Tuesday, October 15, 2024
Home ग्लोबल सिबीक इन्स्टिट्यूटला महाराष्ट्र शासनाची मान्यता, ८ डिसेंबरपर्यंत संपर्क साधण्याचे आवाहन

सिबीक इन्स्टिट्यूटला महाराष्ट्र शासनाची मान्यता, ८ डिसेंबरपर्यंत संपर्क साधण्याचे आवाहन

कोल्हापूर/प्रतिनिधी : भारतातील पहिली इन्क्युबेटेड सह स्टार्टअप इको सिस्टीम असणारी महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ(MSBTE) संलग्नित व्यवसायाभिमुख पदविका संस्थेस कोल्हापूरमध्ये प्रथमच शैक्षणिक वर्ष २०२१-२२ पासून प्रवेशाकरिता महाराष्ट्र शासनाकडून अंतिम मान्यता प्राप्त झाली आहे अशी माहिती संचालक डॉ. संजय दाभोळे  यांनी दिली आहे.सिद्धम इनोव्हेशन व बिझनेस इन्क्युबेशन सेंटर संचलित सिबीक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कोल्हापूर ही महाराष्ट्र राज्यतंत्रशिक्षण मंडळ मुंबई संलग्नित व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त ६ महिन्यांच्या इंटर्नशिपसह १ वर्षांच्या कालावधीचे  १२ वी पास विद्यार्थ्यांकरिता डिप्लोमा इन  सप्लायचेन मॅनेजमेंट व लॉजिस्टिक तसेच १२ वी, आयटीआय, डिप्लोमा इंजीनियरिंगच्या विद्यार्थ्यांकरीता डिप्लोमा इन मेडिकल इक्विपमेंट मेंटेनन्स व ॲडव्हान्सड डिप्लोमा इन इंटरनेट ऑफ थिंग्स तसेच बी.एस.सी,  बी.फार्म, बी.ए, एम. एस,बी.एच.एम. एस, विद्यार्थ्यांकरिता आरोग्य विभागाशी निगडित ॲडव्हान्सड डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी हे व्यवसायाभिमुख प्रत्येकी ६० जागेसह वार्षिक फी रुपये २५ हजार ते ३० हजार  प्रमाणे प्रथमच उपलब्ध झाले आहेत.
 मागील दोन्ही वर्ष कोरोना महामारीमुळे बारावी, डिप्लोमा, ग्रॅज्युएटसह सर्व व्यवसायिक अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांचे शिक्षण ऑनलाइन पद्धतीने झाल्याने त्यांना कौशल्य अवगत करण्यासाठी या अल्प मुदतीच्या कोर्सेसमुळे चांगली नोकरी अथवा व्यवसाय चालू करण्यास मदत होणार आहे यासाठी कव्वालीटास कंपनीच्या संयुक्त विद्यमाने
 IoT साठी आद्यवत एक्सलेन्स सेंटर,आरोग्याशी निगडित कोर्सेससाठी अद्ययावत डायग्नोस्टिक सेंटर तर सर्व इंडस्ट्री साठी ४.० साठी लागणाऱ्या सॉफ्टवेअर प्रणाली, डिजिटल क्लासरूम व इंटरनेटसह कॉम्प्युटर  सेंटरची उभारणी केली गेली आहे.कोरोना महामारीमुळे ज्या विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती बिकट आहे अशा विद्यार्थ्यांना या संघटनेत ३५ स्टार्टअपमध्ये कमवा व शिका या तत्वावर तासिका बेसिसवर  काम उपलब्ध करू दिले जाणार आहे जेणेकरून असे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही या कोर्सच्या इंटरंशिप करिता IBM,Flipkart,Amazon,CISCO,BOSCH,MEDALL  सह २० स्किल नॉलेज प्रोव्हायडर (SKP) शी सामंजस्य करार केला आहे. ज्याअंतर्गत विद्यार्थ्यांना विद्यावेतन दिले जाणार आहे तरी सर्व विद्यार्थ्यांनी संस्थेशी  प्रवेशासाठी ८ डिसेंबर  २०२१ पर्यंत संस्थेच्या कैलास टॉवर न्यू  शाहूपुरी येथे संपर्क साधावा असे आवाहन संचालक डॉ. संजय दाभोळे यांनी केले आहे यावेळी  पारस ओसवाल, रमेश कार्वेकर, सचिन कुंभोजे,  सूर्यकांत दोडमिसे व प्रतिक ओसवाल सह प्राचार्य रवींद्र वाघ  सर्व संचालक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

जयश्री चंद्रकात (आण्णा) जाधव फाऊंडेशन आयोजित रास दांडियाला उत्स्फूर्त प्रतिसाद

जयश्री चंद्रकात (आण्णा) जाधव फाऊंडेशन आयोजित रास दांडियाला उत्स्फूर्त प्रतिसाद डेलिया ग्रुप प्रथम : जैना ओसवाल गरबा क्वीनची मानकरी : महिलांनी लुटला नृत्याचा आनंद कोल्हापूर/प्रतिनिधी :...

संजय घोडावत यांना एज्युकेशन आयकॉन पुरस्कार

संजय घोडावत यांना एज्युकेशन आयकॉन पुरस्कार अतिग्रे/प्रतिनिधी : शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल संजय घोडावत यांना एज्युकेशन टुडे संस्थेच्या वतीने यावर्षीचा एज्युकेशन आयकॉन पुरस्कार मुंबई...

धडाकेबाज रोमँटिक अ‍ॅक्शनपट ‘नाद – द हार्ड लव्ह’ २५ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार

धडाकेबाज रोमँटिक अ‍ॅक्शनपट 'नाद - द हार्ड लव्ह' २५ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार कोल्हापूर/प्रतिनिधी : २५ ऑक्टोबरला एक धडाकेबाज रोमँटिक अ‍ॅक्शनपट मराठी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.तो...

११ ऑक्टोबर रोजी कोल्हापुरात १२ जिल्ह्यातील शेतकऱ्यांची राज्यव्यापी निर्धार परिषद

शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समिती, महाराष्ट्र ११ ऑक्टोबर रोजी कोल्हापुरात १२ जिल्ह्यातील शेतकऱ्यांची राज्यव्यापी निर्धार परिषद कोल्हापूर/प्रतिनिधी : शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समिती, महाराष्ट्र वतीने जिल्ह्यातील...

Recent Comments