देवी त्रंबोलीची ललितापंचमी यात्रा मोजक्या लोकांच्या उपस्थितीत
कोल्हापूर/प्रतिनीधी : मागील वर्षी कोरोनामुळे नवरात्र उत्सव साजरा केला गेला नाही यावर्षी राज्य सरकारने नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने प्रार्थना स्थळे सुरू केले आहेत त्यामुळे आज नवरात्रौत्सवाच्या चौथ्या दिवशी ललिता पंचमी देवी त्र्यंबोली ची यात्रा पार पडली यावेळी मोजकेच भाविक पुजारी उपस्थित होते. यात्रेस बंदी घातल्याने यावर्षीही त्रंबोली ची ललितापंचमी यात्रा मात्र तरीही रीतीरिवाजाप्रमाणे कोहळा फोडण्याचा कार्यक्रम देवी त्र्यंबोली च्या मंदिरात पार पडला.आज ललित पंचमी निमित्त श्री त्र्यंबोलीदेवी टेकडीवर पारंपरिक पध्दतीने कोहळा पूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला. या प्रसंगी श्रीमंत महाराजकुमार मालोजीराजे छत्रपती, श्रीमंत यौवराज शहाजीराजे छत्रपती, श्रीमंत राजकुमार यशराजराजे छत्रपती आणि मानकरी उपस्थित होते.