शारदीय नवरात्रोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी करवीर निवासिनी अंबाबाईची माहेश्वरी मातृका रुपात पूजा
कोल्हापूर /प्रतिनिधी : शारदीय नवरात्रोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी करवीर निवासिनी अंबाबाईची माहेश्वरी मातृका रुपात पूजा बांधण्यात आली होती. द्वितीय मातृका माहेश्वरी ही भगवान शंकराची शक्ती आहे. ही नंदीवर आरूढ असून तिला चार हात व त्रिनेत्र आहेत. तिच्या हातात त्रिशूल, डमरू, माळा, वाडगा आहेत. नवरात्रोत्सवाच्या काळात अंबाबाईची विविध रुपात पूजा बांधण्यात येते. ही पूजा पाहण्यासाठी तसेच अंबाबाईच्या दर्शनासाठी संपूर्ण महाराष्ट्रासह देशभरातील भाविक मंदिरमध्ये येत असतात. आजच्या दुसऱ्या दिवशीही मंदिरात भाविकांची गर्दी होती. आजची ही पूजा अरुण मुनिश्वर, सोहम मुनिश्वर आणि सुकृत मुनिश्वर यांनी बांधली आहे.