Friday, December 20, 2024
Home ताज्या विश्वविक्रमवीर डाॅ. अथर्व गोंधळी इंडियन एक्सलन्स व करवीर आयकॉन पुरस्काराने सन्मानित

विश्वविक्रमवीर डाॅ. अथर्व गोंधळी इंडियन एक्सलन्स व करवीर आयकॉन पुरस्काराने सन्मानित

विश्वविक्रमवीर डाॅ. अथर्व गोंधळी इंडियन एक्सलन्स व करवीर आयकॉन पुरस्काराने सन्मानित

कोल्हापूर/प्रतिनिधी : विश्वविक्रमवीर डाॅ. अथर्व संदीप गोंधळी वय सोळा वर्षे  यास  बहूजनरत्न रामदास आठवले प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांचे वतीने इंडियन एक्सलन्स व करवीर आयकॉन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.दिल्ली स्टेट यूनिवर्सिटी च्या AIIPPHS च्या कुलगुरू डॉ. अंजू भंडारी, रजिस्टर के. डी. आर्या, मा.चंद्रमणी इंदुरकर मध्यवर्ती कारागृह अधीक्षक (कळंबा) यांच्या हस्ते डॉ. अथर्वला सन्मानित करण्यात आले.
टोप संभापुर ता हातकणंगले जिल्हा कोल्हापूर येथील विश्वविक्रमवीर डॉ.अथर्वने वयाच्या १४ व्या वर्षी ३० नोव्हेंबर २०१९ रोजी बारा तासात २९६ किलोमीटर अंतर सायकलिंग मध्ये पूर्ण करून कोल्हापूरमध्ये विश्वविक्रम केला होता.
डॉ अथर्व हा लहानपणापासून विविध खेळांमध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय यश मिळवत आला आहे.२०१९ मध्ये ताय क्वांनदो,कुडो,सायकलिंग, ट्रायलिथॉन अशा विविध खेळांमध्ये त्यांने पारितोषिके पटकावली आहेत.सध्याही तो विविध खेळांमध्ये अग्रेसर आहे.सायकलिंगमध्ये त्याने केलेल्या विश्वविक्रमाची नोंद ही
ग्लोबल रेकॉर्ड, चिर्ल्डन वर्ल्ड ऑफ रेकॉर्ड,एशिया पॅसिफिक रेकॉर्ड आणि नॅशनल रेकॉर्ड असे ६ विक्रमांमध्ये झाली होती.याचीच दखल ही द डायसेस ऑफ एशिया इन इंडिया चेन्नई तामिळनाडू यांनी घेऊन त्याला डॉकटरेट इन एथलेटिक ही पदवी बहाल केली होती.शिवाय केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री माननीय रामदासजी आठवले यांच्या २५ डिसेंबर या वाढदिवसाचे औचित्य साधून कराड येथे संघर्ष दिन साजरा करण्यात आला होता यावेळी बहुजन रत्न रामदास आठवले प्रतिष्ठान महाराष्ट्र यांच्या वतीने राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या संघर्षमय कर्तुत्वाने उल्लेखनीय कार्य करणाऱ्या खेळाडूंना बेस्ट २०१९ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते.
यामध्येही विश्वविक्रमवीर डॉ अथर्व गोंधळी याला बेस्ट अँथलेटिक ऑफ द इयर २०१९ या पुरस्काराने गौरविण्यात आले होते.
या कार्यक्रमावेळी रामदास आठवले प्रतिष्ठानचे अध्यक्ष माननीय महेंद्र शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्याचे सचिव अनिल माळवी प्रमुख पाहुणे तर जानवी पांडव आय. एफ. बी. बी.प्रो अथलेत, मुंबई,डॉ.विशाल कांबळे मिस्टर एशिया, अजित दादा देसाई,सागर पाटील, उमेश पाटील ही प्रमुख उपस्थित होते.या कार्यक्रमाचे आयोजन मॅडी तामगावकर संस्थापक अध्यक्ष डीआयडी अकॅडमी, डीआयडी क्लब ऑफ गर्गिज यांनी केले, तसेच अनिल माळवी प्रतिष्ठानच्या डॉ. स्मिता गिरी,विशाल पाटील, उदय देसाई, अश्विनी माळवी यांचे सहकार्य लाभले तर सूत्रसंचालन व आभार स्वप्नील पन्हाळकर यांनी केले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

डी. वाय. पाटील फार्मसी,नर्सिंगला विजेतेपद

डी. वाय. पाटील फार्मसी,नर्सिंगला विजेतेपद -डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ अंlतरमहाविद्यालय खो -खो स्पर्धा कोल्हापूर/प्रतिनिधी : डी.वाय.पाटील अभिमत विद्यापीठ अंतर्गत अंlतरमहाविद्यालय खो-खो स्पर्धेत मुलांच्या गटात डी.वाय...

मनोरंजनाची संगीतमय सफर घडवणारा ‘श्री गणेशा’ उद्या २० डिसेंबरला होणार प्रदर्शित

मनोरंजनाची संगीतमय सफर घडवणारा 'श्री गणेशा' उद्या २० डिसेंबरला होणार प्रदर्शित कोल्हापूर/प्रतिनिधी : कोणत्याही नवीन गोष्टीची सुरुवात 'श्री गणेशा' म्हणून केली जाते. सध्या रसिकांमध्येही अशाच...

विहिंप – बजरंग दलवतीने गीता जयंती निमित्त शौर्य सप्ताहनिमित्त संचलन

विहिंप - बजरंग दलवतीने गीता जयंती निमित्त शौर्य सप्ताहनिमित्त संचलन कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : विश्व हिंदू परिषद - बजरंग दल तर्फे संपुर्ण भारतात दरवर्षी...

जगप्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकिर हुसेन यांचे निधन

जगप्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकिर हुसेन यांचे निधन   कोल्हापूर/प्रतिनिधी : उस्ताद झाकीर हुसेन यांचा जन्म ९ मार्च, १९५१ रोजी झाला होता.तर वयाच्या ७३ व्या वर्षी त्याचे...

Recent Comments