सामाजिक कार्यातून शिवसेनाप्रमुखांच्या विचारांचा वसा जपू
नवजात हृदय विकाराने ग्रस्त ३४ बालकांवर लवकरच मोफत शस्त्रक्रिया – राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर
शिवसेनाप्रमुखांच्या जयंती निमित्त आयोजित 2डी इको तपासणी शिबिरात १२२ बालकांची तपासणी
कोल्हापूर /प्रतिनिधी : मराठी माणसाच्या हितरक्षणासाठी आणि हिंदुत्वाच्या प्रसारासाठी ४६ वर्षे आपल्या कर्तृत्व आणि वक्तृत्वाची तलवार तळपती ठेवणारे तेजस्वी नेतृत्व आणि तमाम हिंदू, मराठी जनतेच्या मनात आदरणीय स्थान प्राप्त करणारे ‘हिंदुहृदयसम्राट’ शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांनी तमाम शिवसैनिकांना ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारणाचा मूलमंत्र दिला. आजही प्रत्त्येक शिवसैनिकाने शिवसेनाप्रमुखांच्या विचारांची मशाल तेवत ठेवली आहे. शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या विचारांचा जागर करून, सामाजिक कार्याचा वसा जपू, असे प्रतिपादन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी केले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त शहरात विविध ठिकाणी सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते, याप्रसंगी ते बोलत होते.सकाळी शिवसेना शहर कार्यालय, शनिवार पेठ येथे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी शिवसैनिकांनी शिवसेनाप्रमुखांच्या जयघोषाने परिसर दणाणून सोडला. या ठिकाणी मर्दानी खेळाच्या प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले होते.
राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांच्या माध्यमातून सीपीआर रुग्णालय येथे नवजात हृदय रोग असणाऱ्या ० ते १८ वर्षातील मुलांची अद्ययावत मशिनरीद्वारे मोफत 2डी इको तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये १२२ शालेय मुलांची 2डी करण्यात आली. यातील ३४ मुलांवर शस्त्रक्रिया करणे गरजेचे असल्याचे निदान झाले. या ३४ मुलांवर येत्या १५ दिवसात राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांच्या माध्यमातून मोफत हृदय शस्त्रक्रिया मुंबई येथील प्रसिद्ध नारायणा हॉस्पिटल येथे करण्यात येणार आहे. यावेळी अधिष्ठाता डॉ.प्रदीप दिक्षित, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अनिल माळी, नारायणा हॉस्पिटलचे पेड्रीयाट्रीक डॉ.सुप्रमित सेन, डॉ.अवी शहा, डॉ.अमीन नागपुरे, डॉ.सुभाष समन्वये, योगेश खाचणे, डॉ. अजित लोकरे, डॉ.महेंद्र बनसोडे, डॉ.भाग्यश्री पाटील, डॉ.सिद्धार्थ भारती, कृष्णा लोंढे, रोहित लोखंडे, अशोक वाघोळे, शशिकांत वाघमारे आदी उपस्थित होते.
