केर्ली येथील वृक्षमित्र पंडित माने यांनी गिरणार गुजरात, बडोदा, राजस्थान आदी ठिकाणी केले कर्पूरा व रान तुळसीचे वाटप
कोल्हापूर/प्रतिनिधी : गिरणार परिक्रमा वृक्ष लागवड
श्री संत सदगुरू दयानंद बाबा यांच्या कृपाआशिरवादाने श्री बाळू मामा वृक्षारोपण संकल्पना केरली द्वारा वृक्षमित्र पंडित माने व नवनाथ माने यांनी यांनी गिरणार परिक्रमा मध्ये ५ लाख कर्पूरा तुळस रान तुळस बीजरोपण व 10 हजार मलबारी लागवड केली बाळ महाराज कुडाळ जगताप महाराज को,भालकर महाराज को,गिरणार ग्रुप को, यांचे योगदान यासाठी लाभले.वृक्षमित्र पंडित माने केरली यांनी रेल्वे कोल्हापूर ते अहमदाबाद प्रवास कोल्हापूर ते बडोदा या ठिकाणी कर्पूर तुळस रान तुळस व मलबारी कटिंग वाटप करण्यात आले यावेळी यांचे क्षेत्र वाढवितो असे काही प्रवाशानी सांगितले.
पुढे बस प्रवास, बडोदा ते कुबेर भंडारी शिव मंदिर नरमदा नदी काठावर महाराष्ट्र गुजरात मधील भाविक भक्तानी रान तुळस व कर्पूरा तुळस यांचे बियाणे व मलबारी कटिंग लागवड व वाटप केले. कुबेर भंडारी गोशाला याठिकाणी मोठया प्रमाणात मलबारी कटिंग लागवड केली तेथील साधुसंताना रान तुळस व कर्पूरा तुळस यांचे बियाणे दिले त्यानी यांचे कौतुक केले शिवाय यांचे क्षेत्र वाढवितो असे सांगितले
पुढे माने यांनी सारंगपूर ते जुनागड गिरणार परिक्रमा साठी भारतातील लोक येतात त्या वेळी श्री दतगुरू भाविक भक्ताना रान तुळस व कर्पूरा तुळस मलबारी कटिंग वाटप करण्यात आले.
गोरक्षनाथ आश्रम गोशाला गिरणार मधील अनेक गोशाला मध्ये मलबारी कटिंग लागवड व वाटप केले त्या वेळी या कार्याला साधुसंतानी खुप आशिर्वाद दिले. गिरणार परिक्रमा ५० किमीचा खडतर प्रवास चालत एका दिवसात पुर्ण केला श्री संत सदगुरू दयानंद बाबा यांना डोलीतुन चालत एका दिवसात प्रवास केला यावेळी गिरणार जंगलात साधुसंताचाआश्रम ओढयाजवळ नदी काठावर भरपूर मलबारी कटिंग लागवड केली व वाटप केले त्या गिरणार ग्रुप कोल्हापूर याचे योगदान लाभले. सत्ताधार धाम ते चौटीला चामुडा माता मदिर गुजरात याठिकाणी सन २०१७ साली मलबारी कटिंग लावलेली झाडे आता मोठी झाली आहेत यांचे कटिंग लागवड साठी घेतले.
चामुडा माता भाविक भक्तानी भक्ती भावाने बियाणे
घेतले याची मोठया प्रमाणात लागवड करून सामाजिक प्रगती साधली जाईल असे प्रतिपादन बिहार समाज सेविका यांनी केले. महाराष्ट्र गुजरात बिहार राजस्थान गोवा येथील भाविका नी याचा लाभ घेतला चौटीला चामुडा माता मंदिर ते महिसागर संगम तीर्थक्षेत्र याठिकाणी मलबारी कटिंग लागवड व वाटप कर्पूरा तुळस रान तुळस लागवड केली
तेथील स्थानिक लोकांचे गोशाला व्यवस्थापकांचे योगदान लाभले या कार्याची दखल घेवून कार्याला खुप खुप आशिर्वाद दिले.
गुजरात मध्ये वृक्षलागवड करुन गिर गाईना मोठया प्रमाणात चारा निर्माण होइल असे विश्वास साधुसंतांनी दर्शवला.
गिरणार जुनागड ते सत्ताधार धाम याठिकाणी बियाणे वाटप करण्यासाठी मुबई मधील भाविक भक्ता चे योगदान लाभले त्यामुळे सत्ताधार धाम गोशाला याठिकाणी मोठया प्रमाणात मलबारी कटिंग लागवड व वाटप केले तेथील स्थानिक गोशाला व्यवस्था पक यांचे योगदान लाभले यावेळी महाराष्ट्र गुजरात बिहार राजस्थान गोवा येथील भाविक भक्तानी याचा लाभ घेतला.बडोदा मध्ये श्री संत सदगुरू दयानंद बाबा यांच्या भक्ताना रान तुळस व कर्पूरा तुळस यांचे बियाणे वाटप केले मलबारी कटिंग वाटप केले याठिकाणी संत महात्मे याचा सत्कार बडोदा भाविकानी केला. आपल्या सहकार्य मुळे गुजरात मध्ये वृक्षलागवड मोहिम यशस्वी झाली आहे असे वृक्षमित्र पंडित माने यांनी सांगितले यावेळी रेल्वे प्रवासात जेवन व्यवस्था बडोदा भाविकानी केली मोरबाळे सर यानी आभार मानले.