कोल्हापुरात रविवारी होतोय स्वामी समर्थ महाराजांचा नामस्मरण सोहळा – कोल्हापूर ते श्री क्षेत्र अक्कलकोट पदयात्रेच्यावतीने आयोजन
कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्ह्यातील स्वामी भक्तांच्या सहकार्यातून कोल्हापूर ते श्री क्षेत्र अक्कलकोट इच्छापूर्ती महापदयात्रेच्या वतीने कृपासिंधू, ब्रम्हांडनायक श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी १४ नोव्हेंबरला सकाळी ९.०० ते दुपारी १.०० या वेळेत शिवाजी पूल शेजारी, आंबेवाडी-कोल्हापूर येथील दत्त समर्थ सांस्कृती भवन येथे या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या नामस्मरण सोहळ्यावेळी सकाळी ९.०० वाजता स्वामी महाराजांना रुद्राभिषेक, १०.०० वाजता श्री अक्कलकोट महाराज प्रस्तुत महाद्वार स्वामी सेवा भजनी मंडळाचा नंबर एकचा गजर स्वामी नामाचा भजन सोहळा, सकाळी ११.०० वाजता नामस्मरण सोहळा, दुपारी १२.०० वाजता स्वामी भक्तांचे अनुभव, दु. १२.३० वाजता अक्कलकोट पदयाञेची माहिती व प्रक्षेपण, दु. १.०० वाजता महाआरतीने कार्यक्रमाची सांगता होऊन महाप्रसाद वाटप होणार आहे.
या सोहळ्याला सुमारे २००० भाविकांची उपस्थिती अपेक्षित असून साधारण दोन तासात सामुदायिक पंधरा ते सतरा लाख जप अपेक्षित धरला आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर जगावर आलेले संकट आणि त्यामुळे मानवी जीवनावर झालेले नैराश्य यावर भक्तीभावाने घेतलेले स्वामी नाम हा उपाय आहे. स्वामी भक्तांच्यावतीने संकट निवारण्यासाठी प्रत्येक मानवी जीवनात नवचैतन्य फुलवण्याचे काम स्वामी नाम करणार आहे. त्यासाठी सर्व स्वामी भक्तांनी या अमृतमय स्वामी सोहळ्याचा लाभ घेऊन आपल्या जीवनात नवचैतन्य फुलवावे, असे आवाहन सोहळ्याचे आयोजक दीपक कचरे, पदयाञेचे संस्थापक रमेश चावरे, अध्यक्ष अमोल कोरे, कार्याध्यक्ष सुहास पाटील, स्वामी भक्त कुलदीप जाधव, सौ. सीमा राजेंद़ मकोटे यांनी केले आहे.
तसेच दत्त जयंती व मार्गशीर्ष निमित्त कोल्हापुरातून ८ डिसेंबरला पायी दिंडीचे प्रस्थान होणार असून कोल्हापूर ते श्री क्षेत्र अक्कलकोट पदयाञेसाठी भक्तांची नावनोंदणी मोठ्या प्रमाणात झाली आहे. गेल्या सहा वर्षात या पदयात्रेचे वटवृक्षात रूपांतर झाले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातून महिला-पुरुष युवक-युवती यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होतात. सर्व सहभागी भक्तांना अकरा दिवस दोन वेळचे भोजन-महाप्रसाद. चहा-नाश्ता. व निवास व्यवस्था मोफत केली आहे. ज्या भक्तांना सहभागी व्हावयाचे आहे त्यांनी श्री स्वामी समर्थ मंदिर बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड. कोल्हापूर तसेच आयोजक सुहास पाटील ९८९०४८९७१७ अमोल कोरे ९४२०००९०९० रमेश चावरे ९७६३९७८००८ यांच्याकडे नाव नोंदणी करावी, असे आवाहनही यावेळी करण्यात आले आहे.