Monday, July 15, 2024
Home ताज्या आमदार चंद्रकांत जाधव यांच्या पार्थिवाचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी घेतले अंत्यदर्शन -...

आमदार चंद्रकांत जाधव यांच्या पार्थिवाचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी घेतले अंत्यदर्शन – पालकमंत्र्यांनी केले जाधव कुटुंबियांचे सांत्वन

आमदार चंद्रकांत जाधव यांच्या पार्थिवाचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी घेतले अंत्यदर्शन – पालकमंत्र्यांनी केले जाधव कुटुंबियांचे सांत्वन

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या घरी भेट देवून त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. दिवंगत आमदार जाधव यांचे पुत्र सत्यजित, मुलगी अस्मिता मोरे, आई प्रमिला जाधव तसेच कुटुंबियांशी संवाद साधून पालकमंत्री श्री. पाटील यांनी त्यांचे सांत्वन केले. तत्पूर्वी दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या पार्थिवाला पुष्पहार अर्पण करुन पालकमंत्री श्री. पाटील यांनी अंत्यदर्शन घेतले.
यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल पाटील, खासदार संजय मंडलिक, जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, महानगरपालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अपर जिल्हाधिकारी किशोर पवार, नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. मंडळाचे तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

आमदार चंद्रकांत जाधव यांना पालकमंत्री सतेज पाटील यांची श्रद्धांजली!

कोल्हापूर उत्तरचे आमदार, उद्योजक आणि सहकारी चंद्रकांत जाधव यांचे आकस्मिक निधन अत्यंत धक्कादायक आहे. आमदार जाधव हे अत्यंत शांत, मनमिळावू व लोकप्रिय व्यक्तिमत्व होते. राजकीय, क्रीडा, उद्योग आणि सामाजिक क्षेत्रातील त्यांचे काम कोल्हापूरकर कधीच विसरणार नाहीत. त्यांच्या जाण्याने एक जिंदादील सहकारी आज गमावला आहे. आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनाने निर्माण झालेली पोकळी कधीही न भरून निघणारी आहे. त्यांची उणीव मला सदैव भासणार आहे, अशा शब्दांत दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांना पालकमंत्री श्री. पाटील यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

कोल्हापूरमधील प्रसिद्ध व्यावसायिक हेमंत शहा,मदन भंडारी आणि प्रताप कोंडेकर यांनी चक्क ७० दिवसात कोल्हापूर ते लंडन केला २० देशांचा थरारक प्रवास

सेव्ह वॉटर सेव्ह नेचर.... या 'कोल्हापूर ते लंडन' या जनजागृती संदेश यात्रेच्या माध्यमातून कोल्हापूरच्या चार मित्रांनी कोल्हापूरचे नाव कोरले लंडनच्या हृदयावर कोल्हापूरमधील प्रसिद्ध व्यावसायिक हेमंत...

कोल्हापूरच्या उघोग विश्वाची होणार नवी रोजगार उपलब्धीसह विधायक ओळख – व्यवस्थापकीय संचालक तुषार शेळके

जगप्रसिद्ध ब्रीक्स्टन मोटरसायकल्स आणि व्ही एल एफ इलेक्ट्रिक टू-व्हीलर्स भारतात संयुक्त निर्मिती सह वितरीत करण्यासाठी केएस डब्ल्यू वेलोसे मोटर्स सज्ज कोल्हापूरच्या उघोग विश्वाची होणार नवी...

रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाऊनच्या अध्यक्षपदी सौ. अरूंधती महाडिक तर उपाध्यक्षपदी मिरा कुलकर्णी यांची निवड

रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाऊनच्या अध्यक्षपदी सौ. अरूंधती महाडिक तर उपाध्यक्षपदी मिरा कुलकर्णी यांची निवड कोल्हापूर/प्रतिनिधी : रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनच्या अध्यक्षपदी सौ....

नेहरूनगर येथील दत्त भक्त मंडळाने सामाजिक बांधिलकी जपत केली मिरजकर तिकटी येथील अंधशाळेस आर्थिक मदत

नेहरूनगर येथील दत्त भक्त मंडळाने सामाजिक बांधिलकी जपत केली मिरजकर तिकटी येथील अंधशाळेस आर्थिक मदत कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर येथील आयसोलेशन हॉस्पिटल परिसरातील श्री दत्त मंदीर...

Recent Comments