मुश्रीफसाहेब, लवकर बरं व्हा….मुरगूडच्या माता भगिनींचे अंबाबाईला साकडं
कोल्हापूर/मुरगूड/प्रतिनिधी :
मुश्रीफसाहेब, लवकर बरं व्हा आणि सुखरूप परत या, असे म्हणत मुरगूड ता कागल येथील माता-भगिनीनी ग्रामदैवत श्री अंबाबाई देवीला साकड घातलं. येथील महिलांनी डोकीवर पाण्याने भरलेले कलश घेऊन ग्रामदैवताला ज्याला जलाभिषेक केला. सकाळी नऊच्या सुमाराला मुरगूडच्या गावभागातून या महिला मिरवणुकीने मंदिरापर्यंत आल्या.
कलश मिरवणुकीच्या अग्रभागी मंत्री मुश्रीफ यांच्या फोटोसह , ‘साहेब, लवकर बरं व्हा’ हे वाक्य लिहिलेला डिजिटल फरक लक्ष वेधून घेत होता
यावेळी माजी उपनगराध्यक्ष माया सुनिल चौगले, नगरसेवक संगीता प्रकाश चौगले, कल्पना सुनील डवरी, मालुताई लक्ष्मण मांगोरे, पुष्पा अशोक चौगले, आक्काताई लक्ष्मण चौगले, कलावती नितीन कांबळे, नीता निवृत्ती हसबे, शुभांगी सुखदेव चौगले, नंदा किरण चौगले आधी प्रमुख महिलांसह इतर महिला व कार्यकर्ते उपस्थित होते.
चौकट-…..
आमच्या बंधुरायाला चांगलं आरोग्य लाभू दे…..
यावेळी उपस्थित महिलांनी ग्रामदैवत श्री अंबाबाई देवीला साकडे घातलं की, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ हे गोरगरिबांचे कैवारी आणि आम्हा माता -भगिनींचे बंधुराया आहेत. आमच्या या बंधुरायाची कोरोना आजारातून लवकरच मुक्ती होऊन त्यांना चांगलं आरोग्य लाभू दे. पुन्हा नेहमीप्रमाणे त्याला दिवस-रात्र जनसेवा करण्यासाठी सुखरूप ठेव.