डॉ.जे.पी.पाटील लिखित प्रगत ऊस उत्पादन तंत्रज्ञान पुस्तकाचे आज प्रकाशन
कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूरने आजही कला,क्रिडासह कृषी परंपरा जपली आहे.कलाकार,खेळाडू घडविणा-या इथल्या मातीची हि ताकदच आहे.कोल्हापूर म्हंटले की जसा तांबडा पांढरा रस्सा आला.तसेच कोल्हापूरी चपलेसह येथील प्रसिद्ध कोल्हापूरी गुळ थेट आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पोहोचला आहे .कोल्हापूरच काय तर महाराष्ट्रात विशेषतः पश्चिम महाराष्ट्रात ऊसाचे पिक महत्वाचे.गु-हाळगृह असो की साखर कारखाना यामुळे जसे राजकारण पाहिले जाते.तसेच संशोधन ही महत्त्वाचे आहे.शेती क्षेत्रात गेली ४५ वर्षे कृषी शास्त्रज्ञ म्हणून आपण सेवा केली.मातीशी असलेली घट्ट नाळ आणि आपल्या या प्रदीर्घ सेवेचा,संशोधनात्मक माहितीचा इत्यंभूत उपयोग समस्त शेतकरी वर्गाला व्हावा,या उदात्त हेतूने आपल्या ४५ वर्षापेक्षा जास्त ऊसावरील संशोधन कामातून,विविध अनुभव,चिंतनातुन ‘ प्रगत ऊस उत्पादन तंत्रज्ञान ‘ या पुस्तकाची निर्मिती माजी वरिष्ठ संशोधन अधिकारी,प्रादेशिक ऊस गुळ संशोधन केंद्र,कोल्हापूरचे डॉ.जे.पी.पाटील यांनी केली आहे.
पारंपारिक ते अत्याधुनिक ऊस लागवडी पासुन ते उत्पादनापर्यंत इत्यंभुत माहिती यामध्ये अगदी वैज्ञानिक पद्धतीने देण्यात आली आहे. अशी माहिती डॉ. संदीप पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
आजपर्यंत पश्र्चिम महाराष्ट्रात अशाप्रकारे संशोधनात्मक व सरळ,साध्या,सोप्या मराठी भाषेतील हे पहिलेच पुस्तक असुन,या विज्ञानरुपी पुस्तकाचा प्रकाशन सोहळा उद्या शुक्रवार दि.१२ नोव्हेंबर २०२१ रोजी दुपारी तीन वाजता राजर्षी छत्रपती शाहू स्मारक भवन येथे संपन्न होत आहे. गृहराज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नाम. सतेज पाटील यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन होत असुन,यावेळी मा.डॉ.बुधाजीराव मुळीकसो (जागतिक दर्जाचे कृषीतज्ञ),प.पू.अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजी सिद्धगिरी मठ,कणेरी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या पुस्तकाच्या माध्यमातून वेगवेगळ्या घटकांवर सरळ व सोप्या भाषेत वैज्ञानिक दृष्टीकोनातून विषयवार तांत्रिक माहिती व शिफारशी देण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न डॉ. जे.पी.पाटील यांनी केलेला आहे.आवश्यक असलेल्या ठिकाणी विशेषतः (स्वतः च्या) छायाचित्रांद्वारे महत्त्वपूर्ण बाबी निदर्शनास आणून देणेचा प्रयत्न त्यांनी केला आहे.ऊस उत्पादक शेतकरी,संशोधक,विस्तारक,साखर कारखाना अधिकारी / कर्मचारी यांना संदर्भ म्हणून हे पुस्तक अतिशय उपयोगी ठरणार आहे.जमिनीची सुपिकता व उत्पादन क्षमता उत्तम ठेवून कमीत कमी खर्चामध्ये अधिक उत्पादन घेण्याच्या दृष्टीने हे कृषी वैज्ञानिक पुस्तक सार्थ ठरेल.तसेच शेतकरी आणि साखर उद्योगास निश्चितच चांगला उपयोग तर होणार आहेच.शिवाय किफायतशीर ऊस उत्पादनास मदत होईल अशी आशा आहे.
तसेच शोध निबंध व मराठी लेख विविध नियतकालिका,कृषिविषयक मासिके,पुस्तिका, घडीपत्रिका,विशेषांक,वृत्तपत्र,कारखान्यांवरील परिसंवाद,प्रशिक्षण वर्ग आदी विविध प्रसार माध्यमांतून प्रसिद्ध केलेल्या ऊसाविषयी निवडक स्वतः च्या लेखांवर आधारित विस्तृत माहिती या पुस्तकातून देण्यात आली आहे.जे ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर उद्योगास संजीवनी म्हणून निश्चितच उपयुक्त ठरेल.हे वैज्ञानिक ग्रंथरूपी पुस्तक लिहिताना मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव,प्रादेशिक ऊस आणि गूळ संशोधन केंद्र, कोल्हापूर,वसंतदादा साखर संस्था,पुणे,अनेक साखर कारखान्यांचे अधिकारी व कर्मचारी आणि कृषि खाते,महाराष्ट्र राज्य येथील शास्त्रज्ञ, अधिकारी यांनी वेळोवेळी व तत्परतेने तांत्रिक मदत केली आहे.
विशेष उल्लेख म्हणून डॉ. जे.पी.पाटील यांचे गुरूवर्य कै.डॉ.ए.के. शिंगटे,मृदा विशेषज्ञ आणि कै.डॉ.बी.सी.पाटील, प्राचार्य कृ.म.वि.अशा मान्यवरांनी वेळोवेळी केलेले मार्गदर्शन आणि उत्तेजनामुळेच आजमितीला हे पुस्तक लिहिणे शक्य झाले आहे असे पाटील यावेळी म्हणाले. प्रयोगशील आणि प्रगतशील शेतकरी आदरणीय ऊसभुषण श्री.सुरेश कबाडे,श्री.श्रेणिकतात्या कबाडे,कारंदवाडी,कृषिरत्न डॉ.संजीवदादा माने, आष्टा (सांगली),श्री.रणजित प्रकाश पाटील, पट्टणकोडोली (कोल्हापूर),श्री.सागर किल्लेदार, तिटवे (कोल्हापूर) यांचे बहुमोल सहकार्य लाभले. डॉ.क्रांती पाटील व डॉ.दत्तात्रय थोरवे,मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र,पाडेगाव आणि डॉ.आर.आर. हसुरे,माजी कृषिविद्यावेत्ता,प्रादे.ऊस व गुळ संशोधन केंद्र,कोल्हापूर यांनी लिखाण व तपासणीच्या कामात विशेष मदत केली.श्री. नितीश घोडके,प्रादेशिक ऊस व गुळ संशोधन केंद्र,कोल्हापूर यांचेही सहकार्य लाभले आजपर्यंतच्या या अविरत सेवेच्या काळात माझे मित्र श्री.बी.आर.देसाई,सेवानिवृत्त जी.एम. सिंजेंटा इंडिया लि.,मुंबई,श्री.विजय भोसले, सी.एम.डी.,भारत ॲग्रो सर्व्हिसेस,कोल्हापूर,श्री. नितिन भोसले,संपादक बळीराजा मासिक,पुणे श्री.विजय देसाई,विजय कृषी सेवा केंद्र, इचलकरंजी यांची मोलाची साथ व सहकार्य मिळाले.पत्रकार परिषदेस डॉ.संदीप ज.पाटील,
डॉ.सागर ज.पाटील आदी उपस्थित होते