कोल्हापूर स्टार लोकल मार्ट च्या पन्नासाव्या स्तोवर चे उद्घाटन
कोल्हापूर/प्रतिनिधी: संजय घोडावत ग्रुपच्या वतीने कोल्हापुरात विवेकानंद कॉलेजच्यासमोर स्टार लोकल मार्टचे नुकतेच उद्घाटन झाले. ५०व्या या स्टोअरचे उद्घाटन करताना कंपनीसाठी हा एक महत्त्वपूर्ण महिलाचा दगड असून आमची प्रगती ही संपूर्ण स्टार लोकल मार्ट कुटुंबाच्या प्रयत्नांचा आणि अखंड तेचा पुरावा आहे. स्टार लोकल मार्टने ग्राहकांच्या जीवनात बदल घडवून आणला आहे. अनेक ऑफर्स आणि डिस्काउंट या लोकल मार्केटमध्ये ग्राहकांना मिळणार आहेत. दिवसेंदिवस देशभरातील ग्राहकांचा खरेदी करण्याचा अनुभव चांगला व्हावा यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत.असा विश्वास उद्घाटनप्रसंगी उद्योजक आणि चेअरमन संजय घोडावत यांनी व्यक्त केला. उत्कृष्ट सवलती, दर्जेदार उत्पादने, अतुलनीय अनुभवाचे खात्री तसेच उत्कृष्ट ग्राहक सेवा देणे हेच स्टार लोकल मार्टचे उद्दिष्ट आहे. २०२४ सालापर्यंत ३ हजार लोकल मार्ट विकसित करण्याचा आमचा मानस आहे. याद्वारे २५००० रोजगार निर्मिती करून रोजगारास चालना देणार असल्याचे श्रेणिक घोडावत यांनी सांगितले. यामुळे देशभरातील सर्व शहर व खेड्यांमध्ये स्टारची उत्पादने विस्तारित करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आमच्या सध्या 50 रिटेल स्टोअर्स मध्ये कोल्हापूर, पुणे, सांगली, इचलकरंजी, रत्नागिरी, मिरज, बेळगाव, बागलकोट या ठिकाणी किराणा सामान व इतर घरगुती गरजा यांच्या उच्च दर्जाच्या आणि कमी किमतीच्या दैनंदिन खरेदीसाठी वनस्टॉप शॉपिंग डेस्टिनेशन करण्याचा मानस आहे असेही श्रेणीक घोडावत यांनी सांगितले. उद्घाटनप्रसंगी विनायक भोसले यांच्यासह संजय घोडावत ग्रुपचे कर्मचारी उपस्थित होते.