहे. दिग्दर्शक अजिंक्य उपासानी झटका आता सुरुवात गोंधळाची चित्रपटाचे सिनेमेटोग्राफरही आहेत. यासह गौरव आणि अजिंक्य उपासानी या बंधूनी या चित्रपटाचा स्क्रिनप्लेही लिहिला आहे. या सर्व खुनाच्या झटक्यात खरा खुनी कोण आहे? हे पाहायला ४ मार्चला तुमच्या जवळच्या सिनेमागृहाला नक्की भेट द्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

जयश्री चंद्रकात (आण्णा) जाधव फाऊंडेशन आयोजित रास दांडियाला उत्स्फूर्त प्रतिसाद

जयश्री चंद्रकात (आण्णा) जाधव फाऊंडेशन आयोजित रास दांडियाला उत्स्फूर्त प्रतिसाद डेलिया ग्रुप प्रथम : जैना ओसवाल गरबा क्वीनची मानकरी : महिलांनी लुटला नृत्याचा आनंद कोल्हापूर/प्रतिनिधी :...

संजय घोडावत यांना एज्युकेशन आयकॉन पुरस्कार

संजय घोडावत यांना एज्युकेशन आयकॉन पुरस्कार अतिग्रे/प्रतिनिधी : शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल संजय घोडावत यांना एज्युकेशन टुडे संस्थेच्या वतीने यावर्षीचा एज्युकेशन आयकॉन पुरस्कार मुंबई...

धडाकेबाज रोमँटिक अ‍ॅक्शनपट ‘नाद – द हार्ड लव्ह’ २५ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार

धडाकेबाज रोमँटिक अ‍ॅक्शनपट 'नाद - द हार्ड लव्ह' २५ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार कोल्हापूर/प्रतिनिधी : २५ ऑक्टोबरला एक धडाकेबाज रोमँटिक अ‍ॅक्शनपट मराठी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.तो...

११ ऑक्टोबर रोजी कोल्हापुरात १२ जिल्ह्यातील शेतकऱ्यांची राज्यव्यापी निर्धार परिषद

शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समिती, महाराष्ट्र ११ ऑक्टोबर रोजी कोल्हापुरात १२ जिल्ह्यातील शेतकऱ्यांची राज्यव्यापी निर्धार परिषद कोल्हापूर/प्रतिनिधी : शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समिती, महाराष्ट्र वतीने जिल्ह्यातील...

Recent Comments