Sunday, December 22, 2024
Home ताज्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात सुमारे १ हजार कोटीहून अधिक नुकसान -जिल्हाधिकारी  

अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात सुमारे १ हजार कोटीहून अधिक नुकसान -जिल्हाधिकारी  

अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात सुमारे १ हजार कोटीहून अधिक नुकसान -जिल्हाधिकारी

कोल्हापूर/दि.१४ (जिल्हा माहिती कार्यालय) : जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात सुमारे १ हजार ५० कोटीहून अधिक रकमेचे नुकसान झाले असल्याचा प्रशासनाचा अंदाज आहे. अतिवृष्टीमुळे विविध मार्गाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरु असून आगामी काही दिवसात ही प्रक्रिया पुर्ण होईल अशी माहिती जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी दिली. सध्या जिल्ह्यात पुरबाधित क्षेत्रात पंचमाने सुरु आहेत. जिल्ह्यातील पुरबाधितांना सानुग्रह अनुदानासाठी आगाऊ मदत म्हणून शासनाकडून १७ कोटी ४२ लाख ५ हजार इतका निधी प्राप्त झाला आहे. जिल्ह्यात ७१ हजार २८९ इतकी पुरबाधित कुटुंबसंख्या असून त्यापैकी ६१ हजार ८६४ इतक्या जणांचे पंचनामे पुर्ण झाले आहेत. अतिवृष्टीमुळे ५ हजार ७८९ घरांची अंशता तर १ हजार १०७ घरांची पुर्ण पडझड झाली आहे. त्यापैकी अनुक्रमे ५ हजार १०३ व ८०९ इतके पंचमाने पुर्ण झाले आहेत. जिल्ह्यातील २ हजार ४६६ गोठा पडझडी पैकी केवळ ६४६ पंचनामे शिल्लक राहिले आहेत तर १२ हजार १५७ दुकानधारकांपैकी सुमारे ९ हजार ६७५ जणांचे पंचनामे पुर्ण आहेत.
अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका कृषी क्षेत्राला बसला असून पुरामुळे ५८ हजार ९९७ हेक्टर इतके क्षेत्र बाधित झाले त्यापैकी आज अखेर २४ हजार ६७० हेक्टर इतक्या क्षेत्राचे पंचनामे पुर्ण झाले आहेत. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात ७ व्यक्ती मृत झाल्या होत्या. शासकीय निकषानुसार ६ मृत व्यक्ती आर्थिक मदतीसाठी पात्र असून या मृत्यांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ४ लाख रुपये सानुग्रह अनुदान वितरीत करण्यात आले आहे. तर १ मृत व्यक्तीच्या कुटुंबियांना गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात योजनेअंतर्गत मदत देण्यासंदर्भातील प्रस्ताव कृषी विभागाकडे सादर करण्यात आला आहे. या आपत्तीमध्ये १६१ जनावरे मयत झाली असून, १३ कुटुंबातील सुमारे १५ हजार १७८ इतक्या पोल्ट्री पक्षांचा पंचनामा पुर्ण झाला आहे. हस्तकला, हातमाग, क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या १ हजार १६९ कारागीरांपैकी ९४१ जणांचे पंचनामे पुर्ण झाले आहेत. उर्वरित पंचनामे लवकरात लवकर पुर्ण करावेत अशा सूचना संबंधित यंत्रणांना दिल्या असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

Previous articleजिल्ह्यातील विविध विकास कामांबाबात राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांची जिल्हाधिकारी राहुल रेखवार यांच्याशी चर्चा
Next articleह. बाबुजमाल शहाजमाल कलंदर रहमतुल्लाअलै दर्गा शरीफ येथे बैठक पार कोल्हापूर/प्रतिनिधी : हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतिक असलेल्या ह. बाबुजमाल शहाजमाल कलंदर रहमतुल्लाअलै दर्गा शरीफ कोल्हापूर येथे आज मोहरम सणानिमित्त बैठक पार पडली. विविध पंजे बसविणारे , घरी पंजे बसविणारे यांच्या संभ्रम अवस्था पाहून ही बैठक पार पडली. यावेळी मोहरमची सातवी, आठवी व नववी तारीख व पंजे विसर्जन याबद्दल चर्चा झाली. सोमवार १६ तारखेला मोहरमची सातवी तारीख आहे, मंगळवार १७ तारखेला मोहरमची आठवी तारीख आहे, बुधवार १८ तारखेला मोहरमची नववी तारीख आहे तसेच गुरुवारी १९ तारखेला पंजे विसर्जन केले जाणार आहेत. खत्तल रात्र बुधवार दिनांक १८ तारखेला आहे. याची सर्व भाविकांनी नोंद घ्यावी. सदर मीटिंगला दर्ग्यातील खादिम उपस्थित होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाविकांनी खत्तलरात्री दर्शनासाठी गर्दी करू नये. खादिम व मानकरी यांच्या उपस्थितीतच खत्तल रात्रीचा विधी पार पडणार आहे. प्रशासनास सहकार्य करावे. ऑनलाईन दर्शन घ्यावे. असे आवाहन करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

डी. वाय. पाटील फार्मसी,नर्सिंगला विजेतेपद

डी. वाय. पाटील फार्मसी,नर्सिंगला विजेतेपद -डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ अंlतरमहाविद्यालय खो -खो स्पर्धा कोल्हापूर/प्रतिनिधी : डी.वाय.पाटील अभिमत विद्यापीठ अंतर्गत अंlतरमहाविद्यालय खो-खो स्पर्धेत मुलांच्या गटात डी.वाय...

मनोरंजनाची संगीतमय सफर घडवणारा ‘श्री गणेशा’ उद्या २० डिसेंबरला होणार प्रदर्शित

मनोरंजनाची संगीतमय सफर घडवणारा 'श्री गणेशा' उद्या २० डिसेंबरला होणार प्रदर्शित कोल्हापूर/प्रतिनिधी : कोणत्याही नवीन गोष्टीची सुरुवात 'श्री गणेशा' म्हणून केली जाते. सध्या रसिकांमध्येही अशाच...

विहिंप – बजरंग दलवतीने गीता जयंती निमित्त शौर्य सप्ताहनिमित्त संचलन

विहिंप - बजरंग दलवतीने गीता जयंती निमित्त शौर्य सप्ताहनिमित्त संचलन कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : विश्व हिंदू परिषद - बजरंग दल तर्फे संपुर्ण भारतात दरवर्षी...

जगप्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकिर हुसेन यांचे निधन

जगप्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकिर हुसेन यांचे निधन   कोल्हापूर/प्रतिनिधी : उस्ताद झाकीर हुसेन यांचा जन्म ९ मार्च, १९५१ रोजी झाला होता.तर वयाच्या ७३ व्या वर्षी त्याचे...

Recent Comments