जिल्ह्यातील विविध विकास कामांबाबात राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांची जिल्हाधिकारी राहुल रेखवार यांच्याशी चर्चा
कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्ह्यातील विविध विकास कामे प्रलंबित असून त्याचा योग्य पाठपुरावा व्हावा याकरिता राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री. राजेश क्षीरसागर यांनी जिल्हाधिकारी राहुल रेखवार यांच्याशी चर्चा केली. यासह मुख्यमंत्री नाम.उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली शासनातील सर्वच घटक अहोरात्र काम करत असून, शासनाचे उत्तमरीतीने सुरु असलेले काम खुपत असल्याने प्रसिद्धीसाठी विरोधी पक्षाकडून शासनाच्या बदनामीचा डाव आखला जात आहे. प्रसिद्धीमाध्यमे लोकशाहीचा चौथा खांब असून, प्रसारमाध्यमे आणि अधिकाऱ्यांनी परस्पर समन्वय साधावा, असे आवाहन करत कोल्हापूर जिल्ह्याच्या विविध विकासात्मक बाबींबाबत राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांच्याशी चर्चा केली.
यावेळी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागरयांनी जिल्हाधिकारी राहुल रेखवार यांच्याशी चर्चा करताना कोल्हापूर महानगरपालिकेस नगरोत्थान मधून मंजूर होणाऱ्या रु.१७८ कोटींच्या निधीचा आराखडा तयार करावा. गतवेळच्या महापुराच्या धर्तीवर या वर्षीच्या महापूराच्या पाण्यात बाधित झालेल्या अपार्टमेंटमधील वरच्या मजल्यावरील रहिवासी नागरिकांनाही शासनाने मदत जाहीर केली असून त्यांच्यापर्यंत मदत पोहचवावी. शहराच्या हद्दवाढीच्या दृष्टीने पाठपुरावा करावा. आयटी क्षेत्रात कोल्हापूरला नवी संधी असून, स्थानिक युवकांना नोकरीसाठी बाहेरील शहरात जावे लागते, त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात आयटी पार्क सारखी संकल्पना राबविण्याचा आराखडा तयार करावा. श्री अंबाबाई तीर्थक्षेत्र आराखडा शासनाकडून मंजूर झाला असून, त्याच्या निधीकरिता पाठपुरावा करावा आदी विषयांच्याबाबतीतही चर्चा करण्यात आली.
यावेळी बोलताना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर, सत्तेत असताना ज्यांना डॉक्टर, नर्सेस, व्यापारी बांधवांचे प्रश्न कळले नाहीत, राज्यातील दोन नंबरचे प्रमुख मंत्री कोल्हापुरात असताना देखील कोल्हापूरचा विकास खुंटला, कोल्हापूरसाठी कोणताही ठोस निर्णय, योजना आखता आली नाही, असे असताना आरोग्य परिचारिकांच्या बदल्यांसंदर्भात झालेल्या आंदोलनाचा फायदा घेवून विरोधी पक्षाकडून शासनाच्या बदनामीचा कुटील डाव आखण्यात येत आहे. आरोग्य परिचारिकांच्या ९० टक्के बदल्या कौन्सिलिंग द्वारे झाल्या असून, काही कर्मचाऱ्यांच्यात नाराजी असेल तर ती दूर करण्यास शासन सक्षम आहे, कोरोना काळात मुख्यमंत्री नाम.मा.श्री.उद्धवजी ठाकरे साहेबांनी केलेले काम राज्यातील जनतेला माहित असून, नागरिकांच्या आरोग्याविषयी आणि कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाबाबत शासन संवेदनशील आहे. प्रसिद्धीमाध्यमाकरवी यथोचित माहिती नागरिकांना मिळत असल्याने त्यांचा सन्मान ठेवणे गरजेचे असून, प्रसिद्धीमाध्यमे आणि शासन अधिकाऱ्यांनी परस्पर समन्वय साधावा, असे आवाहन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी केले. यावेळी शिवसेना शहरप्रमुख जयंवत हारुगले, माजी नगरसेवक रविकिरण इंगवले उपस्थित होते.