गेली अनेक वर्षे दुर्लक्षित असलेला आणि शहरातील प्रमुख वर्दळीचा मार्ग असलेल्या पापाची तिकटी ते शहीद भगतसिंग चौक, जुना बुधवार पेठ या रस्त्याचे नूतनीकरण आणि सुशोभिकरणाच्या कामाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. शहरातील या प्रमुख रस्त्याच्या कामाकरिता रु.७२ लाख इतका निधी मंजूर करण्यात आला आहे. या संपूर्ण रस्त्याचे खडीकरण, डांबरीकरण करणेत येणार आहे. यासह रस्त्याच्या दुतर्फा साईड पट्टे, सेंटर पट्टे, रिफ्लेक्टर याद्वारे वाहतुक सुरक्षित करण्यात येणार आहे. तसेच ऑक्टोगोनल पोल, डेकोरेटिव्ह पोल, ठिकठिकाणी हायमास्ट लॅम्प या विद्युत रोषणाईने रस्त्या उजळणार असून, पापाची तिकटी ते भगतसिंग मंडळ हा रस्ता शहराचे रोल मॉडेल ठरेल. शहरवासीयांनी शिवसेनेवर विश्वास दाखवून महानगरपालिकेची सत्ता शिवसेनेच्या ताब्यात द्यावी याचपद्धतीने शहरातील सर्व रस्ते तयार करू, असा विश्वास राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी व्यक्त केला. यावेळी माजी महापौर सौ.सरिता नंदकुमार मोरे, ऋतुराज राजेश क्षीरसागर, महिला आघाडी शहरप्रमुख सौ.मंगलताई साळोखे, सौ.ज्योती निलेश हंकारे, इंद्रजीत आडगुळे, अजित राडे, राहुल बंदोडे, ओंकार परमणे, सुशील भांदिगरे, बबनराव गवळी, उदय भोसले, शिवाजीराव चव्हाण, उदय कोळेकर, सम्राट भालकर, महादेव कुकडे, विशाल ससे, बाळासाहेब काळे, सचिन ध्णाल, संदीप धनाल, मुसा पटवेगार, बापू इंगवले, अक्षय कुंभार, पोपटराव मुरगुडे, आनंदराव माजगावकर, पप्पू रजपूत आदी मान्यवर उपस्थित होते.यासह कोव्हीड १९ च्या तिसऱ्या लाटेच्या धर्तीवर शासनाने १५ ते १८ वयोगटातील मुला – मुलींची लसीकरणाची मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार शिवसेनेच्या वतीने शहरातील ९ ठिकाणी १५ ते १८ वयोगटातील मुला – मुलींचे मोफत लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात होते. काशिलिंग विश्वेश्वर मंदिर कसबा बावडा येथे ३५, उभा मारुती चौक पोलीस चौकी शिवाजी पेठ येथे ७०, खोलखंडोबा हॉल शनिवार पेठ येथे ३२, महाराणी ताराराणी विद्यालय मंगळवार पेठ येथे ३५, सदर बझार हौसिंग सोसायटी को.म.न.पा. हॉल येथे ६०, रमाबाई आंबेडकर शाळा उत्तरेश्वर पेठ येथे ८०, जगदाळे हॉल राजारामपुरी येथे ९८, शेलाजी वनाजी शाळा लक्ष्मीपुरी २५, आदर्श विद्यामंदिर बापट कॅम्प येथे २२ अशी एकूण ४५७ मुला- मुलींचे लसीकरण करण्यात आले.
शिवसेना मंगळवार पेठ विभागाच्यावतीने शहरप्रमुख जयवंत हारुगले यांच्या मार्फत बालसंकुलातील मुलांना फळे वाटप आणि सीपीआरचौक येथे गरजूंना कोल्हापुरी थाळीचे वाटप करण्यात आले. यासह शिवसेना विभाग उत्तरेश्वर पेठ विभागाच्यावतीने गंगावेश येथे गरजू लोकांना उत्तरेश्वर थाळीचे वाटप करण्यात आले. यासह माजी नगरसेवक श्री.रविकिरण इंगवले यांच्यावतीने शहरातील नागरिकांसाठी मोफत कोविड १९ लसीकरणाच्या प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.शिवसेना विभाग यादवनगर यांच्या वतीने न्यू क्रांन्ती तरूण मंडळ, यादव नगर यांच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात १०३ रक्तदात्यांनी रक्तदान केले. याचे आयोजन शिवसेना विभागप्रमुख अश्विन शेळके आणि युवासेना उपशहरप्रमुख दादू शिंदे यांनी केले होते. शिवनेरी विभागीय कार्यालय कसबा बावडा येथे ई- श्रमिक कार्ड नोंदणी मोहिमेस नागरिकांनी उदंड प्रतिसाद दिला. यामध्ये सुमारे ३५० श्रमिकांनी नोंदणी केली. याचे नियोजन शिवसेना उपशहरप्रमुख सुनील जाधव, रविंद्र माने, राजू काझी, अक्षय खोत, राहुल माळी, सचिन पाटील आदींनी केले.