कोल्हापूर सराफ व्यापारी संघाची मार्चमध्ये निवडणूक – अध्यक्षांची माहिती
कोल्हापूर/प्रतिनिधी : येथील कोल्हापूर सराफ व्यापारी संघाची निवडणूक मार्च-एप्रिलमध्ये होणार असल्याची माहिती अध्यक्ष कुलदीप गायकवाड यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. ते म्हणाले, दोन वर्षांपूर्वी पदभार स्वीकारलेला आम्हा पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ नव्या वर्षात फेब्रुवारी २०२२ मध्ये संपत आहे. यावेळी आम्ही पायउतार होऊन निवडणूक मंडळाकडे कार्यभार सोपवू. निवडणूक मंडळाची बैठक होऊन त्यामध्ये मार्च-एप्रिलमध्ये कोणत्या तारखांना निवडणूक घ्यावयाची याची माहिती दिली जाईल.
यावेळी उपाध्यक्ष जितेंद्र राठोड, सचिव अनिल पोतदार (हुपरीकर), संचालक प्रसाद कालेकर, तेजस धडाम व सुहास जाधव आदी उपस्थित होते.