- पुरग्रस्तांच्या मागण्या सरकारला कळविणार -जिल्हाधिकारी राहूल रेखावार
कोल्हापूर /प्रतिनिधी : अतिवृष्टीमुळे कोल्हापूर जिल्ह्यात विशेषता शिरोळ भागाचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे . या नुकसानीच्या अनुषंगाने शिरोळ पूरग्रस्त संघर्ष समितीची १५ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे बैठक पार पडली . या बैठकीत पूरग्रस्तांच्या न्यायोचित मागण्या सरकारला कळविणार असल्याचे जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी स्पष्ट केले .यावेळी नुकसान झालेला ऊस व इतर कुजलेली पिके काढण्यासाठी रोहयोअंतर्गत तरतूद करण्याची मागणी समितीने केली. यावेळी साखर कारखान्यांना हा खराब झालेला ऊस खते वा इतर उपपदार्थ तयार करण्यासाठी वापरता येईल काय याची पडताळणी कृषी विभागामार्फत करावी तसेच तशी शक्यता असल्यास सर्व साखर कारखान्यांनी यात पुढाकार घ्यावा असे आवाहन त्यांनी केले , या बैठकीत महावितरच्या अधिका-यांनी साधारणत: ११०० विद्युत खांब पडले, ३५० ट्रान्सफॉर्मर झुकले आहेत तर ८० ट्रान्सफॉर्मर पडल्याचे सांगितल्यावर संपूर्ण विद्युत खांब क्रॉकिट पायामध्ये नव्याने बसवावेत, त्याचप्रमाणे ट्रान्फॉर्मर करीता कायमस्वरुनी क्रॉकिटचे स्ट्रक्चर उभे करण्याची सुचना जिल्हाधिकाऱ्यांनी केली .
काही फायनान्स कंपन्या पूरग्रस्तांकडून जबरदस्तीने कर्ज वसुली करीत आहेत त्या
फायनान्स कंपन्याविरुध्द कर्जदारांनी फौजदारी
गुन्हे दाखल करावेत असे स्पष्ट निर्देश या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी दिले तसेच संबंधितांनी शॉप अॅक्ट लायसन्स बाळगावे ,बोगस शॉप अॅक्ट लायसन्स आढळून आल्यास अर्जदारांवर फौजदारी कार्यवाही करण्याचा इशारा दिला .
पूरग्रस्त गावांचे पुनर्वसन करावे अशी मागणी समितीने केल्यानंतर , जिल्हाधिकारी म्हणाले , गावनिहाय जी पूरग्रस्त कुटूंबे , पूरबाधीत घराजागा शासनाला देण्यास तयार आहेत त्यांची लेखी संमती घेवून तसेच ग्रामसभेचे ठराव घेवून संबंधित गावांनी असा प्रस्ताव तयार करावा व त्यानुसार संबंधितांच्या पुनर्वसनांबाबत पुढील धोरण ठरवून निश्चित कार्यवाही केली जाईल असेही जिल्हाधिकारी म्हणाले .
यावेळी पूरग्रस्तांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे काही मागण्या मांडल्या त्यामध्ये , पूरामुळे नुकसान झालेला शेतातला ऊस काढणे शेत रिकामे करणे या कामांचा समावेश रोजगार हमी योजने अंतर्गत करणे, पूरग्रस्त गावामध्ये पिक कर्ज माफ करावे, पुढील तीन महिन्यांकरीता विज बिल मागणी करु नये, उदयोगांना विज बिल व कर्जावरील व्याजामध्ये सवलत मिळावी, सानुग्रह अनुदानाची रक्कम वाढवून मिळाव,जनावरे व घरगुती साहित्य स्थलांतरित करताना वापरल्या टेम्पोचे भाडे मिळावे, शिरोळ तालुक्याकरीता स्वतंत्र पुनर्वसन अधिका-याची नियुक्ती व्हावी, पूरग्रस्त ग्रामपंचातींना वार्षिक दहा लाख रुपये पूर निधी मिळावा अशा विविध मागण्या सादर केल्यानंतर. या धोरणात्मक मागण्या शासनाला कळविल्या जातील असेही जिल्हाधिकारी रेखावार यांनी सष्ट केले . या बैठकीसाठी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने, माजी आमदार उल्हास पाटील, पृथ्वीराज यादव, राजवर्धन निंबाळकर,धनाजी चुडमुंगे, पांडूरंग गायकवाड, अशोक माने, दिगंबर सकट ,अतिरिक्त उप अभियंता महावितरण प्रकाश तवर व तालुकास्तरीय अधिकारी उपस्थित होते.