जयश्री दानवेंच्या ३१ व्या पुस्तकाला पुरस्कार जाहीर
कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर येथील नटश्रेष्ठ जयशंकर दानवे यांच्या कन्या ज्येष्ठ लेखिका जयश्री दानवे
यांच्या ‘अलौकिक’ या व्यक्तीचित्रणाला करवीर साहित्य परिषदेच्या वतीने देण्यात येणारा विशेष पुस्तक पुरस्कार जाहीर झाला आहे.‘अलौकिक’ हे लेखिकेचे एकतिसावे
पुस्तक असून अर्थव प्रकाशनतर्फे प्रकाशित या पुस्तकात विविध क्षेत्रातील दिग्गज व्यक्तींचे चित्रण आहे.यात संत ज्ञानेश्वर,संत,तुकाराम,राष्ट्रपिता महात्मा गांधी,स्वामी
विवेकानंद,रवींद्रनाथ टागोर,भारतरत्न डॉ.राधाकृष्णन,भारताच्या पहिल्या महिला
डॉक्टर आनंदीबाई जोशी,इंदिरा गांधी,दादासाहेब फाळके,व्यंगचित्रकार आर.के.लक्ष्मण, चार्ली चैप्लिन,मिर्झा गालिब,शेक्सपिअर तसेच ब्लॉक बस्टर सचिन तेंडूलकर अशा चौदा कालातीत व्यक्तींची ओळख असून विद्यार्थ्यांसाठी हे पुस्तक प्रेरणादायी ठरणार आहे. प्रस्तुत पुस्तक वितरण समारंभ दि.२० फेब्रुवारी २०२२ रोजी सायं.४ वाजता शाहू स्मारक भवन येथे मा.एम.बी.शेख (विश्वस्त-रयत शिक्षण संस्था,सातारा) आणि मा.एस.एन.पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे.आजपर्यंत त्यांना वैयक्तिक अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले असून त्यांच्या जवळजवळ दहा पुस्तकांना पुरस्कार प्राप्त झाले आहेत.