ह. बाबुजमाल शहाजमाल कलंदर रहमतुल्लाअलै दर्गा शरीफ येथे बैठक पार
कोल्हापूर/प्रतिनिधी : हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतिक असलेल्या ह. बाबुजमाल शहाजमाल कलंदर रहमतुल्लाअलै दर्गा शरीफ कोल्हापूर येथे आज मोहरम सणानिमित्त बैठक पार पडली. विविध पंजे बसविणारे , घरी पंजे बसविणारे यांच्या संभ्रम अवस्था पाहून ही बैठक पार पडली. यावेळी मोहरमची सातवी, आठवी व नववी तारीख व पंजे विसर्जन याबद्दल चर्चा झाली. सोमवार १६ तारखेला मोहरमची सातवी तारीख आहे, मंगळवार १७ तारखेला मोहरमची आठवी तारीख आहे, बुधवार १८ तारखेला मोहरमची नववी तारीख आहे तसेच गुरुवारी १९ तारखेला पंजे विसर्जन केले जाणार आहेत. खत्तल रात्र बुधवार दिनांक १८ तारखेला आहे. याची सर्व भाविकांनी नोंद घ्यावी. सदर मीटिंगला दर्ग्यातील खादिम उपस्थित होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाविकांनी खत्तलरात्री दर्शनासाठी गर्दी करू नये. खादिम व मानकरी यांच्या उपस्थितीतच खत्तल रात्रीचा विधी पार पडणार आहे. प्रशासनास सहकार्य करावे. ऑनलाईन दर्शन घ्यावे. असे आवाहन करण्यात आले.