Friday, November 22, 2024
Home ताज्या युवा पत्रकार संघाचे कार्य प्रशंसनीय - माजी खासदार धनंजय महाडिक

युवा पत्रकार संघाचे कार्य प्रशंसनीय – माजी खासदार धनंजय महाडिक

युवा पत्रकार संघाचे कार्य प्रशंसनीय – माजी खासदार धनंजय महाडिक

श्रमिक पत्रकारांना जीवनावश्यक साहित्य वाटप :पहिल्या टप्प्यात १४० श्रमिक पत्रकारांना जीवनावश्यक साहित्याचे वाटप

कोल्हापूर /प्रतिनिधी : श्रमिक आणि मानधन तत्वावर काम करणाऱ्या पत्रकारांचा विचार करणारी पत्रकार संघटना म्हणून युवा पत्रकार संघाने राज्यभरात आपली ओळख निर्माण केली आहे .ही संघटना भविष्यात पत्रकारांची शिखर संघटना म्हणून आपली ओळख निर्माण करेल ,असे गौरवोद्गार माजी खासदार धनंजय महाडिक यांनी काढले . कोरोनाच्या कालावधी आणि लॉक डाऊन मुळे आर्थिकदृष्ट्या अडचणीचा सामना करणाऱ्या श्रमिक पत्रकारांना युवा पत्रकार संघाच्या वतीने महिनाभर पुरेल, इतक्या शिधा साहित्याचे वाटप धनंजय
महाडिक यांच्या हस्ते करण्यात आले . यावेळी ते बोलत होते .माजी परिवहन सभापती राहुल चव्हाण ,सत्य साईबाबा सेवा संघटनेचे अध्यात्म विभागाचे प्रमुख मुरलीभैया जाजू, सामाजिक कार्यकर्ते आजम जमादार ,ज्येष्ठ पत्रकार सुनंदा मोरे, नंदकिशोर जाजू,बजरंग माळी, अशोकजी सारडा, भाजपचे राजारामपुरी मंडल अध्यक्ष रवी मुतगी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला . यावेळी बोलताना युवा पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी शिंगे यांनी राज्यभरातील श्रमिक पत्रकारांना टप्प्या टप्प्याने शिधा साहित्य वाटप उपक्रम राबविण्यात येणार असल्याची घोषणा केली . या उपक्रमाचे संयोजन युवा पत्रकार संघाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष नवाब शेख, राज्य उपाध्यक्ष जावेद देवडी, रत्नदीप चव्हाण, युवा पत्रकार संघाच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा अर्चना चव्हाण, राज्य उपाध्यक्ष डॉ राजेंद्र सूर्यवंशी , रतन हुलस्वार, डी एस कोंडेकर, बाबुराव वळवडे, महिला आघाडीच्या पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्षा मार्था भोसले, शकील जमादार ,राकेश पोलादे, युवा पत्रकार संघाचे कायदेशीर सल्लागार संदीप पोवार ,इम्रान मोमीन, ईजाज शेख , समीर चौधरी, जमीर चौधरी आदींनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

कोल्हापूर  जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघात सायंकाळी 5 पर्यंत सरासरी 67.97 टक्के मतदान

कोल्हापूर  जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघात सायंकाळी 5 पर्यंत सरासरी 67.97 टक्के मतदान 273 कागल मतदारसंघात सर्वाधिक सरासरी 74.33 टक्के मतदान कोल्हापूर/प्रतिनिधी  : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024...

कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघात दुपारी ३ पर्यंत सरासरी ५४.०६ टक्के मतदान

कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघात दुपारी १ पर्यंत सरासरी ३८.५६ टक्के मतदान करवीर मतदार संघात सर्वाधिक सरासरी ४५.२९ टक्के मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघात दुपारी...

कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदार संघात सकाळी ११ पर्यंत सरासरी २०.५९ टक्के मतदान

कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदार संघात सकाळी ११ पर्यंत सरासरी २०.५९ टक्के मतदान २७५ करवीर मतदार संघात सर्वाधिक सरासरी २६.१३ टक्के मतदान कोल्हापूर, दि.२० (जिमाका) :...

गांधीनगरवासियांचे ऋतुराज पाटील यांना भक्कम पाठबळ

गांधीनगरवासियांचे ऋतुराज पाटील यांना भक्कम पाठबळ कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रचारार्थ गांधीनगर येथे काढण्यात आलेल्या पदयात्रेला उदंड...

Recent Comments