Sunday, December 22, 2024
Home ताज्या मंदिरे झाली खुली - भाजपाचा आनंदोत्सव,मंदिरासभोवती व्यापाराला परवानगी द्या केली मागणी

मंदिरे झाली खुली – भाजपाचा आनंदोत्सव,मंदिरासभोवती व्यापाराला परवानगी द्या केली मागणी

मंदिरे झाली खुली – भाजपाचा आनंदोत्सव,मंदिरासभोवती व्यापाराला परवानगी द्या केली मागणी

कोल्हापूर/प्रतिनिधी :  गेल्या सहा महिन्यांपासून महाराष्ट्र राज्याच्या जुलमी आणि अधर्मी ठाकरे सरकारने राज्यातील सर्व धार्मिक स्थळांना कुलुपात बंद करुन ठेवले होते. या अन्याया विरोधात भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, विरोधीपक्ष नेते देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने विविध मार्गाने आंदोलन केली. आज या सर्व आंदोलनांना यश म्हणून उशिरा का होईना घटस्थापनेच्या मुहूर्तावर मंदिरे खुली करण्यात आली. या निर्णयाबद्दल भारतीय जनता पार्टी कोल्हापूरच्यावतीने महाद्वार चौक येथे “विजयोत्सव” साजरा करण्यात आला. कार्यकर्त्यांनी अंबा माता की जय, उद ग आई उद, जोतीबाच्या नावांन चांगभल, गणपती बाप्पा मोरया अशा घोषणा दिल्या. यानंतर मान्यवरांच्या हस्ते उपस्थित नागरिकांना साखर – पेढे वाटून आनंद व्यक्त केला.
याप्रसंगी बोलताना जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे म्हणाले, कोरोनाच्या संकटकाळानंतर राज्यामध्ये इतर सर्व गोष्टी सुरु झाल्या असताना ज्या ठिकाणी लोकांना एक प्रकारची एनर्जी प्राप्त होत असते अशी श्रद्धास्थाने सरकारने यापूर्वीच सुरु करायला हवी होती. परंतु त्यांनी सर्व सामान्यांची हि शक्तीपीठे का बंद ठेवली हाच एक मोठा प्रश्न आहे. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत एकत्र राहून शिवसेनेने हिंदुत्व गेले हे दुर्देवी आहे. राज्यातील मंदिरे आज सुरु झाली या निर्णयाबद्दल मुख्यमंत्र्यांना उशिरा का होईना देवाने बुद्धी दिली त्याबद्दल देवाचे आभार मानत असल्याचे सांगितले. त्याचबरोबर आजचे प्रशासन हे सरकारी अजेंडा राबवत आहेत. दुसरी लाट, तिसरी लाट अशा पद्धतीने भीतीचे वातावरण निर्माण करून लोकांना लुटण्याचे काम सुरु आहे. सत्तेत असणा-या पक्षांना समाजासाठी, लोकहितासाठी कोणतेही कार्य करायचे नसून फक्त सत्तेत राहून ओरबडून पैसे मिळवायचे हे एकमेव कार्य सुरु असल्याचे सांगितले.  अशा या दळभद्री सरकारचा जगदंबा योग्य वेळी न्याय करेल असे सांगत लवकरात लवकर पुन्हा एकदा देवेंद्रजी फडणवीस, चंद्रकांतदादा पाटील यांच्या नेतृत्वातील जनतेच्या सेवेसाठी सक्षम असणारे सरकार सत्तेत यावे अशी प्राथना केली.
याप्रसंगी बोलताना भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य महेश जाधव म्हणाले, भारतीय जनता पार्टीच्या संघर्षामुळे या महिषासुर सरकारला वठणीवर यावे लागेल. आजचा हा दिवस आम्ही आनंदाने साजरा करणार आहोत. शासनाने मंदिरांची दारे उघडलीत परंतु भक्तांना देवीला भेटण्यासाठी अनेक निर्बंघ व अटी घातल्या आहेत. मंदिरे उघडण्या बरोबर अशा मंदिरांच्या सभोवती व्यापार, व्यवसाय करणाऱ्या लहान मोठ्या घटकांचा देखील विचार होणे गरजेचे असल्याचे सांगितले. स्थानिक भक्तांना रोज ईपास अन्यायकारक असून मंदिरा मध्ये योग्य ती खबरदारी करून भक्तांना प्रवेश द्यावा अशी मागणी केली. व्यवसायाची बंदी घातल्यामुळे फेरीवाल्यांना शासनाच्यावतीने महिनाला योग्य ती रक्कम द्यावी मगच या जुलमी अटी घालाव्यात असे सांगत भारतीय जनता पार्टीच्यावतीने प्रशासनाकडे मागणी केली कि, मंदिरा सभोवतालच्या सर्व व्यवसायिक, व्यापारी, छोटे विक्रेते यांना व्यवसाय करण्यासाठी जुलमी अटी-शर्ती न घातला व्यवसाय करण्याची परवानगी दिली पाहिजे.
सरचिटणीस हेमंत आराध्ये यांनी प्रास्ताविक केले तर संघटन सरचिटणीस अशोक देसाई, सरचिटणीस विजय जाधव, भाजपा प्रवक्ते विजय जाधव यांनी देखील मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी सरचिटणीस गणेश देसाई,  प्रदीप उलपे, विजय आगरवाल, विजयसिंह खाडे-पाटील, अभिजित शिंदे,  नझिर देसाई, इकबाल हकीम, डॉ राजवर्धन, भरत काळे, आशिष कपडेकर, सुजाता पाटील,  विशाल शिराळकर, गणेश चिले, दिलीप बोन्द्रे, तानाजी निकम, अशोक लोहार, राजाराम परिट, विराज चिखलीकर, सुधीर देसाई,  सचिन साळोखे, रवींद्र घाटगे, महेश यादव, अनिल कामत, प्रीतम यादव, सिद्धू पिसे यांच्यासह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

डी. वाय. पाटील फार्मसी,नर्सिंगला विजेतेपद

डी. वाय. पाटील फार्मसी,नर्सिंगला विजेतेपद -डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ अंlतरमहाविद्यालय खो -खो स्पर्धा कोल्हापूर/प्रतिनिधी : डी.वाय.पाटील अभिमत विद्यापीठ अंतर्गत अंlतरमहाविद्यालय खो-खो स्पर्धेत मुलांच्या गटात डी.वाय...

मनोरंजनाची संगीतमय सफर घडवणारा ‘श्री गणेशा’ उद्या २० डिसेंबरला होणार प्रदर्शित

मनोरंजनाची संगीतमय सफर घडवणारा 'श्री गणेशा' उद्या २० डिसेंबरला होणार प्रदर्शित कोल्हापूर/प्रतिनिधी : कोणत्याही नवीन गोष्टीची सुरुवात 'श्री गणेशा' म्हणून केली जाते. सध्या रसिकांमध्येही अशाच...

विहिंप – बजरंग दलवतीने गीता जयंती निमित्त शौर्य सप्ताहनिमित्त संचलन

विहिंप - बजरंग दलवतीने गीता जयंती निमित्त शौर्य सप्ताहनिमित्त संचलन कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : विश्व हिंदू परिषद - बजरंग दल तर्फे संपुर्ण भारतात दरवर्षी...

जगप्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकिर हुसेन यांचे निधन

जगप्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकिर हुसेन यांचे निधन   कोल्हापूर/प्रतिनिधी : उस्ताद झाकीर हुसेन यांचा जन्म ९ मार्च, १९५१ रोजी झाला होता.तर वयाच्या ७३ व्या वर्षी त्याचे...

Recent Comments