Friday, September 20, 2024
Home ताज्या खासदारकीचा वापर मिरवण्यासाठी नव्हे तर जिल्हयाची शान वाढवण्यासाठी केला, भाजप प्रदेश प्रवक्ते धनंजय...

खासदारकीचा वापर मिरवण्यासाठी नव्हे तर जिल्हयाची शान वाढवण्यासाठी केला, भाजप प्रदेश प्रवक्ते धनंजय महाडिक यांचं प्रतिपादन

खासदारकीचा वापर मिरवण्यासाठी नव्हे तर जिल्हयाची शान वाढवण्यासाठी केला, भाजप प्रदेश प्रवक्ते धनंजय महाडिक यांचं प्रतिपादन

करवीर तालुक्यातील दोनवडे येथे ग्रामपंचायत कार्यालयाच्या नवीन कार्यालय इमारतीचे झाले उद्घाटन

कोल्हापूर/प्रतिनिधी :  कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील जनतेनं मला खासदार केलं आणि या खासदारकीचा वापर मिरवण्यासाठी नव्हे तर जिल्हयाचा विकास करण्यासाठी आपण केला. केवळ स्वहित बघण्याऐवजी कोल्हापूरची शान वाढवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केला. कोल्हापूरकरांनी महाडिक घराण्याला आमदार, खासदार, जिल्हापरिषद अध्यक्ष अशी पदं दिली. त्यामुळं सात जन्मात कोल्हापूरच्या जनतेचं आपल्यावरील ऋण फिटणार नाही असं मत भाजप प्रदेश प्रवक्ते धनंजय महाडिक यांनी केलं. करवीर तालुक्यातील दोनवडे इथल्या ग्रामपंचायत कार्यालयाच्या नवीन इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.करवीर तालुक्यातील दोनवडे इथं ग्रामपंचायत कार्यालयाची नवीन इमारती बांधण्यात आलीय. त्याचा उद्घाटन सोहळा भाजप प्रदेश प्रवक्ते धनंजय महाडिक यांच्या हस्ते आणि सरपंच सारिका जाधव यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी महाडिक म्हणाले, आपल्या खासदारकीच्या पाच वर्षाच्या कालावधीत, कोल्हापूर लोकसभा मतदार संघात विमानतळ, रेल्वे स्टेशनचे आधुनिकीकरण यासह महत्वाच्या पायाभूत सुविधांसाठी कोट्यवधीचा निधी खेचून आणला. सलग तीनवेळा संसदरत्न, लोकसभेत सर्वाधिक प्रश्न विचारणारा खासदार म्हणून माझा सन्मान झाला. हा सन्मान माझा नसून कोल्हापूरच्या जनतेचा आहे. यशापयश गौण आहे. माझ्याकडं पद नसलं तरी विकास कामांसाठी निधी आणण्याची आपल्यात ताकद असल्याचं त्यांनी नमुद केलं. केंद्रातील भाजप सरकारनं कोरोना काळात देशातील ९० कोटी जनतेला मोफत धान्य देऊन जगण्याची उमेद दिली. जगातील कोणताही देश असा उपक्रम हाती घेवू शकला नाही. मोफत लसीकरणाची मोहीम राबवून कोरोना विरोधातील लढाई मध्ये ऐतिहासिक कामगिरी केली आहे. महाडीक यांनी ७ लाख रूपयांचा निधी दिला म्हणूनच ग्रामपंचायतीचं नवीन कार्यालय उभारता आलं, असं संभाजी पाटील यांनी सांगितलं. कार्यक्रमाला उपसरपंच चिंतामन कांबळे, दिलिप जाधव, दिपाली कदम, वसंत पाटील, चिंतामणी गुरव, ग्रामसेवक संभाजी पाटील यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, विविध संस्थाचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

रोटरी क्लब ऑफ गार्गीजचे अकरावे “यामिनी” प्रदर्शन आजपासून सुरू २०.२१.२२ सप्टेंबर रोजी आयोजित

रोटरी क्लब ऑफ गार्गीजचे अकरावे "यामिनी" प्रदर्शन आजपासून सुरू २०.२१.२२ सप्टेंबर रोजी आयोजित कोल्हापूर/प्रतिनिधी : दसरा दिवाळी जवळ येताच कोल्हापुरच्या जनतेला वेध लागतात ते यामिनी...

पर्यावरण पुरक गणेशोत्सवास सार्वजनिक मंडळांचा उस्फुर्त प्रतिसाद,पोलिस यंत्रणा राबली

पर्यावरण पुरक गणेशोत्सवास सार्वजनिक मंडळांचा उस्फुर्त प्रतिसाद,पोलिस यंत्रणा राबली इराणी खणीमध्ये सार्वजनिक मंडळाच्या १०३५ व घरगुती व मंडळांच्या लहान ११०१ गणेश मूर्तींचे पर्यावरणपूरक विसर्जन कोल्हापूर/प्रतिनिधी :...

श्री सिद्धिविनायक संस्थेची रौप्य महोत्सवी सभा संपन्न

श्री सिद्धिविनायक संस्थेची रौप्य महोत्सवी सभा संपन्न जयसिंगपूर/प्रतिनिधी : श्री.सिद्धिविनायक सहकारी गृहनिर्माण संस्थेची रौप्य महोत्सवी सभा सोसायटीच्या प्रांगणात १५ सप्टेंबर रोजी खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.सभेचे...

स्वामी भक्तांचा शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा

स्वामी भक्तांचा शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा कोल्हापूर/प्रतिनिधी : श्री स्वामी समर्थ भक्त कोल्हापूर शहर व जिल्हा या़ंचेवतीने ज्ञानेश महाराव या इसमाने श्री स्वामी समर्थ महाराजांच्यावर...

Recent Comments