जिल्ह्यात डेल्टा प्लसचे ७ रुग्ण
कोल्हापूर/ (जिमाका) जिल्हयात कोविड आजाराचे ,डेल्टा प्लस व्हेरिएन्टचे ७ रुग्ण आढळून आले आहेत . राज्य सर्वेक्षण कार्यालय पुणे या संस्थेकडून या संदर्भात अहवाल प्राप्त झाला आहे .
यामध्ये शहरातील साने गुरुजी वसाहत दोन , विचारे मळा एक आणि चव्हाण कॉलनी येथील एका रुग्णाचा समावेश आहे तर हातकणंगले तालुक्यात दोन तर करवीरमध्ये एक रूग्ण असे एकूण ७ रूग्ण आढळले आहेत .
१८ वर्षावरील एक , ६० वर्षावरील दोन तर १९-४५ वयोगटात चार रुग्ण सापडले असून या रुग्णांमध्ये ४ स्त्रियांचा तर ३ पुरूषांचा समावेश आहे . हे सर्व रुग्ण बरे आहेत . या आजाराबाबत नागरिकांनी घाबरून जाऊ नये तसेच कोविड नियमांचे पालन करावे असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे .