Tuesday, January 14, 2025
Home ताज्या जगदगुरू नरेंद्राचार्यजी महाराज संस्थानच्या वतीने कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांना ४२ टन धान्यवाटप

जगदगुरू नरेंद्राचार्यजी महाराज संस्थानच्या वतीने कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांना ४२ टन धान्यवाटप

जगदगुरू नरेंद्राचार्यजी महाराज संस्थानच्या वतीने कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांना ४२ टन धान्यवाटप

कोल्हापूर/प्रतिनिधी : श्रीक्षेत्र नानिजाधाम येथील जगदगुरू नरेंद्राचार्यजी महाराज संस्थान यांच्या वतीने त्यांच्या कोल्हापूर जिल्हा सेवा समिती यांच्यामार्फत, कोल्हापूर जिल्ह्यात पुराचा फटका बसलेल्या शिरोळ तालुक्यातील बस्तवाड, घालवाड, कुटवाड, दानोळी व कुरुंदवाड तसेच कोल्हापूर शहरात बापट कॅम्प, जाधववाडी, भोसलेवाडी, कुंभार गल्ली, कदमवाडी, सुतारमळा- फुलेवाडी आणि करवीर तालुक्यातील आंबेवाडी आणि पन्हाळा, भुदरगड, शाहुवाडी आणि गगनबावडा या तालुक्यातही धान्यवाटप करण्यात आले. या कीटचे वजन ३५ किलो असून यामध्ये २० किलो तांदूळ, ५ किलो गव्हाचे पीठ, २ किलो तुरडाळ, २ किलो बटाटे, २ किलो कांदे, खाद्य तेल १ पिशवी, तिखट २५० ग्रम, हळद, काडेपेटी, मेणबत्ती, मीठ ई वस्तूंचा प्रामुख्याने समावेश आहे. अशी १२०० जीवनावश्यक वस्तूंची कीट वाटप करण्यात आली.एकूण ४२ टन धान्याचे वाटप कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांना करण्यात आले. कीटवाटपाचा कार्यक्रम गेल्या ८ दिवसापासून विविध ठिकाणी चालू आहे.
महापूराने कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक भाग पाण्याखाली गेले होते, त्यामध्ये घरांचे आणि इतर संसारोपयोगी वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते,घरे पाण्याखाली गेल्याने अनेक कुटुंबे उघद्यड्यावर होती, अतिशय अडचणीत असलेल्या या कुटुंबांना चारीतार्थासाठी तातडीने उपयोगी पडावे म्हणून संस्थानतर्फे या जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले, नेमक्या गरजूंपर्यंत हे वाटप झाल्याने त्यांच्यात समाधान व्यक्त होत आहे, त्यांना त्याचा मोठा आधार झाला असून कीट मिळालेल्या लाभार्थांकडून समाधान व्यक्त होत आहे.
यापूर्वी महाड व चिपळूण येथेही पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंची अशी कीट देण्यात आली आहेत, दोन्ही ठिकाणी मिळून संस्थानाच्या ८ हजार सेवाकार्त्यांनी स्वच्छता अभियान राबविले आणि तिथे अन्नादान सुद्धा करण्यात आले.
१५ ऑगस्ट रोजी बस्तवाड या गावी शेवटचा कार्यक्रम घेऊन या कीट वाटपाच्या कार्यक्रमाचा समारोप झाला, बस्तवाड हे पूर्णच गाव पाण्याखाली असलेमुळे येथे संस्थांनकडून एकूण ५०० कीट वाटप करण्यात आली.
या कार्यक्रमास माजी खासदार मा. श्री राजू शेट्टी हे प्रमुख पाहुणे म्हणून लाभले होते, त्याचबरोबर माजी आमदार श्री उल्हास पाटील, माजी बांधकाम सभापती सावकार मादनाईक, संस्थानचे विश्वस्त अभिजित अवसरे, जिल्हा निरीक्षक श्री मनोहर उर्फ आप्पा गुंड, कोल्हापूर जिल्हा सेवाध्यक्ष मोहन शहा, हिंदु संग्राम सेना पिठ विकास ब्रिगेडियर श्री दिलीप कोळी, कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व तालुका अध्यक्ष आज-माजी पदाधिकारी, गुरुबंधु, गुरुभगिनी तसेच बस्तवाड सरपंच श्री प्रदीप चौगुले, उपसरपंच बाळासो कोळी, ग्रामविकास अधिकारी श्री विनायक शेवरे, सर्व सदस्य, गटप्रमुख जाफर पटेल, सुरेंद्र जंगम, साहेबलाल प्रोफेसर, राकेश कांबळे आदी उपस्थित होते.
जगदगुरू नरेंद्राचार्यजी महाराज संस्थांनचे वैशिष्ट म्हणजे हे आध्यात्माबरोबर सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असते. मागील वर्षी कोरोना काळ लक्षात घेऊन, संस्थांनमार्फत पंतप्रधान निधीला ५२ लाख रुपये, मुख्यमंत्री फंडास ५० लाख रुपये आणि रत्नागिरी पोलीस कल्याण निधीला २५ लाख असे मिळून १ कोटी २७ लाख रुपयांची मदत दिली होती, त्याचबरोबर संस्थानचे सामाजिक उपक्रम अहोरात्र चालू आहेत, त्यापैकी प्रामुख्याने, संस्थानच्या २७ अम्बुलन्स या गेल्या ११ वर्षापासून विनामूल्य सेवा देत असून आत्तापर्यंत १४५०० लोकांचे प्राण वाचविले आहेत, २०१९ च्या महापुरात कोल्हापूर जिल्ह्यात संस्थानमार्फत ११०० टन चारा आणि जीवनापयोगी साहित्य वाटले होते, संस्थांनमार्फत कित्येक वर्षापासून गरजू व्यक्तीना मोफत रक्त पुरविले जाते, त्याकरिता संस्थानाने हेल्पलाईन नंबर ठेवला आहे, सदर नंबर वर फोन केल्यास आपल्याला मोफत रक्त मिळू शकते या योजनेस” ब्लड ईन नीड”असे म्हणतात, नाणीज येथे अद्यावत हॉस्पिटल बांधले असून तेथे रुग्णांवर मोफत उपचार केले जातात, त्याचबरोबर दुर्गम भागातील तरुणांना चार चाकी गाडी शिकवून त्यांना वाहन परवाना मिळवून देऊन स्वताच्या पायावर उभे राहण्यास संस्थान मदत करते, हा संपूर्ण उपक्रम मोफत राबविला जातो. त्याचबरोबर नाणीजपिठावर येणाऱ्या सर्वांनाच २ वेळचे मोफत भोजन कित्येक वर्षापासून चालू आहे.

Previous articleह. बाबुजमाल शहाजमाल कलंदर रहमतुल्लाअलै दर्गा शरीफ येथे बैठक पार कोल्हापूर/प्रतिनिधी : हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतिक असलेल्या ह. बाबुजमाल शहाजमाल कलंदर रहमतुल्लाअलै दर्गा शरीफ कोल्हापूर येथे आज मोहरम सणानिमित्त बैठक पार पडली. विविध पंजे बसविणारे , घरी पंजे बसविणारे यांच्या संभ्रम अवस्था पाहून ही बैठक पार पडली. यावेळी मोहरमची सातवी, आठवी व नववी तारीख व पंजे विसर्जन याबद्दल चर्चा झाली. सोमवार १६ तारखेला मोहरमची सातवी तारीख आहे, मंगळवार १७ तारखेला मोहरमची आठवी तारीख आहे, बुधवार १८ तारखेला मोहरमची नववी तारीख आहे तसेच गुरुवारी १९ तारखेला पंजे विसर्जन केले जाणार आहेत. खत्तल रात्र बुधवार दिनांक १८ तारखेला आहे. याची सर्व भाविकांनी नोंद घ्यावी. सदर मीटिंगला दर्ग्यातील खादिम उपस्थित होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाविकांनी खत्तलरात्री दर्शनासाठी गर्दी करू नये. खादिम व मानकरी यांच्या उपस्थितीतच खत्तल रात्रीचा विधी पार पडणार आहे. प्रशासनास सहकार्य करावे. ऑनलाईन दर्शन घ्यावे. असे आवाहन करण्यात आले.
Next article‘माझ कोल्हापूर-निरोगी कोल्हापूर’ संकल्प करुया -पालकमंत्री सतेज पाटील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फार्मसी, कोल्हापूर येथे प्रथम, वर्ष बी. फार्मसी विद्यार्थ्यासाठी इन्डक्शन प्रोग्रॅम संपन्न

भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फार्मसी, कोल्हापूर येथे प्रथम, वर्ष बी. फार्मसी विद्यार्थ्यासाठी इन्डक्शन प्रोग्रॅम संपन्न कोल्हापूर/प्रतिनिधी : भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फार्मसी, कोल्हापूर येथे नवीन...

आज ११ जानेवारी रोजी दसरा चौक मैदानावर उर्दू कार्निवल २०२५ चे आयोजन – गणी आजरेकर यांनी दिली माहिती

आज ११ जानेवारी रोजी दसरा चौक मैदानावर उर्दू कार्निवल २०२५ चे आयोजन - गणी आजरेकर यांनी दिली माहिती   कोल्हापूर/प्रतिनिधी : उर्दू भाषेची ओळख व्हावी आणि...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज कोल्हापूरमध्ये

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज कोल्हापूरमध्ये कोल्हापूर/ (जिमाका) : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे आहे.आज सोमवार,दिनांक ६ जानेवारी २०२५ रोजी...

जनस्वास्थ्य दक्षता समिती व कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघ यांच्या वतीने १ ते ६ जानेवारी २०२५ जनस्वास्थ्य अभियान

जनस्वास्थ्य दक्षता समिती व कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघ यांच्या वतीने १ ते ६ जानेवारी २०२५ जनस्वास्थ्य अभियान कोल्हापूर/प्रतिनिधी : आरोग्य, पर्यावरण, व्यसनाधीनता आणि वैज्ञानिक दृष्टिकोन...

Recent Comments