डॉ.चारूदत्त वसंतराव रणदिवे यांची आयुष भारत महाराष्ट्र राज्य हिप्नोथेरेपी अध्यक्ष पदी निवड
कोल्हापूर/प्रतिनिधी : आयुष भारत महाराष्ट्र राज्य हिप्नोथेरेपी अध्यक्ष पदी डॉ.चारूदत्त वसंतराव रणदिवे यांची निवड करण्यात आल्याची माहिती आयुष भारत राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.आमीर मुलाणी यांनी दिली. ही निवड डाॅ.सोमनाथ बोराटे, डॉ.जलिल शेख, डॉ.फैजान इनामदार, डॉ.विश्वास फपाळे, डॉ.प्रविण निचात, डॉ.नामदेव मारे, डॉ.फिरोज पठाण, डॉ.सिता भिडे, डॉ.शब्बीर पठाण व आदी मान्यवर यांच्या अध्यक्षतेखाली ही करण्यात आली आहे.
आयुष भारत संपूर्ण देशात कार्यान्वित असणारी ग्रामीण तसेच शहरातील डॉक्टरांच्या न्याय हक्कासाठी लढणारे देशातील सर्वात मोठी आयुष भारत संघटना आहे.
आयुष भारत संघटनेची कार्य आणि उद्दिष्ट ही आयुष भारत फिरते हॉस्पिटल तसेच औषधांवर संशोधन, गरीब व गरजू विद्यार्थ्यांना मोफत वैद्यकीय शिक्षण पुरवणे, वैद्यकीय क्षेत्रामध्ये नोकरी, वैद्यकीय क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या सर्व डॉक्टरांसाठी लाईफ इन्शुरन्स पॉलिसी, प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय शिक्षण संस्थांची उभारणी करणे, गरीब लोकांसाठी मोफत वैद्यकीय सेवा पुरवणे, २४ तास मोफत ॲम्बुलन्स सेवा पुरवणे, डॉक्टरांवर होणाऱ्या अन्यायावरती त्वरित मदत करणे, डॉक्टरांना वैद्यकीय कायद्याविषयी मोफत सल्ला देणे अशी आहेत.तसेच डॉक्टरांच्या समस्या डॉक्टरांचे विविध प्रश्न यासाठी कार्य करणारी देशातली सर्वांत मोठी संघटना म्हणून आयुष भारत संघटना ओळखली जात आहे. अशी माहिती आयुष भारत महाराष्ट्र राज्य अध्यक्ष डॉ.चारूदत्त वसंतराव रणदिवे यांनी दिली आहे.या अध्यक्ष पदाच्या माध्यमातून आयुष भारत संघटनेच्या माध्यमातून असंघटितरित्या वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना एकत्र आणून त्यांच्या कार्याला वैधता देण्यासाठी प्रयत्न केले जातील तसेच वेगवेगळ्या पॅथीना राजमान्यता मिळवण्यासाठी योग्य तो न्यायालयीन लढा उभा करू अशी डॉ. चारुदत्त रणदिवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.