ग्रामीण महाराष्ट्रात रोखीचे डिजिटायझेशन – फिनो बँकिंग पॉइंट्सचा पर्याय
स्थानिक अर्थव्यवस्थेतच होत आहे स्थानिक पैशाचे वितरण
कोल्हापूर/प्रतिनिधी : सध्याचे युग डिजिटलायझेशनचे आहे, तरीही राज्यासह देशभरातील कोट्यवधी लोक आजही रोख रक्कमद्वारेच व्यवहार करणे पसंत करतात.
ग्रामीण भागात एमएफआय (MFIs), एनबीएफसी (NBFCs), बॅंकांमार्फत (Banks) चालणारी वितरण व्यवस्था, देयके भरणा ( बील पेमेंट) तसेच संकलनासाठी मोठ्या प्रमाणात रोखीनेच व्यवहार केले जातात. ग्राहकही त्यांची बीले , पैशांचे आदानप्रदान( मनी ट्रान्सफर) आणि कर्जफेडीचे हप्ते (ईएमआय) रोख रकमेनेच भरतात. या पैशांचे कार्यक्षमतेने व्यवस्थापन करण्यासाठी एक चांगली रोख व्यवस्थापन सेवा (CMS) भागीदार असणे आवश्यक आहे. फिनो पेमेंट्स बॅंक हाच पर्याय सीएमएसचा (CMS )उपलब्ध करून देत आहे.
कोल्हापूर शहराच्या भेंडी गल्ली येथे शंतनू दाते स्टेशनरीचे लहानसे दुकान चालवतात. दातेसारख्या लहान व्यवसाय मालकांना, फिनो बॅंक, स्थानिक पातळीवर निर्माण होणा-या नकद पैशांच्या व्यवहाराचे व्यवस्थापन करण्यासाठी मदत करते. यामुळे स्थानिकांचा पैसा स्थानिक बाजारांतच वितरित होत राहतो. फिनो बँकिंग पॉइंट म्हणून काम करणारे राज्यभरात हजारो व्यापारी आहेत. यात किराणा, मोबाइल दुरुस्ती, डेअरी अशा असंख्य लहान व्यावसायिकांचा समावेश आहे. मूलभूत बँकिंग सेवा पुरवण्याव्यतिरिक्त, सीएमएस (CMS) क्लायंट आणि ग्राहकांना त्यांच्या जवळील नकद डिजीटल करण्यास मदत करतात.
फिनो पेमेंट्स बँकेचे वरिष्ठ विभागीय प्रमुख (पश्चिम आणि मध्य) श्री. हिमांशू मिश्रा म्हणाले, “ रोख रकमेचे व्यवस्थापन करणे अवघड, थोडे महागडे असून त्यात काहीसे धोके आहेत. शंतनू दातेंप्रमाणे लहान दुकांनामार्फेत फिनो बँकिंग पॉइंट्स जाळे संपूर्ण महाराष्ट्रात पसरलेले आहेत. ते सीएमएस (CMS) ग्राहकांना ( क्लायंटना) रोख रक्कम जवळ बाळगण्याचा धोका कमी करण्यास मदत करतात. राज्यात ७५ हून अधिक एमएफआय (MFI) आणि एनबीएफसी (NBFC) फिनो पॉईंट्सवर दरमहा सुमारे 80 कोटी रुपयांची रक्कम डिजिटायझेशमध्ये बदलतात. ही जमा केलेली रक्कम ( कलेक्शन) एजंट, बँकेच्या शाखेत जाण्याऐवजी जवळच्या फिनो पॉइंटवर रोख जमा करतात आणि पुन्हा अधिक रक्कम जमा करण्यासाठी( कलेक्शन) करण्यासाठी परत कामावर जातात. त्याचप्रमाणे वैयक्तिक कर्जदार फिनो पॉइंट्सवर त्यांचे ईएमआय (EMI) भरू शकतात. यामुळे वेळ आणि श्रम वाचतेच पण यामुळे उत्पादकता वाढते आणि रोखीशी संबंधित असलेला धोका टाळला जातो.
“तसेच जमा केलेली भौतिक रक्कम स्थानिक अर्थव्यवस्थेतच वापरतात. ग्राहक ही रक्कम वापरून खरेदी करू शकतात. फिनो बॅंकेच्या पॉईन्टंसच्या मालकालाही त्याच्या दुकानात जमा होणाऱ्या प्रत्येक ठेवीवर (जमा रकमेवर) आणि पैसे काढण्याच्या व्यवहारासाठी काही रक्कम कमीशन म्हणून मिळते. हा सर्वांचा विजय आहे,” असे श्री मिश्रा पुढे म्हणाले.कोल्हापुरात, फिनोचे ३० सीएमएस(CMS) क्लायंट्स असून या बँकिंग नेटवर्क सेवांद्वारे सुमारे ६० कोटी रुपयांचे वार्षिक रोख तिप्पट व्यवस्थापित करतात. फिनो पेमेंट्स बँकेने येत्या काही दिवसांमध्ये बँकिंग पॉइंट्स आणि ऑनबोर्ड अधिक सीएमएस (CMS) क्लायंट जोडण्याची योजना तयार केली आहे.
एमएफआय (MFI),एनबीएफसी( NBFCs) आणि बँकांव्यतिरिक्त, फिनोच्या सीएमएस (CMS) ऑफरिंगचा लाभ एज्युटेच- शिक्षणसंबंधित (Edutech), लॉजिस्टिक( Logistics), किरकोळ( रिटेल- Retail) आणि ईकॉमर्स (Ecommerce) क्षेत्रातील ग्राहक देखील घेत आहेत.मायक्रो एटीएम सक्षम व्यवस्था फिनो मर्चंट्सने दिली आहे. या सुविधेमुळे स्थानिक अर्थव्यवस्थेत मोठा फरक पडला आहे. घराशेजारी असलेल्या आणि ग्राहकांसाठी सदैवी खुली असलेल्या या दुकांनदारांसोबत स्थानिकांचा चांगलाच परिचय असतो. दुकानदार आणि स्थानिकांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध असल्याने पैशांसंदर्भातील व्यवहार करण्यासाठी आवश्यक असलेला विश्वास ते सहज निर्माण करतात.फिनो पॉइंट्सवर ग्राहक नवीन बँक खाते उघडू शकतात, झटपट डेबिट कार्ड मिळवू शकतात, ठेवी जमा करू शकतात, पैसे काढू शकतात, पैसे दुसऱ्या व्यक्तीला पाठवू शकतात, आधारकार्डसह – एईपीएस( AEPS), मायक्रो एटीएमद्वारे पैशांचे व्यवहार करू शकतात. याशिवाय विमा, सोन्यावर कर्ज ( गोल्ड लोन) सोर्सिंग यासारख्या थर्ड पार्टी ऑफरमध्ये प्रवेश करू शकतात. वीज किंवा इतर देयके (युटिलिटी बिले) देखील या बॅंकिंग पॉईन्टवर भरणे शक्य आहे. अगदी मोबाईल आणि डीटीएचचे (DTH) रिचार्ज देखील करणे या दुकानांद्वारे शक्य आहे.